फ्राईड चिल्ली गार्लिक श्रिम्प (Fried Chilli Garlic Shrimp Recipe in Marathi)

Anuja P Jaybhaye
Anuja P Jaybhaye @cook_21664622

नमस्कार मंडळी 🙏
चवीचे खाताय ना....
अहो खाल्लेच पाहिजे......
तर,
एवढं लांबलचक आणि इलायती नाव वाचून भुवया उंचावल्या ना....🙄
..
अहो काही नाही ओ अगदी साधी, सोप्पी, पटकन होणारी ही मस्त चटकदार डीश आहे.
स्टार्टर म्हणून तर धम्माल आणणारी रेसिपी.😋😋😋😋
विंग्लीश नाव दिलं की कसं एकदम असं Sophisticated वाटतं ना म्हणून आपलं......😉😉😉😉
...
कोळंबी तशी लहान-मोठे अगदी आवडीने खातात.
मग ती रस्यात असो वा तळलेली....
..
कोळंबी एक जलचर प्राणी आहे.
त्याला वाळवुन सोडे बनवतात. हे गोड्या पाण्यात तसेच खाऱ्या पाण्यातही वाढतात.

याचे उत्पादन मत्स्यशेतीत मोडते.
..
चला तर पाहू ' देशी रेसिपी ला विदेशी खमंग ' आणणारी आपली आजची रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

९ ते १० मिनीटे
  1. २०-२५ मोठ्या आकाराची कोळंबी
  2. 7-8पाकळ्या लसूण
  3. 2 टेबलस्पूनचिली सॉस
  4. 1 टेबलस्पूनमिक्स हब्स
  5. 1 टेबलस्पूनबारीक चिरलेली कोथिंबीर
  6. 1 टेबलस्पूनबारीक चिरलेली पार्सली (Optional)
  7. 1/2लिंबाचा रस
  8. चवीनुसारमीठ
  9. तेल

कुकिंग सूचना

९ ते १० मिनीटे
  1. 1

    प्रथम कोळंबी साफ करून स्वच्छ धुवून घ्यावी. (मी इथे एका व्यक्तीसाठी ही रेसिपी बनवत असल्याने कोळंबी पासून सगळ्यांचे प्रमाण अर्धे घेतले आहे.)

  2. 2

    एका बाऊल मध्ये लसूण पाकळ्या किसून घेऊन त्यात चिली सॉस, मिक्स हब्स, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली पार्सली, लिंबाचा रस, चवीनुसार मीठ आणि १ टेबलस्पून तेल घालून त्यात साफ करून स्वच्छ धुतलेली कोळंबी घालून छान मिक्स करून घ्यावे. आणि याला १० मिनीटांसाठी मेरिनेट होण्यासाठी ठेवावे. (साहित्य वरील प्रमाणाने)

  3. 3

    एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मेरिनेट केलेली कोळंबी एक एक करून ठेवावी आणि मध्यम आचेवर छान तळून घ्यावी. (ओव्हरकुक करू नये)

  4. 4

    आपण ज्या बाऊल मध्ये कोळंबी मेरीनेट करून ठेवली होती त्यात २-३ कोबीची पाने (इथे तुम्ही सलाड पाने ही वापरू शकता) स्वच्छ धुवून हातानेच मोडून घालावीत आणि बाऊलला जो मसाला लागलेला असेल तो त्या पानांनी पुसून घेऊन मग ती पाने सर्व्हींग डीश मध्ये ठेवून त्यावर तळलेली कोळंबी सजवावी. आपले "quick fried chilli garlic shrimp" तयार. धन्यवाद 🙏

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anuja P Jaybhaye
Anuja P Jaybhaye @cook_21664622
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes