फ्रुट चाट

Smita Mayekar Singh
Smita Mayekar Singh @cook_20355451

आजची माझी रेसिपी फ्रुट चाट -जास्त काही नाही लागत हे चाट बनवायला , थोडे चटपटीत मसाले , दह्याचे मिश्रण आणि तुमच्या आवडीची रसाळ फळे !

फ्रुट चाट

आजची माझी रेसिपी फ्रुट चाट -जास्त काही नाही लागत हे चाट बनवायला , थोडे चटपटीत मसाले , दह्याचे मिश्रण आणि तुमच्या आवडीची रसाळ फळे !

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. आलुबुखार
  2. पेअर (नासपती)
  3. सफरचंद
  4. संत्रे
  5. एका डाळिंबाचे दाणे
  6. २ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे, सोलून आणि चौकोनी तुकडे करून
  7. केळी
  8. ४-५ टेबलस्पून दही
  9. १ टीस्पून लाल मिरची पूड
  10. १ टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पूड
  11. १/२ टीस्पून काळी मिरी पूड
  12. १/२ टीस्पून चाट मसाला
  13. २-३ टीस्पून साखर
  14. लिंबाचा रस
  15. मीठ चवीप्रमाणे

कुकिंग सूचना

  1. 1

    सगळ्या फळांना स्वच्छ धुऊन, चौकोनी फोडी करून घ्याव्यात. तुम्ही वरील फळांऐवजी इतर फळेही वापरू शकता, जसे पेरू, पपई किंवा अननस.

  2. 2

    दह्याच्या मिश्रणासाठी दही, लिंबाचा रस, लाल मिरची पूड, जिरे पावडर, चाट मसाला, काळी मिरे पावडर, चवीनुसार मीठ, आणि साखर घालून नीट फेटून घ्यावे. आपल्या चवीप्रमाणे मसाले कमी जास्त प्रमाणात वापरावेत. दह्याचे मिश्रण तयार आहे.

  3. 3

    आता फळांचे तुकडे एका बाऊलमध्ये घेऊन ते वरखाली एकत्र करून घ्यावेत. या फळांवर दह्याचे मिश्रण घालून नीट हलक्या हाताने मिसळून घ्यावे. खाण्याआधी किमान ३० मिनिटे फ्रिजमध्ये थंड होऊ द्यावे. चटपटीत फ्रुट चाट तयार !

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Smita Mayekar Singh
Smita Mayekar Singh @cook_20355451
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes