मसूर डाळ आणि गाजर सूप (Masoor Daal &Carrot Soup Recipe In Marathi)

Samarpita Patwardhan
Samarpita Patwardhan @cook_22384179
Kalyan West.

#सूप पावसाळा आणि गरम सूप मज्जाच वेगळी. पण हेच सूप पौष्टिक आणि टेस्टी असेल तर....
आज आपण बघूया मसूर डाळ आणि गाजर सूप. आहारात मसूर डाळ खूप महत्वाची आहे. यात प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स च छान combination मिळत.
त्यासोबत गाजर असेल तर अजूनच भारी. कारण आपल्याला माहितेय गाजरामध्ये अ जीवनसत्वाचं प्रमाण जास्त असल्याने ते डोळ्यांसाठी उपयुक्त ठरतं.
तर असं पौष्टिक मसूर डाळ आणि गाजर सूप....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिट
04 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 कपमसूर डाळ
  2. 2मध्यम आकारचे गाजर
  3. 1टोमॅटो
  4. 1कांदा
  5. 1/4कोथिंबीर
  6. 3-4लसूण पाकळ्या
  7. 2 टेबलस्पून बटर
  8. 1/2 टेबलस्पून मिरी पूड
  9. चवीप्रमाणे मीठ

कुकिंग सूचना

२० मिनिट
  1. 1

    प्रथम मसूर डाळ स्वच्छ धुवून १५ मिनिटे भिजत ठेवावी. गाजर, कांदा,टोमॅटो ह्यांच्या फोडी करून घ्याव्यात. लसूण बारीक चिरून घ्यावा.

  2. 2

    डाळ १५ मिनिटे भिजवल्यानंतर (soak) कूकरच्या एका भांड्यात चिरलेला गाजर, कांदा,टोमॅटो, बारीक केलेला लसूण कोथिंबीर घेऊन त्यात ते बुडेल एवढे पाणी घालून घावे. नंतर ते कूकरला लावून ५-६ शिट्ट्या करून घ्याव्यात.

  3. 3

    १० मिनिटl नंतर कुकर उघडून शिट्ट्या केलेले मिश्रण बाहेर काढून थंड होऊ द्यावे.
    मिश्रण थंड झाल्यावर ते मिक्सर ला बारीक करून घ्यावे. (तुमच्याकडे हॅन्ड ब्लेंडर असेल तर मिश्रण थंड व्हायची वाट ना बघता एक वाफ गेली कि लगेच बारीक करून घ्या).

  4. 4

    नंतर एका पॅन मध्ये बटर टाकून गरम करून घ्या.

  5. 5

    बटर वितळले कि मग त्यात बारीक केलेले सूपचे मिश्रण घालून आवश्यक तेवढे पाणी घालून घ्यावे. आणि चवीप्रमाणे मीठ व मिरपूड घालून १५-२० मिनिटे छान उकळी येऊ द्या.

  6. 6

    आपले गरमा गरम मसूर डाळ आणि गाजर सूप तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Samarpita Patwardhan
Samarpita Patwardhan @cook_22384179
रोजी
Kalyan West.

टिप्पण्या

Similar Recipes