डाळवडा

Smita Mayekar Singh
Smita Mayekar Singh @cook_20355451

आजची माझी डाळ वड्याची रेसिपी ही थोडीशी स्ट्रीट फूड च्या अंगाने जाणारी . , घरी आपल्या डब्यांत आणि फ्रिजमध्ये असलेल्या घटकपदार्थांपासून झटपट आणि चविष्ट बनणारी! हे वडे गरम गरम खायला मजाच येते पण जर जास्त उरले तरी चिंता करू नका . मी ना माझ्या उरलेल्या वड्यांना झणझणीत रस्स्यात घालून मस्त साजूक तूप लावून फुलक्यांसोबत वाढले होते. इतके चवदार लागले काय सांगू , तुम्ही छानपैकी कढी बनवून त्यात देखील हे वडे घालू शकता !

डाळवडा

आजची माझी डाळ वड्याची रेसिपी ही थोडीशी स्ट्रीट फूड च्या अंगाने जाणारी . , घरी आपल्या डब्यांत आणि फ्रिजमध्ये असलेल्या घटकपदार्थांपासून झटपट आणि चविष्ट बनणारी! हे वडे गरम गरम खायला मजाच येते पण जर जास्त उरले तरी चिंता करू नका . मी ना माझ्या उरलेल्या वड्यांना झणझणीत रस्स्यात घालून मस्त साजूक तूप लावून फुलक्यांसोबत वाढले होते. इतके चवदार लागले काय सांगू , तुम्ही छानपैकी कढी बनवून त्यात देखील हे वडे घालू शकता !

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १ कप = २०० ग्रॅम्स चण्याची डाळ, स्वच्छ धुऊन, रात्रभर किंवा किमान ४ तास पाण्यात भिजवून ठेवावी
  2. १/२ कप= १२५ ग्रॅम्स मूग डाळ, स्वच्छ धुऊन, रात्रभर किंवा किमान ४ तास पाण्यात भिजवून ठेवावी
  3. १ मध्यम आकाराचा कांदा = ७० ग्रॅम्स बारीक चिरून
  4. २-३ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  5. इंच आल्याचा तुकडा किसून
  6. १०-१२ कढीपत्ता बारीक चिरून
  7. १/४ टीस्पून हिंग
  8. १ टीस्पून जिरे
  9. १/२ टीस्पून लाल मिरची पूड
  10. १/४ कप कोथिंबीर बारीक चिरून
  11. मीठ चवीप्रमाणे
  12. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    डाळींचे पाणी पूर्णपणे काढून घ्यावे. एका चाळणीत १५ मिनिटे डाळ ठेवून पाणी निथळू द्यावे. दोन्ही डाळी पाणी न घालता मिक्सरमधून जाडसर वाटून घ्याव्यात. चण्याच्या आणि मुगाच्या डाळीचे अख्खे तुकडे राहिले तर ते वड्यांत दिसायला चांगले दिसतात !

  2. 2

    एका बाऊलमध्ये वाटलेल्या डाळींची पेस्ट, कांदा, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, आले, लाल मिरची पूड, जिरे, हिंग,, कोथिंबीर आणि १ टीस्पून मीठ किंवा चवीप्रमाणे मीठ घालून हे मिश्रण एकत्र करून घ्यावे.

  3. 3

    डाळ वड्याचे मिश्रण तयार आहे. हाताच्या तळव्यांना तेल लावून आपल्याला आवडतील त्या आकारात गोल चपटे वडे थापून घ्यावेत. हे वडे चटकन तळावेत.

  4. 4

    वडे तळण्यासाठी तेल मध्यम आचेवर तापवून घ्यावे. आच मंद करून हे वडे कढईच्या बाजूने हलकेच तेलात सोडावेत. हा डाळीचे वडे असल्याने ते बाहेरून लगेच लाल होतात परंतु आतपर्यंत शिजत नाहीत. म्हणून हे वडे मंद आचेवर सोनेरी रंगावर तळून घ्यावेत. एका किचन टिश्यू पेपरवर काढून घ्यावेत. अशाच प्रकारे सारे वडे तळून घ्यावेत.

  5. 5

    हे डाळ वडे गरम गरमच हिरव्या चटणीसोबत किंवा नारळाच्या चटणीसोबत खावयास द्यावे!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Smita Mayekar Singh
Smita Mayekar Singh @cook_20355451
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes