दत्तगुरूंची आवडती - श्रावणी घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)

श्री गुरुचरित्र : अध्याय त्रेपन्नावा : अवतरणिका
घेवडा उपटोनिया दरिद्रियाचा । कुंभ दिधला हेमाचा ।
वर्णिला प्रताप श्रीगुरुचा । अष्टादशाध्यायांत ॥३६॥
कितीही श्रीमंती असली तरी शक्य असेल तर घेवडा वेल लावावा. श्रीमंती देवापुढे कधीच नसते, दत्तगुरु जेवण्यास येतात, घरची घेवडा भाजी खातात.
घेवडा भाजी करावी, घेवडा कथा वाचावी, कमी असते ते वाढते.
घेवडा भाजी दत्तगुरूंना नैवेद्य म्हणून दाखविली जाते. म्हणून गुरु पौर्णिमा विशेष रेसिपीज #gpr साठी श्रावणी घेवडा भाजी बनवली आहे.
दत्तगुरूंची आवडती - श्रावणी घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)
श्री गुरुचरित्र : अध्याय त्रेपन्नावा : अवतरणिका
घेवडा उपटोनिया दरिद्रियाचा । कुंभ दिधला हेमाचा ।
वर्णिला प्रताप श्रीगुरुचा । अष्टादशाध्यायांत ॥३६॥
कितीही श्रीमंती असली तरी शक्य असेल तर घेवडा वेल लावावा. श्रीमंती देवापुढे कधीच नसते, दत्तगुरु जेवण्यास येतात, घरची घेवडा भाजी खातात.
घेवडा भाजी करावी, घेवडा कथा वाचावी, कमी असते ते वाढते.
घेवडा भाजी दत्तगुरूंना नैवेद्य म्हणून दाखविली जाते. म्हणून गुरु पौर्णिमा विशेष रेसिपीज #gpr साठी श्रावणी घेवडा भाजी बनवली आहे.
कुकिंग सूचना
- 1
श्रावणी घेवड्याच्या शेंगा स्वछ धुवून घ्यायच्या. मग हाताने खुडून घ्यायच्या. सुरीने कापू हि शकता पण गवार, फरसबी, घेवड्या च्या शेंगा हाताने खुडलेल्या भाजीची चव चांगली लागते. शेंगा खुडताना जवळ जवळ तुकडे करायचे. आणि दोन्ही बाजूने तंतू / रेषा खेचून काढायच्या. सर्व शेंगांचे तुकडे पाण्यात भिजत ठेवायचे. कांदा - मिरच्या - बटाटा कापून घ्यायचे.
- 2
कढईत तेल गरम करून कढीपत्ता - हिंग - मोहरी - जिरं - हळद ची फोडणी द्यायची. मिरची आणि कांदा परतून घ्यायचा. तिखट आणि गोडा मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. बटाटा ऍड करून ढवळून २ मिनिटांसाठी झाकून ठेवायचं. मग शेंगांचे तुकडे घालून चवीनुसार मीठ घालायचं. थोडासा पाण्याचा हबका मारायचा आणि झाकून १० मिनिटांसाठी भाजी शिजायला द्यायची. मध्ये एकदा तळाला लागू नये म्हणून ढवळून घ्यायची.
- 3
१० मिनिटांनी भाजी बऱ्यापैकी आवळलेली दिसेल. यात गूळ पावडर, १ चमचा खोबरं आणि गरम मसाला घालून ढवळायचं. पुन्हा झाकून शिजायला ठेवायची.
साधारण अजून पाच मिनिटांत भाजी व्यवस्थित शिजलेली असेल. एक चमचा खोबरं वरून भुरभुरवून घेवडा भाजी सर्व्ह करायची. - 4
पुण्यात हॉस्टेल मध्ये असताना खाणावळीतून हि भाजी सर्रास मिळायची, तेव्हा मला ती भाजी बिल्कुल आवडत नव्हती. परंतु वरील पद्धतीने बनवलेली भाजी अत्यंत चविष्ट लागते. Generally घेवडा भाजी शक्यतो कोणाला खायला आवडत नाही, परंतु अशा पद्धतीने बनवली तर बोट चाटत खाल्ली जाईल :)
~ सुप्रिया घुडे
Similar Recipes
-
श्रावणी घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)
श्री दत्त गुरूंची आवडती , श्रावणी घेवडा भाजी .. ही रेसिपी मी cooksnap केली आहे Madhuri Shah -
दत्तगुरूंची आवडती - घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)
#ccsघेवड्याची भाजी म्हटले की सगळे नाकं मुरडतात, परंतु अशा पद्धतीने बनवलेली भाजी खूप छान लागते. नक्की करून पहा Shital Muranjan -
श्रावणी घेवडा बटाटा भाजी (ghevda batata bhaji recipe in marathi)
#Cook_along#cna#Cooksnap_july#श्रावणी घेवडा बटाटा भाजी... माझी मैत्रीण @cook_SupriyaGhude97 घुडे यांची 26 जुलै 2021 रोजीची श्रावणी घेवडा भाजी मी आज cooksnap केली आहे. फक्त या भाजीत मी कांदा घातलेला नाहीये.. सुप्रिया, खूप चविष्ट आणि चवदार अशी ही भाजी झालीये.घरी सगळ्यांना खूप आवडली. Thank you so much for this delicious recipe..😊🌹❤️ घेवडा.. श्री दत्तगुरूंची अतिशय आवडती भाजी.. या भाजीचे वर्णन खुद्द गुरुचरित्रामध्ये देखील केलेले आहे.. दत्त जयंतीचा नैवेद्य, श्रीगुरुचरित्राचे पारायण केल्यावर दाखवण्यात येणाऱ्या नैवेद्याच्या पानात घेवड्याची भाजी असतेच..श्री गुरुचरित्र : अध्याय त्रेपन्नावा : अवतरणिका**घेवडा उपटोनिया दरिद्रियाचा । कुंभ दिधला हेमाचा ।वर्णिला प्रताप श्रीगुरुचा । अष्टादशाध्यायांत ॥३६॥ ** असे अतिशय सुंदर वर्णन आणि महत्व श्री गुरुचरित्रात केले आहे..लोह पोटॅशियम विटामीन बी कॉम्प्लेक्स यांनी परिपूर्ण असलेली ही भाजी आपल्या रोजच्या आहारात असणे अत्यंत गरजेचे आहे..चला तर मग श्री दत्तगुरुंना आवडणारी आणि अतिशय पौष्टिक अशी श्रावणी घेवड्याची भाजी करु या.. Bhagyashree Lele -
सात्विक दत्तगुरूंची आवडती श्रावणी घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)
#ccs#श्रावणीघेवडाभाजी#घेवडादत्त महाराजांचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती महाराज यांची आवडती घेवडा भाजी परमपूज्य सदगुरू नृसिंह सरस्वती महाराज ज्यावेळेस नरसोबाची वाडी येथे तप करीत होते तेव्हा भिक्षा मागून ते आपला उदरनिर्वाह करायचे एकदा एका ब्राह्मण कुटुंबीयांच्या घरी ते भिक्षेसाठी जातात पण कुटुंबाकडे महाराजांना भिक्षा देण्यासाठी घरात काहीच उपलब्ध नव्हते तेव्हा त्या घरातील महिलेने दारातील वेलातील शेंगा तोडून महाराजांना भिक्षेच्या स्वरूपात म्हणून दिल्यादीक्षा घेतल्यानंतर महाराजांनी ते वेल उपटून टाकलेब्राह्मण कुटुंब खूप अचंबित झाले की आपण महाराजांना भिक्षा दिली तरी त्यांनी आपल्या दारातील वेळ उपटून काढले जे त्यांच्या उदरनिर्वाहाचा साधन होते त्यांना कळायला मार्गच नव्हता की महाराजांनी असे का केले होते आता वेल उपटले आहे तर त्यांनी मुळासकट उपटून काढण्याचा प्रयत्न केला जेव्हा ती उपटत होते तेव्हा त्यांना मुळाशी धनाचा हंडा सापडला मग त्या कुटुंबाला लक्षात आले की