मँगो रोझ केक (mango rose cake recipe in marathi)

Anita sanjay bhawari
Anita sanjay bhawari @cook_19997427
Chinchawad pune

मँगो रोझ केक (mango rose cake recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
6 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपमैदा
  2. 1 वाटीपिठीसाखर
  3. 2/5 वाटी पाणी
  4. 2 टेबलस्पूनतेल
  5. 1 टीस्पूनबेकिंग पावडर
  6. 1/2 टीस्पूनखायचा सोडा
  7. बटर पेपर
  8. केक भांड
  9. 2 कपविपक्रिम
  10. 3/4 थेंब मॅगो ईमोलसिन
  11. 2 टीस्पूनसाखर घालून उकळून घेतलेले पाणी (शुगर सिरप)
  12. सोनेरी रंगीत गोळ्या
  13. 2हापुस आंबे
  14. 3 थेंबखायचा रंग

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    मैदा, पिठीसाखर, बेकिंग पावडर, सोडा हे सर्व पदार्थ एकत्र करून 3 वेळा चाळणी मधून चाळून घ्या तेल आणि पाणी आवश्यकतेनुसार टाकून चांगले हॅन्ड ब्लेडर ने 5 मिनिटे फेटुन घेऊ

  2. 2

    केक भांड घेऊन त्यामध्ये बटर पेपर कापून आत मध्ये तेल लावून ठेवावे केकच मिश्रण त्या मध्ये टाकून भांड ओट्यावर 2 /3 वेळा थोपटून घ्या ह्या मुळे केक मध्ये हवा राहणार नाही

  3. 3

    180 डिग्रीला मायक्रोवेव्ह 10 मिनिटे प्रीहिट करून घ्या,20 मिनिटे मायक्रोवेव्ह कनवेशन मोडला केक बेक करून घ्या आता केक सुरी घालून चेक करा आपला केक बेक झाला की नाही केक थंड झाल्यावर 2 भाग सुरीने कापून करून घ्या

  4. 4

    2 कप थंड विपक्रिम घेऊन घट्ट होईपर्यंत फेटा हॅन्ड ब्लेडरला फोटो मधे दाखवले प्रमाणे गोलाकार आला पाहिजे म्हणजे आपली क्रिम रेड्डी आहे असे समजावे

  5. 5

    4 टेबलस्पून पाणी घेऊन 2 टीस्पून साखर घालून उकळून घ्यावे आपले शुगर सिरप तयार थोडे थंड झाल्यावर मॅगो ईमोलसिनचे 3/4 थेंब टाकून चांगले मिक्स करून घ्या

  6. 6

    केक पुठ्ठा घेऊन मधोमध एक केक स्लाइस ठेवून त्यावर ब्रशने शुगर सिरप लावावे नंतर विप क्रिम सर्व बाजूनी पसरवून लावावे वरतुन आंबा फोडी घालून घ्या

  7. 7

    आता केक चा 2 भाग अलगदपणे ठेवून परत एकदा शुगर सिरप लावावे आणि क्रिम लावून केकची आयसिग फिनीशीगं करून घ्या

  8. 8

    आयसिगं झाल्यावर केक 2 तास सेटिंग साठी फ्रीजमध्ये ठेवा

  9. 9

    आंब्यांचे पातळहर लांब काप करून घ्या केकच्या कडेकडेने गोलाकार आकारात आंबा स्लाइस लावून घ्या गुलाबाचे पाकळ्या प्रमाणे

  10. 10

    रोझ आकाराचे नोझल घ्या आयसिंग बॅग घेऊन त्यामध्ये मॅगो खायचा रंग व विपक्रिम घालून केकच्या बाजुने डिझाईन करून घ्यावी व सोनेरी रंग गोळ्या घालून केक सजवा आता फ्रीजमध्ये 4 तास सेटिंग साठी ठेवा आपला मॅगो रोझ केक खाण्यासाठी तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anita sanjay bhawari
Anita sanjay bhawari @cook_19997427
रोजी
Chinchawad pune

टिप्पण्या

Similar Recipes