झुणका भाकरी(Zunka Bhakri Recipe In Marathi)

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
मुंबई

#BR2
आज मंगळवार शेगावीच्या गजानन महाराजांचा 145 वा प्रकट दिवस विदर्भाचे पंढरपूर म्हणून शेगाव ओळखले जाते.अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक समर्थ सद्गुरू श्रीगजानन महाराज यांच्या जीवनचरित्राचा कालखंड बत्तीस वर्षाचा आहे.  23 फेब्रुवारी, १८७८ रोजी ते प्रथमतः तारुण्यात दिगंबरावस्थेत शेगावी दिसले. उंच, तांबूस वर्ण आणि गुडघ्यापर्यंत पोहचणारे हात अशी त्यांची देहचर्या होती. सर्व विषयांचे ज्ञान असलेल्या महाराजांना कोणी शिव अवतार तर कोणी रामदास स्वामींचा अवतार शेगावात प्रकटले असे समजत. महाराजांचा वेद आणि ऋचा यांचा ही दांडगा अभ्यास होता प्रथमादृष्ट्या ते उष्ट्या पत्रवालीतून अन्न वेचून खाताना दिसले. तसेच झुणका- भाकर, हिरव्या मिरच्या, मुळ्याचा शेंगा हे त्यांचे आवडते पदार्थ होते. एखाद्याच्या ओसरीवर मुक्काम करून घरात मिळणारा पदार्थ ते आवडीने ग्रहण करायचे.
गजानन महाराज योगी पुरूष होते. भक्तांप्रमाणे आजही महाराज प्रेमापोटी त्यांच्याशी संकटात धावून येतात. म्हणून आजही शेगावात त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यास भक्त लांबून येतात..आज आमचा एक ग्रुप शेगाव संस्थानकडून दिलेल्या गुरुचरित्राचे सगळे मिळून पारायण करत आहोत . न चुकता बरीच वर्ष झाली हे व्हाट्सअप वरचे पारायण ग्रुप खूप व्यवस्थित रित्या चालू आहे रोजचे पारायण ,संपुट पारायण असते .त्या निमित्ताने झुणका-भाकरी ठेचा तयार करते आणि नैवेद्य दाखवून परिवाराबरोबर जेवणातून हे पदार्थ घेतो जे आपल्या आरोग्यासाठी योग्यही आहे.
देवाच्या कृपेने आपण अशा आरोग्यदायी प्रसाद तयार करायचे आणि त्याचे ग्रहणही करायचे हेच आपल्याला आपल्या संतांकडून शिकण्यासारखे आहे.
🌺गण गण गणात बोते🌺

Edit recipe
See report
Share
Share

Ingredients

35 मिनिट
3 व्यक्ति
  1. 1 कपबेसन पीठ
  2. 3कांदे
  3. 2-3हिरव्या मिरच्या
  4. 5-6लसूण ठेचलेले
  5. 1 टेबलस्पूनतेल
  6. 1 टीस्पूनमोहरी,जीरे , हिंग
  7. 1 टीस्पूनहळद धना पावडर लाल मिरची पावडर
  8. चवीनुसारमीठ
  9. 1 1/2 कपज्वारीचे पीठ
  10. गरजेनुसार पाणी

Cooking Instructions

35 मिनिट
  1. 1

    सर्वात आधी झुणका तयार करण्याची तयारी करून ठेव कांदे कट करून घेऊ लसूण ठेचून घेऊ हिरव्या मिरच्या कट करून बेसन काढून घेऊ

  2. 2

    कडईत तेल तापवून त्यात मोहरी जीरे हिंग लसूण परतून घेऊ हिरव्या मिरच्या परतून घेऊन कांदे टाकून परतून घेऊ

  3. 3

    कांदे परतून झाल्यावर त्यात दिल्याप्रमाणे मीठ मसाले टाकून घेऊ
    बेसन टाकून परतून घेऊ

  4. 4

    आता थोडा पाणीचा सबका मारून झाकण देऊन वाफेवर बेसन शिजवून घेऊ

  5. 5

    अशाप्रकारे झुणका तयार करून घेऊ वरून कोथिंबीर टाकून देऊ

  6. 6

    बाऊलमध्ये ज्वारीचे पीठ घेऊन त्यात मीठ घालून पीठ मळून घेऊन पोळपाटावर भाकरी थापून घेऊन

  7. 7

    तव्यावर भाकरी टाकून एका साईडला पाणी लावून घेऊ आता भाकरी गॅसवर भाजून फुलून घेऊन.

  8. 8

    नैवेद्याचे ताट तयार करू
    ताटात भाकरी, झुणका, कांदा हिरव्या मिरच्या लाल मिरचीचा खुडा नैवेद्यात ठेऊ.

Edit recipe
See report
Share

Cooksnaps

Did you make this recipe? Share a picture of your creation!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
on
मुंबई
Cooking is an art which touches heart and lives across the globe with all mankind.Follow my page on Instagram_cuisine _culture _
Read more

Similar Recipes