केळ्याची तवसळी

Darpana Bhatte
Darpana Bhatte @cook_19543746
Virar

#रवा
म्हटलं तर तशी ही पारंपारिक पाककृती आहे. केळी जास्त झाली आणि पिकली की दुपारच्या खाण्यासाठी ही तवसळी बनवली जायची. चला तर बनवूया घरातील सहज उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून ही केळ्याची तवसळी.

केळ्याची तवसळी

#रवा
म्हटलं तर तशी ही पारंपारिक पाककृती आहे. केळी जास्त झाली आणि पिकली की दुपारच्या खाण्यासाठी ही तवसळी बनवली जायची. चला तर बनवूया घरातील सहज उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून ही केळ्याची तवसळी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५-६ जणांसाठी
  1. 3- पिकलेली केळी, मी इथे भुरकेळी घेतली आहेत, तुम्ही हिरव्या सालीची पण केळी घेऊ शकता
  2. 2 कप- रवा, मी बारीक रवा वापरला आहे, तुम्ही मध्यम/ बॉम्बे रवा वापरू शकता
  3. दीड कप - साखर
  4. 1 कप- दूध
  5. 1/4 कप- साजूक तूप, तुम्ही डालडा वापरला तरी चालेल
  6. 1 टीस्पून- बेकिंग पावडर
  7. 1/2 टीस्पून- वेलचीपूड

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम केळी सोलून त्याचे छोटे तुकडे करावेत. मी फूड प्रोसेसरचा वापर केला आहे. पण हाताने करायची कृती पण बरोबर देत आहे.फूड प्रोसेसरमध्ये प्रथम केळ्याचे तुकडे घालून त्याचा लगदा करावा. त्यात साखर घालून पुन्हा फिरवून घ्यावे. त्यात तूप घालून पुन्हा एकत्र फिरवावे. हाताने करताना :– प्रथम केळी चांगली घुसळून मऊ करावीत, जशी शिकरणाला करतो. त्यात साखर घालून मिक्स करावे. ते एकत्र झाल्यावर त्यात तूप घालून फेटावे.

  2. 2

    आता तयार मिश्रणात रवा व वेलचीपूड घालून पुन्हा फिरवून एकत्र करावे. या मिश्रणात हळूहळू थोडे दूध घालून मिश्रण एकजीव करावे. मिश्रण घट्ट श्रीखंडाप्रमाणे झाले की, झाकून अर्धा तास बाजूला ठेवावे. हाताने करताना : – तूप केळ्याच्या मिश्रणात एकजीव झाल्यावर त्यात रवा व वेलचीपूड घालून एकत्र करावे. या मिश्रणात थोडे थोडे दूध घालून घट्ट श्रीखंडाप्रमाणे पीठ कालवावे. हे मिश्रण अर्धा तास झाकून ठेवावे.

  3. 3

    अर्ध्या तासानंतर या तयार मिश्रणात बेकिंग पावडर घालून हळुवारपणे एकत्र करावे. तूप लावलेल्या मोल्डमध्ये किंवा पसरट भांड्यात हे मिश्रण ओतावे. ही तवसळी दोन पद्धतीने करू शकतो. १) कुकरमध्ये पाणी घालून मिश्रणाचे भांडे ठेवून वर झाकण ठेवून मोदकाप्रमाणे वाफवून घ्यावे. किंवा कुकरच्या चार शिट्ट्या घ्याव्यात. २) ओव्हन गरम करून त्यात १८०℃ वर २५-३० मिनिटे किंवा कडा सुटेपर्यंत बेक करावे. थंड झाल्यावर मोल्डमधून किंवा भांड्यातून बाहेर काढावे.

  4. 4

    टीप :– रवा जाड असल्यास किंवा ओव्हनमध्ये करताना दूध थोडे अधिक लागू शकते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Darpana Bhatte
Darpana Bhatte @cook_19543746
रोजी
Virar

टिप्पण्या

Similar Recipes