पोटाॅन्चो - मेक्सिकन रेसिपी 💕 (potancho recipe in marathi)

Seema Dengle
Seema Dengle @cook_25283058

ही रेसिपी एक स्टार्टर आहे. यात पोटॅटो म्हणजेच बटाटे असल्यामुळे या रेसिपीला पोट यांचे हे नाव मिळाले आहे.

पोटाॅन्चो - मेक्सिकन रेसिपी 💕 (potancho recipe in marathi)

ही रेसिपी एक स्टार्टर आहे. यात पोटॅटो म्हणजेच बटाटे असल्यामुळे या रेसिपीला पोट यांचे हे नाव मिळाले आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५-३० मिनिटे
  1. 1कांदा
  2. 1हिरवी मिरची
  3. 1/2 वाटीकॉर्न
  4. 1/2 कपरवा
  5. 1हिरवी सिमला मिरची
  6. 1पिवळी सिमला मिरची
  7. 2बटाटे उकडलेले
  8. 2 कपदूध
  9. कोथिंबीर

कुकिंग सूचना

२५-३० मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम अर्धा चमचा तेल टाकून रवा भाजून घ्या. दोन-तीन मिनिट भाजल्यानंतर त्यात ३/४ कप दूध टाकून शिजवून घ्या. त्यानंतर त्यात उकडलेले मॅष बटाटे मिक्स करून घ्या. त्यात मीठ, ब्लॅक पेपर पावडर हिरवी मिरची, कोथिंबीर, चिली फ्लेक्स हे सर्व साहित्य टाकुन एक छानसा घट्ट गोळा मळून घ्या.

  2. 2

    आता या गोळ्याचे टिक्की सारखे गोल गोल गोळे बनवून घ्या.याला पोटाचो असे म्हणतात. आपल्या सर्विंग डिश ला साजेसा असा आकार द्या.आणि तेलात हे कुरकुरीत तळून घ्या.

  3. 3

    आता स्टफिंग ची तयारी.... एक टेबल स्पून पॅनमध्ये बटर घेऊन त्यात एक बारीक चिरलेला कांदा परतवून घ्या.त्यानंतर त्यात बारीक चिरलेली सिमला मिरची दोन्ही रंगाची टाकून पुन्हा एकदा फ्राय करा त्यानंतर बाॅइल केलेला मका टाकून पुन्हा एकदा फ्राय करा. चवीपुरते मीठ टाका.त्यानंतर त्यात दोन चमचे मैदा टाकून अगदी हलकेसे दोन मिनिटावर मैदा भाजून घ्या. त्यानंतर त्यात पण १/४ दूध टाकून शिजवून घ्या. अगदी व्हाईट सॉस सारखे तयार होईल.आता यात दोन टेबलस्पून सालसा साॅस एक टेबल स्पून टोमॅटो केचप टाका अशा प्रकारे स्टफिंग तयार झा

  4. 4

    आता प्लेटिंग करायला घेऊया. आपण बनवलेले कुरकुरीत पोत्यांचे सर्विंग डिशमध्ये ठेवून घ्या. त्यानंतर आपण वरील बनवलेले. फिलिंग एक चमचा त्यांच्यावर ठेवा त्यानंतर मेयॉनीज सॉस मध्ये दूध टाकून ते थोडेसे पातळ करून घेऊन त्या फिलिंग वर एक एक चमचा टाका. त्यानंतर आणखी थोडासा साल्सा सॉस वर ठेवा आणि कोथंबीर वर ठेवून गार्निश करा अशाप्रकारे अतिशय सुंदर अशी मेक्सिकन रेसिपी पोटाॅन्चो तयार आहे. नक्की करून बघा लहान मुलांना अतिशय आवडेलच.. खूपच डिलिशियस.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Seema Dengle
Seema Dengle @cook_25283058
रोजी

Similar Recipes