मलबारी अप्पम् विथ पोटॅटो स्टयू (appam with potato stew recipe in marathi)

#BFR माझ्या भावाचं लव्ह मैरेज झालं आहे. माझी वहिनी केरळ ची आहे .तशी ती म्हणायला केरळ ची आहे. पण, लहानपणापासून हैदराबाद ला राहिल्यामुळे केरळी तसंच तेलगू सुद्धा रेसिपीज तिला माहिती आहे. त्यामुळं, भावाची पर्यायाने आमची सुध्दा चांदीच चांदी झाली. लग्नाच्या बोलणीसाठी हैदराबाद ला गेल्यावर त्यांच्या घरी अप्पम् आणि स्ट्यू पहिल्यांदा चाखला आणि आम्ही सगळे अक्षरशः त्याच्या प्रेमात पडलो.
मग काय! तिथल्याच एका भल्या मोठ्ठ्या मॉलमधल्या भांड्याच्या दुकानात (🙄😂) अप्पाचेट्टीची यथासांग खरेदी पार पडली. अप्पाचेट्टी म्हणजे अप्पम् बनवण्यासाठी लागणारं छोटं उथळ / खोलगट कढईवजा पात्र! माझं लग्न काही महिन्यांवर आल्यामुळं माझ्यासाठीही मला एक मिळालं. लग्नानंतर मात्र मी अप्पाचेट्टी चांगलीच चेपेतोवर वापरली आणि अजूनही वापरते आहे.
अप्पम् हा जाळीदार डोशाचा प्रकार आहे जो मधोमध इडलीसारखा हलका जाड आणि बाजूने अगदी पेपर डोसाच! यीस्ट घालून फर्मेंट केल्याने त्याची चव आणि गुणधर्मांमध्ये खूपच फरक पडतो. पूर्वी जेव्हा यीस्ट चा शोध लागला नव्हता तेव्हा त्यात नारळाचं पाणी घालून फर्मेंट केलं जायचं. पावासारखे मऊ, लुसलुशीत, जाळीदार, हलके आणि चवीला किंचित गोडसर असणारे हे अप्पम् खरंतर व्हेज / नॉनव्हेज स्ट्यू , कुर्मा, अंडाकरी सोबत खातात. "स्ट्यू" ही नारळाच्या दूधातली व्हेज किंवा नॉनव्हेज करी असते. ह्याची चव थोडीफार कोल्हापूरी पांढऱ्या रश्श्याच्या किंवा दूधसाराच्या जवळपास जाते. दूधसारमध्ये मात्र हिरव्या मिरची ऐवजी लाल तिखट वापरतात. चला तर मग बघूया ही नाविन्यपूर्ण दाक्षिणात्य रेसिपी !
कुकिंग सूचना
- 1
सगळयात आधी, तांदूळ स्वच्छ धुऊन पाच ते सहा तासांसाठी भिजत घालावे. नंतर वाटून घेताना थोडे पोहे, थोडं ओलं खोबरं आणि ईस्ट घालून गुळगुळीत वाटून घ्यावे.
- 2
पोहे भिजत घालण्याची आवश्यकता नाही. वाटलेलं मिश्रण ७ - ८ तास रुबवण्यासाठी ठेवून द्यावे.
- 3
पोटॅटो स्ट्यू बनवण्यासाठी सर्वात प्रथम एका छोट्या पातेल्यात २ वाट्या पाणी गरम (उकळवून अपेक्षित नाही) करावे आणि त्यात नारळाच्या दूधाची पावडर विरघळवून घ्यावी. हे झाले नारळाचे दूध तयार! मी इथे पावडर वापरली आहे. तुम्हांला जमत असल्यास नारळ खोवून त्यापासून बनलेले दूध ही वापरु शकता.
- 4
नंतर; ओलं खोबरं + आलं + लसूण + हिरव्या मिरच्यांचे वाटण काढावे. एका कढल्यात, तेल गरम करून हिंग आणि अख्ख्या खड्या मसाल्याची फोडणी करावी. त्यातच, बारीक चिरलेला कांदा तळसून घेऊन वाटण घालून तेही नीट परतवून घ्यावे.
- 5
तयार नारळाचे दूध + १ वाटी नेहमीचे दूध + १ वाटी पाणी वाटणात ओतून मिक्स करावे. नंतर त्या आधणात बटाट्याच्या फोडी, चवीनुसार मीठ आणि गरम मसाला घालून नीट ढवळून बारीक गॅसवर शिजू द्यावे. (गरम मसाल्याने पांढऱ्या करीला झणझणीतपणा येतो.) कढीप्रमाणे पळीने ढवळत ढवळत उकळावे. दूध + मीठामुळे जर रटरटीत शिजवला तर स्ट्यू फाटू शकतो. आपला पोटॅटो स्ट्यू तयार आहे.
