सुखी अरबी मसाला (sukhi arbi masala recipe in marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

सुखी अरबी मसाला (sukhi arbi masala recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंचवीस मिनिट
2 सर्व्हिंग
  1. 250 ग्रॅमअरबी
  2. 2छोटे कांदे
  3. 7-8 कढीपत्ता पाने
  4. 2 टीस्पूनलाल तिखट आवडीने कमी अधिक करू शकता
  5. 1 टीस्पूनगरम मसाला
  6. 1 टीस्पूनतीळ
  7. 1/2 टीस्पूनहळद
  8. 1/4 टीस्पूनओवा
  9. 1/2 टीस्पूनजीरे
  10. 1/2 टीस्पूनमोहरी
  11. 1 टीस्पूनआमचूर पावडर
  12. 1-1/2 टीस्पूनमॅगी मसाला
  13. 1 टेबलस्पूनधना पावडर
  14. 1 टीस्पूनमीठ
  15. 3 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

पंचवीस मिनिट
  1. 1

    आधी अरबी कुकरला लावून एक शीटी काढून घ्या. कुकरची वाफ नीघू द्या. सगळे साहित्य जमा करून घ्या.

  2. 2

    अरबी ताटात काढून घ्या.अरबीची साल काढण्याआधी हाताला तेल लावून मगच सालून व तुकडे करून घ्या. कांदा चीरून घ्या. कढईत तेल घालून गरम करा.आता त्यात मोहरी,जीरे,ओवा,तीळ घालून घ्या.

  3. 3

    तडतडले की कढीपत्ता व कांदा घालून परतून घ्या. आता त्यात तिखट,मीठ,हळद,गरम मसाला,मॅगी मसाला,धनि पावडर,आमचूर पावडर घालून घ्या परतून घ्या.

  4. 4

    आता अरबी घालून परतून घ्या व दोन मिनिट झाकण झाकण ठेवून वाफ काढून घ्या. गरमा गरम सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes