आंबोळी ऑम्लेट,आणी अँपल माॅकटेल (amboli amlet ani apple mocktail recipe in marathi)

आंबोळी ऑम्लेट,आणी अँपल माॅकटेल (amboli amlet ani apple mocktail recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम आंबोळीचे पीठ डोशाचा पीठाप्रमाणे भिजवून घेणे व दहा मिनिट झाकून ठेवावे (टीप = इथे आंबोळी चे पीठ दळून आणलेले घेतले आहे आबोळी पीठासाठी 1 कीलो तांदूळ,50ग्रॅम उडीद डाळ,20ग्रॅम मेथी दाणे असे प्रमाण घेवून दळून आणलेले आहे)
- 2
आबोळी पीठ भिजे पर्यंत मिरचीचा खरडा करून घेणे त्यासाठी आल,लसूण,हिरवी मिरची,कोथिंबीर हे सर्व मिक्स मधे जाडसर वाटून घेणे व नंतर वाटी मधे अंड फोडून घ्यावे व त्यामध्ये मिरचीचा खरडा हळद व मीठ घालून अंड फेटून घ्यावे
- 3
दहा मिनिटाने आंबोळी करण्यासाठी गॅसवरती डोसा तवा ठेवून त्यावर आंबोळी घालावी व नंतर त्यावर फेटले ले अंड घालावे अंड आंबोळीवर व्यवस्थित पसरवून घ्यावे
- 4
व 4/5मिनिटाने आंबोळी पलटी करून दोन्ही बाजूंनी फ्राय करून प्लेट मधे काढून घ्यावे
- 5
नंतर पॅन मधे तेल घालून त्यामधे कांदा घालून परतून घ्यावे व नंतर त्यामध्ये टोमॅटो व शेजवान चटणी तसेच टोमॅटो सॉस घालून चवीनुसार मीठ घालून टोमॅटो मऊ होई पर्यंत परतून घ्यावे
- 6
नंतर परतलेला कांदा टोमॅटो ऑम्लेट वरती घालावे व त्यावर वरून कोथिंबीर घालून चिज किसून घालावे आशा रितीने आपले आंबोळी ऑम्लेट तयार झाले
- 7
माॅकटेल करण्यासाठी ज्यूस चा भांड्यात apple चे तुकडे घालून त्यामध्ये 1/2टीस्पून दालचीनी पावडर व 1/2वाटी मधातील थोडे मध घालावे व(उरलेले मध माॅकटेल सर्व्ह करताना घालावे) 1/2ग्लास पाणी घालून मिक्सर मधे 5/6 मिनिटे फिरवून घ्या
- 8
व नंतर माॅकटेल सर्व्ह करण्यासाठी एका ग्लासत 3/4आईसक्युब घाला वनंतर त्यामधे मिक्स मधे फिरवून घेतलेले apple व उरलेला मध घालून पिण्यासाठी माॅकटेल सर्व्ह करावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चीज चायनीज डोसा (cheese Chinese dosa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 रेसिपी बुक थिम मध्ये या वेळची ही फ्यूजन रेसिपी आहे. डोसा मध्ये विविध प्रकारचे डोसे डोसासेंटर वर आपण खात असतो. यामधला मी बनवलेला हा चीज चायनीज डोसा आहे. Mrs.Rupali Ananta Tale -
-
फिश पास्ता (fish pasta recipe in marathi)
फिश पास्ता हा बनवायला सोपा आहे नेहमीचा जोपासता आहे त्यालाच ची टेस्ट आली तर खायला छान लागतो नॉनव्हेज टीरियन लोका यांना हा पास्ता फार आवडतो चला तर मग बनवूयात फिश पास्ता. Supriya Devkar -
चीझी व्हेज बन (cheesy veg bun recipe in marathi)
चीझ माझ्या कडे अति प्रिय आहे सर्वांना,,छोट्या भुकेसाठी हा पदार्थ एकदम परफेक्ट आहे,,,चीझ जनरली सगळ्याच मुलांना आवडते,,गरम चीज खाणे हे आरोग्याला तसे चांगले आहे,ते थंड कधीच खाऊ नये ते नेहमी गरम असावे,,करुन बघा छान मजा येते हे पाव खायला,,मोठ्या छोट्या सर्वांसाठी हे एकदम मजेशीर आहे Sonal Isal Kolhe -
-
स्पॅनिश ऑम्लेट (omelette recipe in marathi)
#GA4 #week 2 प्रीती फडके पुरानिक यांनी या आठवड्यात स्पॅनिश आमलेट रेसिपी cookpad मराठी वर अपलोड केली आहे त्यांची रेसिपी बघून कुकस्नॅप साठी मी ही रेसिपी निवडली, खूपच सोपी आणि झटपट होणारी ही ऑम्लेट ची रेसिपी आहे .लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल असे ऑम्लेट आहे यामध्ये मी जास्ती च्या भाज्या घेतल्या आहेत त्यामुळे व्हेजिटेबल नी भरलेले हेल्दी ऑम्लेट तयार होते. Vandana Shelar -
-
-
-
चीझ ऑम्लेट सँडविच (cheese omelette sandwich recipe in marathi)
#worldeggchallengeचीझ ऑम्लेट सँडविच हे ब्रेकफास्ट किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी ही मस्त रेसिपी आहे, ह्यात सॅलेड तर आहेच पण मुलांच्या आवडीचं ऑम्लेट, चीझ, सॉस, मेयॉनीज हे असल्यामुळे मुल आवडीने खातात आणि त्यात त्यांना थोडं सॅलेड ने डेकोरेट करून डिश दिली कि आवडीची ही वाटते.तर पाहुयात चीझ ऑम्लेट सँडविच चि पाककृती. Shilpa Wani -
आंबोळी आणि ओल्या खोबऱ्याची चटणी (amboli ani olya khobraya chi chutney recipe in marathi)
#ks1#kokanकोकणच्या निसर्गसौंदर्याप्रमाणे तिथली खाद्यसंस्कृतीही तितकीच समृद्ध आहे.कोकणात झणझणीत आणि चमचमीत असे बरेच पदार्थ खूपच प्रसिद्ध आहेत आणि त्यावर ताव नाही मारला, तर नवलच म्हणावे. फक्त मांसाहारीच नाही, तर शाकाहारी पदार्थही कोकणात तितकेच सुग्रास लागतात.तांदूळ हे कोकणातील महत्त्वाचे पीक! त्यामुळे दिवसभराच्या खाण्यात तांदळाचा सढळ वापर होतो. न्याहारीमध्ये प्रामुख्याने खरपूस खापरोळ, आंबोळी, शिरवळ्या, घावणे असते. रोजच्या खाण्यातील बहुतांश पदार्थातील मुख्य घटक हा तांदळापासून बनलेला असतो. उदा. भात, भाकरी, मोदक, घावणे, शेवया, आंबोळी, कोळाचे पोहे, मऊ भात इ. हे सर्व पदार्थ कोकणात सर्रास बनवले जात असले, तरी जसे कोकणातले जिल्हे बदलतात, त्या अनुषंगाने पदार्थ बनवण्याच्या पद्धतीमध्येही थोडा फार बदल होतो. जसे, की आंबोळी मालवणमध्ये तांदूळ नि उडद डाळ घालून बनवतात, तर रत्नागिरीमध्ये वेगवेगळ्या डाळी बनवून बनवली जाते. चला तर मग मिक्स डाळी आणि तांदळा पासून बनवलेली आंबोळी कशी बनवायची ते बघूया👍 Vandana Shelar -
खाकरा पिझ्झा (Khakhra pizza recipe in marathi)
#EB14 #w14 मैद्याचा पिझ्झा न बनवता चपातीचा किंवा खाकर्याचा पिझ्झा बनवून लहान मुलांना खायला देता येऊ शकतो त्यामुळे खाकरा घरीच बनवणे आणि त्याचा पिझ्झा बनवणे म्हणजे एक मेजवानीच असते चला तर मग आज खाकरा पिझ्झा बनवूयात. Supriya Devkar -
-