- 6
अप्पाचेट्टी गॅसवर तापत ठेवावी. (त्याऐवजी, कोणतीही कान असलेली खोलगट छोटी कढई वापरू शकता). त्या दरम्यान, थोडं फर्मेंटेंड पीठ एका दुसऱ्या भांड्यात काढून त्यात चवीनुसार मीठ आणि २ चिमुटभर बेकिंग सोडा घालून एकाच दिशेने फिरवून मिक्स करावे.
- 7
भांडं तापल्यावर १ पळीभर अप्पम् पीठ ओतावे. पटकन कढई दोन्ही कानांना पकडून पीठ कढई भर गोलाकार फिरवावे. कडांना काही थेंब तेल सोडून १ मिनीटभरासाठी झाकण लावून शिजवावे.
- 8
आपले अप्पम् तयार आहेत.
- 9
तयार अप्पम् स्टयू सोबत सर्व्ह करावे.
प्रतिक्रिया
Top Search in
यांनी लिहिलेले
Similar Recipes
-
गुलाबी नारळीपाक (narali pak recipe in marathi)
गुलाबी नारळीपाक#रेसिपीबुक #week8नारलीपौर्णिमा आली की नारळाच्या वड्या करायचं ठरतंच.कधी पांढऱ्या,तर कशी पिवळ्या (केशर किंवा आंब्याचा पल्प घालून )तर ,कधी पोपटी(विड्याचे पान घालून), तर कधी गुलाबी(गाजर किंवा बीट पल्प घालून) मी या वड्या करते.यावेळी बीट घालून केल्या आहेत.घ्या साहित्य जमवायला. नूतन सावंत -
वेज मसाला ब्रेड विथ टोमॅटो चटणी (veg masala bread with tomato chutney recipe in marathi)
#सँडविच # आज शनिवार... त्यामुळे नॉनव्हेज नाही... म्हणून मग आज बनवले आहे व्हेज मसाला ब्रेड, टोमॅटोची चटणी सोबत.. झटपट होणारे आणि गरमागरम.. आणि पटकन संपणारे... Varsha Ingole Bele -
आंबट बटाटा-रस्सा भाजी (Ambat Batata Rassa Bhaji Recipe In Marathi
#JLR#लंच_रेसिपीस#आंबट_बटाटा_रस्सा_भाजीनवीन वर्षाच्या सुरुवातीला छान सात्विक जेवण बनवलं. ३१ डिसेंबरला भरपूर प्रमाणात व्हेज नॉनव्हेज जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर, दुसऱ्या दिवशी म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी छान सात्विक जेवण बनवलं. वरण भात बासुंदी पुरी श्रीखंड आणि भाजी मधे छान चविष्ट आंबट बटाटा भाजी केली. या आंबटगोड भाजीमुळे जेवणाची रंगत वाढली. भात, चपाती, पुरी कशाबरोबर पण खायला एकदम मस्तच लागते. करायलाही अगदी सहज सोपी आणि चविष्ट अन् झटपट तयार होणारी आंबट बटाटा या भाजीची रेसिपी पुढे देत आहे. Ujwala Rangnekar -
गुळ पोहे (gul pohe recipe in marathi)
आज सात जून ...व्हॉटसअप वर सगळीकडे जागतिक पोहे दिन ...असा मेसेज सकाळीच आला...म्हटलं पोह्याचा एकतरी प्रकार दिवसभरात झालाच पाहिजे....पटकन होणारे आणि मला आवडणारे गुळ पोहे केले. खरं तर हे गुळ पोहे दिवाळीच्या पहिल्या दिवशी.... नरकचतुर्दशीच्या पहाटेला खाण्याची पद्धत आहे.पण बरेचदा गणपतीला किंवा देवीच्या नेवैद्याला देखील हे बनवतात. Preeti V. Salvi -
मऊ जाळीदार अप्पम आणि चटणी (Appam Chutney Recipe In Marathi)
#SIR साऊथ इंडियन रेसिपीज साठी मी माझी मऊ जाळीदार अप्पम ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
खोबर्याच्या वड्या (खोपरा पाक) (khobryachya wadya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 #सात्विकश्रावण महिन्यात येणा-या नारळी पौर्णिमेला प्रामुख्याने केली जाणारी आणि सर्वांची आवडती मिठाई खोबर्याच्या वड्या. एरवी पण कधीही आनंदाच्या प्रसंगी करायला अगदी सोपी आणि झटपट होणारी अशी ही मिठाई आहे. अगदी कमी साहित्यात आणि खूप कमी वेळात अप्रतिम चवीच्या खोबर्याच्या वड्या बनवता येतात. या खोबर्याच्या वड्यांची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
शेवय्या पायसम (sheviya paysam recipe in marathi)
#दक्षिण #केरळ पायसम किंवा पायस हा दुग्धजन्य खाद्यपदार्थ आहे. खीरीचा हा प्रकार सहसा केरळ व आसपासच्या प्रदेशांत प्रचलित आहे. Aparna Nilesh -
आंब्याचे सांदण(aambyache sandan recipe in marathi)
#मँगो#मँगोमेनीयाआंब्याचे सांदण किंवा स्टीम हेल्दी मँगो केक हा कोकणातील पारंपारिक पदार्थ आहे.हा पारंपारिक पदार्थ स्टीम करतात, ह्यात सोडा किंवा बेकिंग पावडर काही घालत नाही!!!!....मी ह्यामध्ये केकचे टेक्शर येण्यासाठी म्हणून इनो फ्रुट साॅल्ट वापरले आहे.मँगो, रवा, गूळ, ओलं खोबरं आणि खोबऱ्याचे दूध वापरून बनविलेला हा हेल्दी केक नक्कीच ट्राय करा....!!!!! Priyanka Sudesh -
डोनट (donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबरweek- 3 माझी ही डोनट ची 3 री रेसिपी आहे.पहिल्यावेळी घरगुती यीस्ट तयार करून केलेले. नंतर मी नेहमी करते ते ,अंड्याचे डोनट बनवलेले.आता तयार यीस्ट वापरून डोनट तयार केले. यावेळी छान नक्षी काढली. फुलांचे डोनेट तयार केले. Sujata Gengaje -
फरसबीची तळासणी (Farasbi Chi Bhaji Recipe In Marathi)
#BR2 फरसबी ही एक अशी भाजी आहे की जी सर्वांना आवडते आणि खूप डिशमध्ये हिचा उपयोग करता येतो. व्हेज कुर्मा, पुलाव, कोशिंबीर, सुकी भाजी, कटलेट्स ,टिक्की सर्व ठिकाणी चालते .अशी ही एव्हरग्रीन भाजी आज आपण अगदी कमी साहित्यात पण तितकीच चविष्ट अशी करून बघूया. ही रेसिपी मंगलोरी आहे Anushri Pai -
व्हेज पोटॅटो फिश (veg potato fish recipe in marathi)
#pe#व्हेज पोटॅटो फिशबटाट्यापासून इतके छान छान पदार्थ करता येतात. मुलांना आवडतातच मोठ्यांनाही आवडतात. आमच्याकडे बटाटा सर्वांना आवडतो. आज बटाट्याचा दर वेगळे व्हर्जन ट्राय केलं. दिसायला व नावानेही नॉनव्हेज दिसतं. पण चव अप्रतिम आहे यात शंकाच नाही Rohini Deshkar -
शहाळे मालपुआ विथ शहाळे रबडी(shahale malpua with shahale rabadi
#रेसिपीबुकमला रबडी,मालपुआ प्रचंड आवडतो.त्याच्यात बरेच वेगवेगळे फ्लेवर्स मी बनवते.एकदा मी शहाळे रबडी केलेली आणि शहाळे घालून मालपुए केले.इतके प्रचंड आवडले मला आणि घरात सगळ्यांनाच ...मग मी बऱ्याचदा काही स्पेशल ओकेजनला हे अवश्य बनवतेच. Preeti V. Salvi -
एग विथ पोटेटो ऑमलेट (अफगानी ब्रेकफास्ट) (egg with potato omelette recipe in marathi)
#pe: अंडी आणि बटाटे घेऊन बनवलेले हे अफघनीऑमलेट हेल्दी तर आहेआणि बनवला सुद्धा अगदी सोप्पे आहे. सद्याच्या काळात बघितल त कळेल की सकाळच्या breakfast पासून लंच आणि डिनर तर मेन्यू गोड किव्हा तिखट, व्हेज नॉनव्हेज किंव्हा लग्नाची आणि बर्थडे (🎂) पार्टी असो त्या मध्ये अंडी आणि बटाटे प्रथम मेन्यू बनवाला घेतो.मी थोड इंडियन टच हया रेसिपी ला दिले आहे . ग्रीन चीली आणि गार्लिक बारीक कापून घेतले आहे.अशे प्रोटीन, मिनरल आणि व्हिटॅमिन नी भरपूर हेल्दी पोटेटो का कमाल और अंडे का फंडा बनवून दाखवते. Varsha S M -
हेल्दी एग पोटॅटो मोमोज (egg potato momos recipe in marathi)
#peबटाट्यासोबत अंडे हे काॅम्बिनेशन खूप छान लागते आणि ते जर चटपटीत बनवल असेल तर मग झटपट संपत ही. चला तर मग बनवूयात एग पोटॅटो मोमोज तेही गव्हाचे पीठ वापरून. Supriya Devkar -
पायसम
#दक्षिणभारत#केरळ#onam special parippu payasam# केरळ मधे डेझर्ट म्हणुन स्पेशल डिश आहे,चला तर मग बघु या याची रेसिपी Anita Desai -
अप्पम / जाळईदार पलपम (appam recipe in marathi)
#GA4#week4 अप्पम /जाळईदार पलप्लम ही रेसपी केरळ ची आहे छान सा प्ट आणि स्पंजी असे अप्पम तयार होतात Prabha Shambharkar -
रेस्टॉरंट स्टाईल कोफ्ता करी (kofta curry recipe in marathi)
#rr#रेस्टॉरंट स्टाईल कोफ्ता करीआज रविवार त्याच्यामुळे स्पेशल मेनू असतो आमच्याकडे. पण यामुळे भाजी चां प्रॉब्लेम होता. घरी कांदे-बटाटे असतातच, मग काय आठवली एका रेस्टॉरंट मध्ये खाल्लेली बटाट्याची कोफ्ता करी इन कोकोनट मिल्क.ही भाजी इतकी भन्नाट झाली की वाटले रेस्टॉरंट मधून पार्सल आलंय.खूप छान रेसिपी आहे यात शंकाच नाही. या भाजीला मी हेल्दी वर्जन दिलेला आहे म्हणजे मी आप्पे पात्र होते भाजलेले आहेत. Rohini Deshkar -
केरळ स्टाईल इडली-सांबर (idli sambar recipe in marathi)
#cr#कॉम्बो_रेसिपीज काही वर्षांपूर्वी आम्ही केरळ ला फिरायला गेलेलो, खरंतर तिथल्या एका शहरापासून दुसऱ्या शहरात म्हणजेच आपलं फिरण्याचं ठिकाण यामध्ये इतक्या तासांचं अंतर आहे,ना.... की दिवस प्रवासात आणि रात्र झोपण्यात निघून जायची... खूप छान ठिकाणी फिरलो आम्ही, वळणा- वळणाचे रस्ते, चहाचे मळे, गरम मसाल्याच्या बागा , एलिफंट राईड, जंगल सफारी आणि तिथला पाहुणचार....सगळंच मस्त.... फक्त खूपचं रोड ट्रॅव्हल करावं लागतं..😢 खास करून आम्ही ज्या ज्या हॉटेल मध्ये राहिलो, तिथलं केरळ स्टाईल जेवण म्हणजे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारच आणि ईडी अप्पम,अप्पम, सांबर-राईस #इडली_सांबर, डोसा सांबर हे तिथले काही खास म्हणजे जरी मुंबईत हे पदार्थ मिळत असले, आपण घरी बनवत असलो, तरी साऊथ ला जाऊन खाण्यात जी मजा आहेना ती कुठेच नाही... हे पदार्थ तिथल्या सगळ्याच रेस्टॉरंट मध्ये असायलाच पाहिजे, त्या शिवाय तुमची फूड प्लेट अपूर्णच...!!! आणि शेजारचे केरळी असल्याने लहान पण पासून हे सगळे साऊथ चे खास पदार्थ नेहमी खात आलोय, आणि ही रेसिपी आणि त्यांच्या काही टिप्स माझ्या शेजारच्या "प्रसन्नाकुमार नायर"आंटी ने शिकवलेली...☺️ मग अशा यम्मी केरळ स्टाईल इडली_सांबर ची रेसिपी बघुयात..👌👌 Shital Siddhesh Raut -
त्रिरंगी उकडी च्या सान्ना (UKADICHA SANNA RECIPE IN MARATHI)
#स्टीम गोयंंच्या सान्ना हा एक पारंपारिक पदार्थ. रक्षाबंधन ला हा नारळाचा पदार्थ हमखास बनवला जातो. त्यात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न केला आहे. उकडि चा हा पदार्थ लहानापासुन मोठ्याना देखिल् उत्तम नाश्ता तसेच जेवणासाठी आवडता पर्याय आहे. एरवी माडाची ताडी वापरतात. जर ताडी उपलब्ध नसेल तर यीस्ट वापरुन मिश्रण आंंबवले जाते. Kirti Killedar -
