कच्ची केळी आणि बटाट्याचे उपवासाचे कटलेट (kacchi kedi ani batatyache cutltes recipe in marathi)

rucha dachewar
rucha dachewar @cook_26177680

आज अंगारकी चतुर्थीनिमित्त कच्ची केळी आणि बटाट्याचे उपवासाचे कटलेट करत आहे. नेहमी नेहमी उपवासाला साबुदाणा किवा भागर खाण्यापेक्षा एकाधा नवीन पदार्थ म्हणून कच्ची केळी आणि बटाट्याचे उपवासाचे कटलेट बनविले आहे.कच्ची केळी पचायला हलकी असतात. शिंगाडा पीठ आणि साबुदाणा पिठ घालून कच्ची केळी आणि बटाट्याचे उपवासाचे कटलेट केले आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 3कच्ची केळी उकडून
  2. 2बटाटे उकडून
  3. 1 वाटीशेंगदाण्याचा कूट
  4. 5सहा हिरव्या मिरच्या
  5. 1 टेबलस्पूनदही
  6. 1 टेबलस्पूनजीरे पावडर
  7. 1 टेबलस्पूनमिरे पावडर
  8. चवीपुरतं मीठ
  9. 2 टेबलस्पूनसाबुदाणा पावडर
  10. 2 टेबलस्पूनशिंगड्याचे पीठ
  11. तळण्याकरता तेल

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    प्रथम कच्ची केळी आणि बटाटे उकडून घ्यावेत.कच्ची केळी आणि बटाट्याची साले काढून घ्यावीत.

  2. 2

    शेंगदाणे भाजून घ्यावेत. शेंगदाणे थंड झाल्यावर त्याची साले काढावी. आणि मिक्सर मधून शेंगदाण्याचा कूट करून घ्यावा.

  3. 3

    हिरव्या मिरच्या मिक्सर मधून वाटून घ्याव्या.कच्ची केळी,बटाटे,दाण्याचा कूट,हिरवी मिरचीची कूट,काळी मिरे,मीठ,जीरे पावडर,दही, साबूदाणा पीठ, दही, शिंगाडा पीठ हे सर्व एकत्र करावे.

  4. 4

    सर्व मिश्रण एकत्र केल्यावर गोलाकार कटलेट करावे. कढई मध्ये तेल टाकावे तेल गरम झाल्यावर कटलेट टाकावे.कढई मध्ये दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत खमंग तळावे.

  5. 5

    कटलेट तळून झाल्यावर प्लेट मध्ये काढून घ्यावे.

  6. 6

    गरमा गरम कुरकुरीत कटलेट शेंगदाना चटणी किंवा दह्या सोबत सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
rucha dachewar
rucha dachewar @cook_26177680
रोजी

Similar Recipes