गोड शंकरपाळे (god shankarpale recipe in marathi)

Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154

#अन्नपूर्णा #गोड शंकरपाळे
ही माझी शंभरावी रेसिपी आहे .टी पोस्ट करताना मला खूप आनंद होतो आहे.
आज मी गोड शंकरपाळे बनवले. अतिशय खुसखुशीत झाले आहे. अगदी बिस्किटा सारखे. माझ्या मुलांना व सुनेला खूप आवडतात.

गोड शंकरपाळे (god shankarpale recipe in marathi)

#अन्नपूर्णा #गोड शंकरपाळे
ही माझी शंभरावी रेसिपी आहे .टी पोस्ट करताना मला खूप आनंद होतो आहे.
आज मी गोड शंकरपाळे बनवले. अतिशय खुसखुशीत झाले आहे. अगदी बिस्किटा सारखे. माझ्या मुलांना व सुनेला खूप आवडतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

एक तास
चार व्यक्ती करिता
  1. 1/2 किलोमैदा
  2. 1 वाटीदूध
  3. 1 वाटीसाखर
  4. 1 वाटीसाजूक तूप
  5. 1/4 टीस्पूनमीठ
  6. 1 टेबलस्पूनवेलची पावडर
  7. तळण्याकरता तेल
  8. 1/2 वाटीपाणी

कुकिंग सूचना

एक तास
  1. 1

    सर्वप्रथम गॅस वर एका नॉनस्टिक कढईमध्ये दूध घाला. आता यात साखर घाला. साखर पूर्णपणे विरघळून घ्या. आता यात साजूक तूप घाला. अर्धा वाटी पाणी घाला.

  2. 2

    आता या मिश्रणाला उकळी आल्यावर त्यात मीठ घाला. कढई खाली उतरवून घ्या.

  3. 3

    आता कडे मध्ये थोडा थोडा मैदा घालावा व सतत ढवळत रहा. मैदा घालून त्याचा घट्ट गोळा झाला पाहिजे.

  4. 4

    हा गोळा वीस मिनिटे झाकून ठेवा. आता या गोळ्याचे मीडियम साईज बॉल्स बनवा.एक एक गोळा लाटून घ्या.आता या पोळीचे चौकोनी काप पाडा.

  5. 5

    आता कढई मधे तेल मंद तापत ठेवा.तापल्यावर त्यात कापलेले शंकरपाळी लो आचेवर गुलाबी रंगावर तळून घ्या.पूर्ण थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा. फराळ रेसिपी शंकरपाळी तयार आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154
रोजी
cooking and serving with love is my passion.
पुढे वाचा

टिप्पण्या (4)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोहिणी ताई मी तुमची गोड शंकरपाळे ही रेसिपी बनवली( कुकस्नॅप ) खुप छान टेस्टी झाली👌😋
धन्यवाद रोहिणी ताई

Similar Recipes