महाराजांनी ही वेल का उपटले आपल्याला धन कुंभ मिळावे म्हणून त्यांनी ही कृती केली अशा प्रकारे या घेवडा रान भाजीला महाराजांनी स्पर्श झाला ही रानभाजी पवित्र झाली दत्त महाराजांच्या गुरुचरित्र पारायण करताना शेवटच्या दिवशी नैवेद्यात सात्विक पद्धतीने ती भाजी तयार करून नैवेद्य ठेवली जाते. दत्त स्वरूपात परम पूज्य नृसिंह सरस्वती महाराजांचा हाताने ही घेवडा भाजी पवित्र झाली व तिला विशेष महत्त्व प्राप्त झाले. तेव्हापासून सात्विक पद्धतीने तयार करून ही भाजी नैवेद्यात दाखवली जाते Chetana Bhojak -
श्रावणी घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)
#GA4 #week18#keyword_french_beansथंडीच्या सिझनमध्ये श्रावणी घेवडा बाजारात भरपूर प्रमाणात येतो. याची आज मी भाजी केली आहे अगदी साधी सोपी पद्धतीने. चला तर मग रेसिपी बघुया 😊👇 जान्हवी आबनावे -
श्रावण घेवडा भाजी (मोडाची मटकी घालून) (ghevda bhaji recipe in marathi)
#ccs#week2श्रावण घेवडा पूर्वी श्रावणातच मिळायचा.आता ही सदैव मिळणारी भाजी.साधीच पण चविष्ट व फायबरयुक्त . पूर्वी हा घेवडा थोडा चपटा असा मिळत असे आणि त्याच्या दोन्ही बाजूच्या शिरा सोलाव्या लागायच्या.आता या श्रावण घेवड्याचा वाण खूपच बदलला आहे.तरीही गोडसर अशा या शेंगांना भाजीबरोबरच पुलाव,बिर्याणी, सूप,चायनीज यामध्ये खूपच अग्रस्थान मिळाले आहे.कुकपँडच्या या शाळेत डब्यामध्ये लहानपणी आवर्जून नेली जायची ही भाजी त्याची आठवण झाली!मंगळागौरीची भाजी म्हणूनही या भाजीचे महत्त्व आहे.श्री दत्तगुरुंच्या नैवेद्यासाठी ही भाजी करतात.श्रीगुरुचरित्राच्या अठराव्या अध्यायात याची कथा वर्णन केली आहे.गरिब ब्राह्मणाला देवळात एक यति भेटतात.त्यांना घेऊन ते घरी भोजनासाठी आणतात.बायकोही साधीशी असते.मिळेल त्या भिक्षेवर ते रहात असतात.परसामध्ये खूप पसरलेला असा घेवड्याचा मोठा वेल असतो,भरपूर शेंगा आलेल्या असतात,त्याचीच भाजी तिने त्यादिवशी स्वयंपाकात केलेली असते.हे यति(खरे प्रत्यक्ष दत्तगुरुच!)भोजन झाल्यावर निघताना प्रसन्न होतात पण जाताना या वेलीला उखडून तोडून टाकतात.ब्राह्मणाला आणि पत्नीला वाईट वाटते.खूप खिन्न होतात.सगळ्या वेलीचा पसारा आवरुन आणखी उरलेली मुळे तोडताना जेव्हा जमिन खणू लागतात तेव्हा खणखण आवाज येतो व भरलेल्या सोन्याच्या मोहरांचा हंडा सापडतो.हा दत्तमहाराजांचाच कृपाप्रसाद मिळाला आणि प्रत्यक्ष दत्तगुरुंनीच मार्ग दाखवून त्यांचे दारिद्रय संपवले...अशी ही कथा...म्हणून घेवड्याच्या भाजीला दत्तगुरुंच्या नैवेद्यात स्थान आहे.गुरुचरित्र हे आपल्याकडे वेदांइतकेच महत्वाचे आहे!अशी ही घेवड्याची भाजी कशी करायची तेही बघू या...।।श्रीअवधूत चिंतन गुरुदेवदत्त ।।🌹 Sushama Y. Kulkarni -
चमचमीत मसालेदार श्रावणी घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)
#GA4#WEEK18#Keyword_French_Beans थंडीमध्ये बाजारात भरपूर प्रमाणात हिरव्या भाज्या उपलब्ध असतात...या ऋतुत श्रावणी घेवडा खुप छान हिरवागार मिळतो.बघितल्यावर घेण्याचा आणि खाण्याचा मोह टाळुन शकत नाही.. लता धानापुने -
श्रावणी घेवडा (ghevda recipe in marathi)
#श्रावण स्पेशल भाजी हिरव्या श्रावणाचे आगमन आणि त्यासोबत हिरव्यागार ताज्या भाज्या.. त्यातलीच एक श्रावण या नावाला साजेशी अशी ही श्रावणी घेवडा भाजी... Aparna Nilesh -
घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)
#श्रावणात ही भाजी छान लागते .म्हणजे वेगळी वालपापडी असते ती. हल्ली हा घेवडा कधीही मिळतो पण पावसाळ्यात मिळणारा घेवडा चविष्ट लागतो. Hema Wane -
श्रावण घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)
#ccs ... Cookpad शाळेचे दुसरे सत्र...श्री दत्तगुरू ची आवडती श्रावण घेवडा भाजी...अगदी कमी साहित्यात होणारी.. Varsha Ingole Bele -
झणझणीत घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)
#ccs#कुकपॅडचीशाळा "दत्त गुरूंची आवडती भाजी" " झणझणीत घेवडा भाजी" लता धानापुने -
श्रावण घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)
#ccs कूकपॅड ची शाळा सत्र -२यामध्ये मी आज दत्त गुरुची आवडती भाजी श्रावण घेवडा ही बनवली आहे.आमच्याकडे देवाला दाखवायच्या नेवेद्य मध्ये शक्यतो कांदा-लसुण नाही वापरत म्हणून कांदा-लसुण विरहीत ही भाजी कशी बनवायची ते आज पाहूयात... Pooja Katake Vyas -
खमंग श्रावणी घेवडा (Shravani Ghevda Recipe In Marathi)
#SSRश्रावण आला कीं , कोवळा , हिरवागार लुसलुशीत घेवडा सर्वत्र आढळतो . अगदी चटकन होणारा व चवीलाही खमंग लागणारा श्रावणी घेवडा !! ही भाजी श्रावणात आवर्जून केली जाते .चला त्याची कृती पाहू Madhuri Shah -
श्रावणी घेवडा बटाटा भाजी (ghevda batata bhaji recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
श्रावण घेवड्याची भाजी (ghevdyachi bhaji recipe in marathi)
#shrश्रावण रेसिपीस चॅलेंज week 3'श्रावण' महिना म्हणजे उपवास, व्रतवैकल्यांचा महिना. सणांची सुरुवात. या महिन्यात सगळीकडे हिरवेगार असते. सगळीकडे आल्हाददायक वातावरण. श्रावणातच वेगवेगळ्या गावरान भाज्यांचीही रेलचेल असते. घराच्या परसदारात केलेला भाजीपाला या दिवसात मुबलक प्रमाणात असतो. त्यातीलच हा 'श्रावणी घेवडा'. तसा घेवडा बाराही महिना बाजारात मिळतो पण हा घेवडा श्रावणातच येत असावा म्हणूनच त्याला श्रावणी घेवडा म्हणत असावे. तर बघूया या श्रावणी घेवड्याची भाजी. Manisha Satish Dubal -
बिन्स भाजी (घेवडा भाजी) (beans bhaji recipe in marathi)
कुकपॅडची शाळा सत्र दुसरेहोमवर्क पोस्ट रेसिपीज चॅलेंजदत्तगुरुची आवडती भाजीश्रावणीघेवडा भाजी😋😋 Madhuri Watekar -
घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)
#ccs# दत्तगुरु ची आवडती भाजी घेवडा# चॅलेंज रेसिपी कुकपॅड शाळा Minal Gole -
श्रावण घेवडा भाजी (shravan ghevda bhaji recipe in marathi)
श्रावण घेवडा ही श्री दत्त गुरूंची आवडती भाजी आहे.ही रेसिपी मी केरळ ला हाउस बोट वर खाल्ली होती. ह्या भाजी ला beans poriyal म्हणतात. एकदम सात्त्विक आहे . भरपूर ओले खोबरे व अजिबात मसालेदार नसल्याने चविष्ट लागते.माझ्या घरी सगळ्यांना च ही भाजी खूप आवडते. Rashmi Joshi -
श्रावणी घेवडा (ghevda recipe in marathi)
#cooksnapमहाराष्ट्रीयन रेसिपीCooksnap Challengeमी हि रेसिपी अपर्णा निलेश ह्यांची रेसिपी कुकस्नॅप केली. छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
श्रावण घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)
दत्त गुरूची आवडती भाजी घेवडा भाजी अगदी सात्विक प्रमाणे बनवली आहे.#ccs Sangeeta Naik -
दत्तगुरुची प्रिय घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)
#ccs#week2#cookpad_ची_शाळा#घेवडा_भाजीघेवड्याची भाजी म्हणजेच वालाच्या शेंगा...ही भाजी माझ्या घरातील लोकांना म्हणजेच मुलींना आवडत नाही. पण हो आमच्या दोघांच्याही आवडीची बर का..😊त्याच प्रमाणे श्री दत्तगुरु ची देखील प्रिय भाजी.. म्हणजेच घेवडा भाजी.. करायला सोपी झटपट होणारी पौष्टिकतेने परिपूर्ण असलेली अशी ही भाजी..चला तर मग करुया *घेवडा भाजी*.. 💃 💕 Vasudha Gudhe -
घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)
#ccs#कुकपॅडची_शाळा#सत्र_दुसरे#घेवडा_भाजी'उपटूनी वेल घेवड्याचा' हे दत्तगुरूंचे गाणं खूप प्रसिद्ध आहे. दत्तगुरुंना ही घेवड्याची भाजी खूपच आवडीची आहे असे म्हणतात. म्हणून शक्यतो गुरुवारी ही भाजी नैवेद्यासाठी बनवतात. या भाजी मधे कांदा लसूण काहीही न घालता अगदी थोडेच मीठ मसाले घालून पण ही भाजी खूपच चविष्ट लागते. Ujwala Rangnekar -
-
खमंग श्रावण घेवडा भाजी (Shravan ghevda bhaji recipe in Marathi)
#shr#श्रावणशेफश्रावण महिन्यात काही विशेष भाज्या मिळतात आणि त्या ऋतुमानानुसार शरीरासाठी पोषक देखील असतात त्यातली एक श्रावण घेवडा ही भाजी मी थोड्या वेगळ्या पद्धतीने करून बघितली आहे तुम्ही सुद्धा करून बघा.... Prajakta Vidhate -
घेवड्याची भाजी (ghevdyachi bhaji recipe in marathi)
#ccsदत्तगुरूंची आवडती भाजी दत्तगुरुंना घेवड्याच्या भाजीचा नैवेद्य दाखवला जातो. गुरुचरित्राचे पारायण करताना शेवटच्या दिवशी किंवा प्रथम दिवशी सुद्धा घेवड्याच्या भाजी चा नैवेद्य दाखवला जातो घेवड्याच्या भाजी बाबतची एक कथा गुरुचरित्र अध्याय मध्ये आहे. नरसिंह सरस्वती सकाळच्या प्रहरी गावातून भिक्षा मागत असताना एका ब्राह्मणाच्या घरी येतात तो खूपच गरीब असतो त्याच्याकडे द्यायला काहीच नसते तेव्हा त्याची बायको त्यांच्या दारात असलेल्या घेवड्याच्या वेला च्या शेंगा काढून दत्तगुरुंना देते . दत्त महाराज हा वेल छाटून टाकतात. आणि त्या ब्राह्मणाला त्या वेलाखाली खोदायला सांगतात तेव्हा त्या ब्राह्मणाला जमिनीमध्ये धन सापडते अशी कथा गुरुचरित्र अध्याय मध्ये आहे. Smita Kiran Patil -
घेवडा (भाजी) (ghevda bhaji recipe in marathi)
विंटर स्पेशल ग्रीन रेसिपीज ( घेवड्याची भाजी )Sheetal Talekar
-
खरवस वडी (kharvas vadi recipe in marathi)
#gpr#गुरु पौर्णिमा विशेषमी गुरु पौर्णिमा विशेष म्हणून मी माझ्या गुरुसाठी नैवेद्य म्हणून खरवस वडी बनविली मला त्यासाठी चिकाच दूध नाही मिळालं म्हणून खरवस पावडर मार्केट मध्ये उपलब्ध होती ती आणून मी बनविले आहे खूप छान झाली आहे तुम्ही पण बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल. आरती तरे -
गावरान काळा श्रावण घेवडा/ काळा पावटा भाजी (kala shravan ghevda bhaji recipe in marathi)
भारतात उगवणारी एक भाजीची वनस्पती आहे. या वनस्पतीच्या एका प्रकारास श्रावणात शेंगा येतात म्हणून त्या प्रकारास 'श्रावणघेवडा' म्हणतात. श्रावणघेवड्यास कोल्हापुरात बिनीस, इंग्रजीत फ्रेंच बीन्स आणि हिंदीत फरसबी म्हणतात. घेवड्याच्या शेंगाची भाजी करतात nilam jadhav -
दत्तगुरूंची आवडती सात्विक घेवडा भाजी (ghevdya chya bhaji recipe in marathi)
#ccs#कूकपॅड_ची_शाळा#सत्र_दुसरे "दत्तगुरूंची आवडती सात्विक घेवडा भाजी" Shital Siddhesh Raut -
घेवडा बटाटा भाजी
#Lockdownघेवड्याची भाजी सुद्धा बटाट्या सोबत छान लागते एकदम टेस्टी अशी ही भाजी आहे. Sanhita Kand
More Recipes
टिप्पण्या (7)