रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
वीस-पंचवीस बाकरवाडी
  1. बाकरवडी च्या कव्हर साठी
  2. 1 कपमैदा
  3. 2 टेबलस्पूनबेसन
  4. 2 ते 3 टीस्पून गरम शेंगदाण्या च्या तेलाचे मोहन
  5. चवीनुसारमीठ
  6. पाणी मैदा भिजवण्यासाठी
  7. बाकरवडीच्या मसाल्याचे साहित्य
  8. 1 टीस्पूनजीरे
  9. 2 टीस्पूनतीळ
  10. 3-4 टिस्पून खोबरे कीस
  11. 3-4 टिस्पून कोथिंबीर
  12. 2 टीस्पूनधने पूड
  13. 2-3 टीस्पूनतिखट
  14. चवीनुसार मीठ
  15. 3-4 टेबलस्पून मोरा शेव
  16. 1 टिस्पून साखर
  17. 2 टेबलस्पूनचिंच गुळाची चटणी
  18. बाकरवडी तळण्याकरीता तेल

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम एका बाउल मध्ये मैदा, बेसन, ओवा थोडंसं मीठ टाकून मिक्स करून घ्यावे. मग यामध्ये कडकडीत शेंगदाण्याच्या तेलाचे मोहन टाकून हाताने छान मळून घ्यावे. नंतर थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असा गोळा मळून झाकून ठेवावा.

  2. 2

    आता एका कढई मध्ये बडीशेप व धने टाकून मंद आचेवर भाजून घ्यावे. त्यानंतर त्यामध्ये तीळ व खसखस टाकून परत थोड दोन-तीन सेकंद होऊ द्या व त्यामध्ये खोबरेकीस कोथिंबीर टाकून ते सुद्धा भाजून घ्यावे. मग हे सर्व जिन्नस थंड झाल्यावर त्यामध्ये धने पावडर, तिखट,मीठ,साखर टाकून मिक्सरमधून पावडर तयार करावे. आपला बाकरवाडी चा मसाला तयार आहे.

  3. 3

    आता भिजवलेल्या मैद्याच्या गोळ्याची पातळशी पारी लाटून घ्यावी.साईडने कडा जाडसर असाव्या. मग त्या पारीवर चिंचगूळाची चटणी लावून घ्यावी.

  4. 4

    चिंचगूळाची चटणी लावून झाल्यावर त्यावर तयार केलेल्या बाकरवडी चा मसाला लावून घ्यावा. व त्यावर शेव पण लावून घ्यावे. मग लाटण्याने हलकस प्रेस करून घ्यावे. जेणेकरून सगळा मसाला त्या पारीला चिटकून राहील. मग रोल करून घ्यावा खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे...

  5. 5

    रोल करून झाल्यावर चाकूने 1 इंचाचे अंतर घेऊन कट करून घ्यावेत.कट करून झाल्यावर प्रत्येक बाकरवाडी ला हलकसं प्रेस करून घ्यावे. जेणेकरून मसाला बाहेर निघणार नाही. अशाच प्रकारे सगळ्या बाकरवड्या तयार करून घ्याव्यात व तेलामध्ये पाच-सात मिनिटं ब्राऊनसर होईपर्यंत छान तळून घ्याव्यात.

  6. 6

    आपल्या खमंग अशा खुसखुशीत बाकरवड्या खाण्यासाठी रेडी आहे... तेव्हा नक्की करून बघा आणि सांगा कशा झाल्यात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786
रोजी

Similar Recipes