मालवणी कोळंबी कढी

Smita Mayekar Singh
Smita Mayekar Singh @cook_20355451

कोकणात , मालवणात फिरायला आल्यावर खवय्यांची पहिली पसंती असते ते तळलेले मासे आणि माशांची कालवणे यांना .. आजची कोळंबीची पाककृती अगदी ठेवणीतली , रत्नागिरी , मालवण भागात विशेष करून जेव्हा नेहमीच्या माशांच्या रश्श्यांना फाटा देऊन साधे सरळ , सोप्पे काहीतरी बनवायचे असते ना तेव्हा ही बनवली जाते -” मालवणी कोळंबी कढी” !

मालवणी कोळंबी कढी

कोकणात , मालवणात फिरायला आल्यावर खवय्यांची पहिली पसंती असते ते तळलेले मासे आणि माशांची कालवणे यांना .. आजची कोळंबीची पाककृती अगदी ठेवणीतली , रत्नागिरी , मालवण भागात विशेष करून जेव्हा नेहमीच्या माशांच्या रश्श्यांना फाटा देऊन साधे सरळ , सोप्पे काहीतरी बनवायचे असते ना तेव्हा ही बनवली जाते -” मालवणी कोळंबी कढी” !

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. ३५० ग्रॅम्स कोळंबी साफ करून, मधला काळा दोर काढून, स्वच्छ धुऊन
  2. २ मोठे कांदे = १५० ग्रॅम्स (एक कांदा तुकडे करून, आणि एक कांदा चिरून)
  3. पाव कप ताजी कोथिंबीर
  4. ७-८ बेडगी सुक्या लाल मिरच्या
  5. तेल
  6. अडीच कप = २५० ग्रॅम्स ताजा खवलेला नारळ
  7. ५-६ कढीपत्ता
  8. १ टीस्पून जिरे
  9. पाव टीस्पून काळी मिरे
  10. १ टीस्पून धणे
  11. ७-८ लसणीच्या पाकळ्या
  12. अर्धा इंच आल्याचा तुकडा
  13. १ टीस्पून हळद
  14. १ टीस्पून तांदळाचे पीठ
  15. ५-६ कोकम
  16. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

  1. 1

    कोळंबीला हळद आणि मीठ चोळून १५-२० मिनिटे मुरायला ठेवावी.

  2. 2

    मिक्सरमधून किसलेला नारळ, कांद्याचे तुकडे, सुक्या मिरच्या, कोथिंबीर, लसूण,आले, धणे, जिरे, काळी मिरे हे सगळे साहित्य १ ते दीड कप पाणी घालून बारीक वाटून घ्यायचेय. जितके बारीक वाटले जाईल तितके दूध दाटसर निघेल. फक्त मिक्सर फार वेळ फ्रीवू नये जेणेकरून तो गरम होईल. नाहीतर दुधात नारळाचा तेलकट अंश उतरतो.

  3. 3

    हा नारळाचा वाटलेला चव एका गाळणीवर स्वच्छ सुती कापड अंथरून त्यातून गाळून घ्यावा. साधारण २ कप दूध निघते.

  4. 4

    एका कढईत २-३ टेबलस्पून तेल गरम करावे. त्यात कढीपत्त्याची फोडणी करून घ्यावी. मग बारीक चिरलेला कांदा घालून तो मऊ होईपर्यंत परतून घ्यावा.

  5. 5

    त्यात मॅरीनेट केलेली कोळंबी घालून एकत्र करून घ्यावी. साधारण १ मिनिट मध्यम आचेवर कोळंबी शिजवून घेतली की आच मंद करून त्यात नारळाचे पिळलेले दूध घालून पटकन हलवून घ्यावे. मंद आचेवर शिजू द्यावे.

  6. 6

    तांदळाचे पीठ ३-४ टेबलस्पून पाण्यात सैल करून घ्यावे आणि या कढीत मिसळावे म्हणजे कढीला दाटपणा येतो.
    झाकण घालून कढी मंद आचेवर शिजू दयावे.

  7. 7

    ३-४ मिनिटांनंतर कोकमं घालून घ्यावीत. चवीपुरते मीठ घालून काही मिनिटे अजून कढी शिजू द्यावीत. कोणतयाही परिस्थतीत मोठ्या आचेवर कढी उकळू देऊ नये नाहीतर नारळाचे दूध फाटते.
    २ मिनिटांनी गॅस बंद करून, झाकण घालून कढी मुरू द्यावी. जराशी वाफ गेली की ऊन ऊन भातासंगे वाढावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Smita Mayekar Singh
Smita Mayekar Singh @cook_20355451
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes