बटाट्याची भाजी उपासाची (batatyachi bhaji recipe in marathi)

kavita arekar
kavita arekar @kav1980

#nrr
नवशक्ती , नवदुर्गा , नवरंगाचा सण म्हणजे नवरात्र. घट बसने, देवीची आराधना, पूजा , कुमारिका पूजन , गरबा आणि शेवटी सीमोल्लंघन म्हणजे दसरा. आज नवरात्रीचा पहिला दिवस . आजचे देवीचे रूप शैलपुत्री. देवीला वंदन करून नवरात्री नवज।गर रेसिपी ला सुरवात करते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 4बटाटे उकडून घेतलेले
  2. 2 चमचेदाण्याचे कूट
  3. 1 चमचाजीरे
  4. 2 चमचेसाजूक तूप
  5. 2हिरव्या मिरच्या तुकडे
  6. मीठ, साखर चवीनुसार
  7. थोडी कोथिंबीर सजावटी साठी

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    प्रथम सगळे साहित्य गोळा करा. बटाटे उकडून घ्या. गार झाल्यावर त्याची साले काढून फोडी करा.

  2. 2

    मग कढई मध्ये तूप घाला आणि त्यात जीरे, गिरव्या मिरच्या घालून फोडणी करा.

  3. 3

    मग त्या मध्ये बटाट्याच्या फोडी घाला. मीठ, साखर, दाण्याचे कूट घाला. थोडी कोथिंबीर घालून भाजी परतून घ्या.

  4. 4

    कोथिंबीर घालून उपासाची भाजी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
kavita arekar
kavita arekar @kav1980
रोजी

Similar Recipes