खेरू(दही तडका) (kheru recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#उत्तर #हिमाचल प्रदेश
#हिमाचल प्रदेशात एकदम आवडणारा पदार्थ तुम्ही करून बघा छान लागतो.

खेरू(दही तडका) (kheru recipe in marathi)

#उत्तर #हिमाचल प्रदेश
#हिमाचल प्रदेशात एकदम आवडणारा पदार्थ तुम्ही करून बघा छान लागतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपदही
  2. 1.5 कप पाणी
  3. 3-4लाल मिरच्या
  4. 1 टीस्पूनधणे
  5. 1 टीस्पूनजीरे
  6. 1/4 टीस्पूनहिंग
  7. 1/2 कपउभा चिरलेला कांदा
  8. 2 टीस्पूनलसूण बारीक चिरलेला
  9. 2 टीस्पूनहिरवी मिरची बारीक चिरलेली
  10. 1/2 टीस्पूनहळद
  11. 1 टीस्पूनलाल मिरची पावडर
  12. 1 टीस्पूनधणेपुड
  13. 3 टेबलस्पूनतेल
  14. 10-12काड्या पातळ चिरलेले आले
  15. 2 टेबलस्पूनबारीक चिरलेली कोथिंबिर

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    दही छान घुसळुन घ्या त्यात दिड कप पाणी घाला जर दही पातळ असेल तर पाणी कमी घाला.

  2. 2

    कांदा,लसुण, हिरवी मिरची,कोथिंबीर बारीक चिरून घेणे. आल पातळ कापून घेणे.

  3. 3

    कढईत 3 टेबलस्पून तेल तापत ठेवणे तापले कि लाल मिरची घाला 1 मिनिटाने धणे, जीरे घाला ते झाले कि चिरलेला कांदा, लसुण, हिरवी मिरची घाला व कांदा लालसर होईस्तो परतत रहा.

  4. 4

    कांदा झाला कि त्यात हळद,तिखट,धणेपुड घाला नि छान परतून घ्या आता गॅस बंद करा थोड्या वेळाने त्यात पळीभर दही घाला ती चमच्याने फिरवा परत थोडे घाला जेणेकरून कढई थंड होईल नि दही फुटणार नाही.आता सर्व दही घाला नि एका दिशेने दही पाच मिनिटे फिरवत रहा.आल टाका.

  5. 5

    आता गॅस मंद चालु करा नि पाच मिनिटे तसेच दही एका दिशेने फिरवत रहा.गॅस बंद करा नि त्यात कोथिंबीर घाला हिमाचल प्रदेश चे खेरू तयार आहे कुठल्याही ज्वारी,मका,चपाती बरोबर किंवा भाता बरोबर ही खायला देऊ शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes