इनस्टंट चकली (instant chakali recipe in marathi)

Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
Kalyan

#रेसिपीबुक #week15
#चकलीआणिजिलबीरेसिपीpost1

दिवाळी म्हटली की डोळ्यासमोर काही विशेष असे दिवाळीचे पदार्थ येतात. त्यातील एक म्हणजे चकली.मग अश्या ह्या चकली शिवाय जणू दीवाळी पूर्ण कशी होणार.तसे पाहिले तर आता हे पदार्थ वर्षभर केव्हाही दुकानात तयार मिळतात व आणून खाल्ले ही जातात पण तरीही दिवाळीत चकली ही झालीच पाहिजे.

पारंपारिक भाजाणीची चकली,तांदळाची चकली,रव्याची चकली,पालक चकली, टॉमेटो ची चकली,शेज्वान चकली अश्या विविध पाककृती करून आपण ह्या चालीत देखील वेरीएशन करु शकतो .

खमंग व खुशखुशीत व तेवढीच कुरकुरीत चकली तयार करण्यासाठी चकली व्यवस्थित तळली जाणे खूप महत्त्वाचे आहे.म्हणजेच त्यासाठी थोडे कष्ट घेतले की चकली नक्कीच खमंग व खुशखुशीत होणार चला तर आज आपण अशीच खमंग व खुशखुशीत इंनस्टंट चकली ची रेसिपी पाहुया.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

६० मिनिटे
  1. 2 कपतांदळाचे पीठ
  2. 1/2 कपचण्याचे पीठ
  3. 1/4 कपपोहे भाजून केलेले पीठ
  4. 1/4उडदाची डाळ भाजून केलेले पीठ
  5. 1आणि १/२ टेबलस्पून लाल मिरची पावडर
  6. 1 टीस्पूनहळद
  7. 1 टेबलस्पूनघणे पावडर
  8. 1 टेबलस्पूनजीरे पावडर
  9. 1 टीस्पूनओवा
  10. 2 टेबलस्पूनबटर
  11. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

६० मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम पोहे आणि उडदाची डाळ वेगवेगळी भाजून त्याचे मिक्सर ला पीठ करून घ्या.

  2. 2

    एका बाउल मध्ये तांदळाचे पीठ,चण्याचे पीठ,उडदाचे पीठ व पोह्याचे पीठ एकत्र करून घ्या.

  3. 3

    आता पीठात लाल मिरची पावडर, हळद,ओवा,घणे पावडर, जिरे पावडर व मीठ घालून एकत्र करून घ्या.

  4. 4

    तयार पीठात बटर घालून ते व्यवस्थित पिठालात मिक्स करावे म्हणजे पीठाला क्रमबल्ड (रवाळ) टेक्सचर येईल.

  5. 5

    आता ह्यात थोडे थोडे पाणी घालून त्याचा थोडाफार घट्टसर पीठ भिजवून घ्या.(एकदम घट्ट पण नाही आणि सैलही नको)म्हणजे चकलीला काटा चांगला येईल.

  6. 6

    तयार पीठाचा थोडा गोळा घेऊन चकली च्या साच्याला तेलाचा हात लावून त्यात पीठ भरुन पेपर वर चकल्या पाडाव्यात.

  7. 7

    आता कढ‌ईत मध्यम आचेवर तेल गरम करून चकल्या तळून घ्या.तळताना चकली वर येते व तळाला चकली जाऊन बसली की चकली झाली आहे असे समजावे.

  8. 8

    ह्या प्रमाणे सर्व चकल्या कूरकुरीत तळून घ्याव्यात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
रोजी
Kalyan

Similar Recipes