पास्ता सॅलड (pasta salad recipe recipe in marathi)
#sp#सॅलड प्लानर - चौथे पास्ता सॅलड Dhanashree Phatak -
मिक्स व्हेज चीज पिझ्झा (mix veg cheese pizza recipe in marathi recipe in marathi)
#noovenbaking #cooksnap मी मास्टर शेफ नेहा शाह मॅम यांनी शिकविलेली पिझ्झा ही रेसिपी कूकस्नॅप केलेली आहे. पिझ्झा म्हटलं की माझ्या मुलाचा आणि माझा खूपच फेवरेट आहे. नेहमी पिझ्झा बेस बाहेरूनच विकत आणत असते. पण यावेळी नेहा मॅडमने सांगितल्याप्रमाणे गव्हाच्या पिठापासून घरीच पिझ्झा बेस तयार करून घेतलेला आहे. त्यामुळे मैदा नसल्याने हेल्दी पिझ्झा खाण्याचा आनंद झाला. आता नेहमीच मी पिझ्झा बेस घरीच तयार करून घेणार, आणी ताेही गव्हाच्या पिठापासूनच. चला तर मग बघुया पिझ्झा कसा केला तो....😊 Shweta Amle -
आंबोळी (amboli recipe in marathi)
#KS1अंबोळीचे माझं लहानपणापासूनच नात आणि माझ आजोळ कोकणातलं त्याच्यामुळे आजी नेहमी आंबोळ्या करायची त्या काळात मिक्सर नसायचे तर तिच्याकडे पीठ वाटायला रूबवण होत. पीठ त्याच्यातच वाटायची. ति आंबोळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या डाळीनी बनवण्याची.ति मुगाच्या डाळीची आंबोळ्या ही खास रेसिपी त्यामुळे हि रेसीपी खूप खास माझ्या आठवणीत आहे. Deepali dake Kulkarni -
व्हेज शेज़वान फ्रॅंकी (Veg Schezwan Frankie recipe in marathi)
#bfr -व्हेज फ्रँकी रोल रेसिपी / Veg Frankie रेसिपी एक प्रसिद्ध आणि हेल्थी डिश रेसिपी आहे.त्याची आंबट किंवा मसालेदार चव तुमच्या आवडीनुसार बनवता येते. लहान मुले आणि प्रौढ ते मोठ्या आवडीने खातात.मुलांच्या टिफिनमध्येही देता येते. हे बनवण्यासाठी वापरलेले साहित्य सहज उपलब्ध आहे. फ्रँकी रोल बनवणे सोपे आहे. घरी सुद्धा सहज बनवता येते.😋 Riya Vidyadhar Gharkar -
ब्रेड चिली (bread chilli recipe in marathi)
#GA4#week26कीवर्ड-ब्रेडअतिशय झटपट होणारी ही रेसिपी आहे....मी या रेसिपी मध्ये ब्राऊन ब्रेड चा वापर केला आहे. Sanskruti Gaonkar -
आंबोळी (amboli recipe in marathi)
#KS1#आंबोळीकोकणात घरोघरी नाष्टा मध्ये बनवला जाणारा आंबोळी हा पदार्थ मी आज बनवला आहे आपण चहा सोबत किंवा नारळाची चटणी लाल मिरच्यांची टोमॅटो चटणी कशा सोबत पण आपण खाऊ शकतो. Gital Haria -
फ्युजन इंडियन पिझ्झा (fusion indian pasta recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 #फ्युजनआज मी एक वेगळ्या प्रकारचा पिझ्झा बनवला आहे. इंडियन व इटालियन अश्या दोन खाद्यसंस्कृती एकत्र करुन ही रेसिपी बनवली . खूपच टेस्टी लागते .तुम्ही देखील नक्की करून पहा.... Mangal Shah -
आंबोळी (amboli recipe in marathi)
#bfrसकाळची गडबडीची वेळ.ऑफिसेसची सगळ्यांची घाईचीच वेळ.पण ब्रेकफास्ट न करता घराबाहेर पडायचेच नाही हा माझ्याकडचा नियम.आम्ही सगळेच कटाक्षाने पाळतो.आदल्या रात्री अगदीच काही लवकर जेवत नसलो तरी7-8तासांनंतर भूक ही लागतेच.त्यामुळे 8:30-9:00ही ब्रेकफास्टची वेळ निश्चित असते.सकाळचे खाणे राजासारखे असावे या प्रमाणे एखादे फळ,ताजे आणि चटकन होणारे आणि घरचेच पदार्थ,दूध असे असतेच.काही नाही जमले करायला तर पोळीभाजीही चालतेच.पण डब्यातही तेच खायचे असल्याने शक्यतो विविधता असतेच.आता काही लोक नाश्ता करत नाहीत.यातही अनेक मतप्रवाह आहेत.ब्रेकफास्ट म्हणजे रात्रीच्या उपासाचं चक्र ब्रेक करणं.संतुलीत ब्रेकफास्ट केल्याने दिवसभर शरीराला लागणारी उर्जा मिळते.ब्रेकफास्ट करणाऱ्यांना आरोग्यदायी खाण्याच्या सवयी माहित असतात.पण काही डाएट कंट्रोल या नावाखाली खूप वेळ भूक मारतात.न्याहारी न केल्याने शरिराचे सर्केडिअन क्लॉक बिघडतं.सकाळी शरिराचा मीटर सुरु करताना कार्ब्जयुक्त आहाराला शरिर चांगला प्रतिसाद देतं,त्यामुळे इन्सुलिनची निर्मिती नियंत्रीत रहाते.असं संशोधन सांगते.आपल्याकडे 4-5तासपर्यंत शरिराला उर्जा पुरवणारे बरेच पदार्थांचे प्रकार उपलब्ध आहेत.सगळ्यांच्या आवडीचे असतील असे नाही पण अधूनमधून यातही प्रत्येकाची आवड जपता येतेच.त्यामुळे ब्रेकफास्ट या महत्वाच्या अविभाज्य खाण्याला फाटा न देता हेल्दी काहीतरी रोज सकाळी खायला हे हवेच!! Sushama Y. Kulkarni -
व्हेजसिझलर (vegsizzler recipe in marathi)
#GA4#week18#सिझलर#sizzlerगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये सिजलर हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली सिझलर चे नाव हा पदार्थ बघताच फक्त रेस्टॉरंट आठवते सिझलर बऱ्याचदा रेस्टॉरंटमध्ये खाल्ला आहे. बर्याचदा वाटायचे घरी कसे बनवायचे कारण रेस्टॉरण्टमध्ये मेन्यू कार्डवर असेल तेच आपल्याला ते सर्व करतात, त्यांची सर्व करण्याची पद्धत पाहून भूक अजून वाढते सीसी आवाज करून ते सिजर आपल्यापुढे छान हॉट प्लेट मध्ये वाढले जाते. वन प्लेट मिल दोन किंवा तीन व्यक्ती शेअर करून आपण खाऊ शकतो पण बऱ्याचदा असे होते त्या प्लेटमध्ये सगळेच आपल्या आवडीचे असेल असे नाही, आपण शेअर करून खातो पण बऱ्याच गोष्टी मिस होतात घरी बनवण्याचा हा खूप मोठा फायदा आहे त्यात कॉन्टिटी आणि घरच्यांची आवडीनिवडीप्रमाणे प्लेटर बनवू शकतो मीही तसेच केले प्रत्येकाची आवड निवड लक्षात घेऊन सिजरल चे प्लॅटर बनवले आहे माझ्याकडे सिजरची हॉट प्लेट नाही आहे पण मी दोन तव्याचा यूज करून डिनर मध्ये सिजलर बनवले कोणतीही गोष्ट बनवण्यासाठी सगळेच असले पाहिजे असे नाही काही नसेल तर काहीतरी जुगाड करून ती वस्तू बनवली पाहिजे मी ही तसेच केले घरात अवेलेबल होईल त्याप्रमाणे डिश बनवली. घरच्यांच्या आवडीप्रमाणे त्यात वस्तू ऍड केल्या सिझलर हे एक अशी डिश आहे त्यात आपण आपल्या मनाप्रमाणे आवडीप्रमाणे बऱ्याच गोष्टी,पदार्थ मिक्स एंड मॅच करून ऍड करू शकतो घरी बनवण्याचा हा फायदा असतो. Chetana Bhojak -
तवा पिझ्झा (tawa pizza recipe in marathi)
#FD असं नेहमी होत, की मुले शाळेतून आले, अचानक घरच्यांना काहीतर खाण्यासाठी हवं असतं, किव्वा असं पण होते, की थोड्या वेळात काहीतरी मजेदार, स्वादिष्ट खाण्याची इच्छा होते. ४ ते ६ च्या दरम्यान काहीतरी चविष्ट खावेसे वाटते. अगदी कमी वेळात आणि सगळे खुश होतील अशी ३०-४० मिनीटात बनवलेली माझी cook pad वरची पहिली रेसिपी. नक्कीच आवडेल, एकदा करूनच बघा. Geetanjali Kolte -
-
-
फुगुक आंबोळी (Fuguk amboli recipe in marathi)
#KS1 #किचनस्टार चॅलेंज मी कोल्हापूरची, कोल्हापूरच्या दक्षिणेकडे कर्नाटक आणि पश्चिमेला गोवा व कोकण! माझ्या आजीचं माहेर कोल्हापूरच्या पश्चिम सीमेवरचं, कोकणला चिकटून! त्यामुळे, तिच्या जेवणामध्ये कोकणी फील यायचा. कालांतराने माझंही लग्न ह्याच भागात झालं आणि मग थोडे फार कोकणी पदार्थ ओळखता येऊ लागले. फुगुक आंबोळी ही त्यातलीच एक रेसिपी! फुगुक आंबोळी म्हणजे फुगलेली आंबोळी! तर आज आपण पाहूया नेहमीच्या आंबोळी, घावण्यांपेक्षा खूपच वेगळी, अतिशय मऊसूत, चवीला अफाट, लहानांपासून मोठ्ठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी, इडलीची सख्खी बहीण म्हणता येणारी 😉 "फुगुक आंबोळी"! शर्वरी पवार - भोसले -
-
कॉर्न चीजी ट्रँगल (corn cheesy triangle recipe in marathi)
#रेसीपीबुक #Week5पावसाळा आला की बाजारात भुट्टे दिसतात ते सगळ्यांनाच आवडतात आपली नेहमी बुट्टे भाजून खातो आज खूप पाऊस येत होता काय बनवायचं म्हणून बनवलं नवीन काय करणार मग केलं मस्त वेगळं Deepali dake Kulkarni -
एप्पल फ्रेंच टोस्ट रोल अप (Apple French Toast Roll- Ups)
#ATW2#TheChefStory#chefsmitsagarशेफ यांच्या लाईव्ह रेसिपी बघून खूप इन्स्पायर झाले त्यांच्या रेसिपीमुळे एक नवीन डिश तयार करण्याची इच्छा झाली. खूप छान रेसिपी त्यांनी लाईव्ह सेशनमध्ये दाखवल्या त्यापासून इन्स्पायर होऊन एक नवीन असा प्रकार तयार केला अगदी टेस्टी आणि खूप छान असा डेझर्टचा हा प्रकार तयार झाला आहे स्वीट डिश म्हणून आणि हेल्दी असल्यामुळे खूप चांगला हा प्रकार आहेमी सुद्धा पहिल्यांदा हा प्रकार तयार केला आणि मला चवीला खूप आवडला 'एप्पल फ्रेंच टोस्ट रोल अप'हा प्रकार एप्पल आणि दालचिनीचा फ्लेवर देऊन तयार केला आहे अगदी हेल्दी असा प्रकार आहे खूप छान लागतो चवीला व्हेजिटेरियन असल्यामुळे व्हेज प्रकारे तयार केला आहे. एकदा तयार करून टेस्ट करून बघाच.धन्यवाद शेफ त्यांच्यामुळे इन्स्पायर झाली एक नवीन प्रकार ट्राय केला.Thanks #chefsmithsagar sir Chetana Bhojak
More Recipes
टिप्पण्या (2)