ओल्या तुरीच्या दाण्याचे लवट (olya tooriche danyachi lavat recipe in marathi)

Monali Modak
Monali Modak @cook_23792152

#GA4
#week13
Keyword _ तुवर

ओल्या तुरीच्या दाण्याचे लवट (olya tooriche danyachi lavat recipe in marathi)

#GA4
#week13
Keyword _ तुवर

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20-25 मिनिटे
8 घटक
  1. 2 वाटी ओल्या तुरीचे दाणे
  2. 5-6 हिरव्या मिरच्या
  3. 1 वाटी कोथिंबीर बारीक चिरलेली
  4. 2-3 चमचे तिखट लाल
  5. 1/2 चमचाहळद
  6. 1/2 चमचागरम मसाला
  7. 2 चमचेलसुन,अद्रक,जीरा पेस्ट
  8. 1 वाटी ज्वारीचे पीठ
  9. 4 चमचेफोडणीसाठी तेल
  10. बारीक चिरलेला कांदा
  11. बारीक चिरलेला टोमॅटो
  12. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

20-25 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम ओल्या तुरीचे दाणे काढून घ्या आणि स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.

  2. 2

    मिक्सरच्या भांड्यात स्वच्छ धुऊन घेतलेले हिरवे तुरीचे दाणे आणि त्यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या अर्धा वाटी कोथिंबीर चवीनुसार मीठ घालून घ्या.

  3. 3

    अर्धा चमचा लसूण, अद्रक आणि जीरा ची पेस्ट घाला आणि त्याला मिक्सर मधून बारीक करून घ्या.

  4. 4

    मिक्सर मधून काढलेल्या बारीक मिश्रणात एक वाटी ज्वारीचे पीठ घालून मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून ठेवा.

  5. 5

    आता दुसरीकडे आपण ग्रेव्ही करण्यासाठी फोडणी तयार करून घेऊयात त्यासाठी एका कढईमध्ये तेल गरम करायला टाका. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जीरा घालून तडतडू द्या आणि त्याला मध्येच बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून घ्या.

  6. 6

    आता लसुन, जीरा, अद्रक ची पेस्ट, एक चमचा त्यामध्ये दोन तीन चमचे लाल तिखट घाला आणि अर्धा चमचा हळद घालून घ्या.

  7. 7

    आता त्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालून घ्या आणि आता ग्रेव्हीसाठी पाणीदेखील सोडा चवीनुसार मीठ घालून घ्या.

  8. 8

    ग्रेव्हीला चांगल्या प्रकारे दोन ते तीन उकळी आल्यावर त्यामध्ये बनविलेल्या मिश्रणाचे गोळे करून शिजवून घ्या. दहा ते पंधरा मिनिट भाजी शिजवून घ्या.

  9. 9

    भाजीवर कोथिंबीर मिक्स करून त्याला खाण्यास सर्व करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Monali Modak
Monali Modak @cook_23792152
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes