लाप्सी मुंबर (Rice Cake) (lapssi mumbar recipe in marathi)

Terrence Pereira
Terrence Pereira @Terry_Perry

वसईचे पारंपारिक गोड #shaboiboyz
मूळ रेसिपी- वेरोनिका एम.

लाप्सी मुंबर (Rice Cake) (lapssi mumbar recipe in marathi)

वसईचे पारंपारिक गोड #shaboiboyz
मूळ रेसिपी- वेरोनिका एम.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
4-5 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 किलोलाप्सी (2 वाट्या) (मिक्सर मधून फिरवणे)
  2. 1/2 किलोकिलो गूळ (400 ग्रॅम गुड आवडीनुसार)
  3. 200 ग्रामतूप
  4. 1 वाटीनारळ (किसलेला) (आवडीप्रमाणे जास्त)
  5. 4.5 वाटीपाणी किंवा दूध
  6. जायफळ पावडर
  7. ड्रायफ्रूट (काजू, बदाम, मनुका)

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    मंद गॅसवर पातेल्यात तूप घाला, तूप तापल्यावर त्यात मिक्सरमधून फिरवलेला लाप्सी घाला व थोडा वेळ परता

  2. 2

    नंतर त्यात बारीक कापलेला गूळ व किसलेला नारळ घाला व मिश्रण थोडावेळ परतून घ्या, नंतर त्यात ड्रायफ्रूट घाला व ऐक दोनवेळा फिरवा

  3. 3

    नंतर त्यात 4.5 कप पाणी किंवा दूध (तापलेल) घाला, जायफळ पावडर घाला व मिक्स करा. व गॅस मिडीयम करून ढवळत राहा.

  4. 4

    मिक्सर घट्ट होत आले की गॅस बंद करा व पातेलं गॅसवरून खाली उतरवा

  5. 5

    कुकरमध्ये थोडसं (3 ग्लास) पाणी घाला व त्यात स्टँड ठेवा व त्यावर मिश्रणाचे पातेल ठेवा (झाकून ठेवू नका) नंतर कुकर चे झाकण लावा. (हाय फिल्म)

  6. 6

    वाफ यायला सुरुवात झाली की गॅस बंद करा व 20 मिनिटांनी गॅस बंद करा.

  7. 7

    टीप- लापशीच मुंबर : दुप्पट पेक्षा जास्त पाणी
    रव्याचा मुंबर : फक्त दुप्पट पाणी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Terrence Pereira
Terrence Pereira @Terry_Perry
रोजी

Similar Recipes