स्विट पोटॅटो मिल्कशेक (sweet potato milkshake recipe in marathi)
#GA4 #week4#milkshakeरताळे, रतनाळ किंवा स्विट पोटॅटो याचे अनेक पदार्थ बनवता येतात. खिर तर नेहमीच बनवतो मात्र मिल्कशेक ही अतिशय स्वादिष्ट आणि पौष्टिक बनते. तसेच पोटभरीचा एक चागंलाच ऑप्शन आहे. Supriya Devkar -
गोवन भरलेले पापलेट फ्राय (goan paplet fry recipe in marathi)
#पश्चिम #गोवागोव्याला मये या गावात आमची कुलदेवी आहे, त्यामुळे कधीतरी गोव्याला जाणे होतेच. तिथे गेल्यावर मग मांसाहारी खादाडी करण्यासाठी जायचो. तिथले ते मांसाहारी जेवण इतके अप्रतिम असे की आम्ही जेवढे दिवस तिथे राहायचो त्यातला एक देवीच्या दर्शनाचा दिवस सोडला तर रोज मांसाहारी जेवणावर आडवा हात मारायचो. मग तिथले ते माश्यांचे प्रकार आणि चव जिभेवर बरेच दिवस रेंगाळत रहायची. त्यातलाच हा एक प्रकार मी तिथे चाखला होता आणि काय ते हिरवी चटणी भरलेलं पापलेट फ्राय अगदी भरपेट खाल्लं होतं आणि तीच चव मी आजच्या या रेसिपीत आणायचा प्रयत्न केला. त्या हिरव्या चटणीची चव पापलेटबरोबर इतकी अप्रतिम लागते, तुम्हीही करून बघा दिवाने व्हाल...... Deepa Gad -
पोटॅटो वेजेस (potato wedges recipe in marathi)
#pe #पोटॅटो वेजेस.. जगभरात मोठ्या प्रमाणावर लागवड केलं जाणारं बटाटा हे पीक..आणि तेवढीच मोठ्या प्रमाणावर आवडीने खाल्ली जाणारी ही भाजी.. . ती मूळची दक्षिण अमेरिकेतील पेरू आणि बोलिव्हिया देशांच्या सीमेवर असलेल्या अँडीज पर्वतातील आहे. सोळाव्या शतकात स्पॅनिश दर्यावर्दींनी ती युरोपात आणली. पोर्तुगिजांनी भारतात पश्चिम किनाऱ्याजवळच्या प्रदेशात बटाट्याची लागवड केली. बटाटा जरी मुळचा भारत देशातील नसला तरी भारत देशात सर्वाधिक जास्त खाल्ला जातो। जिथे कमी तिथे आम्ही या न्यायानुसार आपण रोज स्वयंपाकात बटाट्याचा उपयोग करत असतो. कधी एखादी भाजी कमी असेल तर पुरवठा होण्यासाठी तिच्यात बटाटा घातला जातो तर कधी भाजी आमटीत मीठ जास्त झाले असेल तर ते शोषून घेण्यासाठी बटाटा घातला जातो आणि मग बटाटा खारटपणा शोषून घेऊन त्या भाजीची किंवा आमटीची चव वाढवतो .. बटाटा भाजी न आवडणारी व्यक्ती निराळीच म्हणावी लागेल ..बटाट्यापासून तयार होणारे अक्षरशः शेकडो पदार्थ आहेत. त्यामुळे बटाटा भाजी ला सर्वांच्याच घरात कायम सदस्यत्व बहाल केले गेले आहे आणि हा सर्वांच्या अडीअडचणीला धावून येणारा अगदी जवळचा सदस्य आहे .चला तर मग आज आपल्यासाठी हा जवळचा सदस्य आपल्यासाठी आबालवृद्धांना आवडणारी एक चटपटीत रेसिपी घेऊन आलेला आहे ...पोटॅटो वेजेस.. Bhagyashree Lele -
चीज गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
#बटरचीजगार्लिक ब्रेड बहुतेक सगळ्यांना आवडतो. आणि तो जर घरी बनवलेला असेल तर सोने पे सुहागा. ओव्हनमध्ये गार्लिक ब्रेड भाजताना बटर आणि लसणीचा दरवळ घरभर पसरतो आणि सगळे जण ओव्हन चा टायमर बंद व्हायची वाट बघत बसतात.गार्लिक ब्रेड ची कृती पावासारखीच असते. आणि दुसऱ्या वेळेला पीठ फुलायला लागत नसल्यामुळे पावापेक्षा लवकर होणारी कृती आहे. गार्लिक ब्रेड मध्ये बटर अगदी सढळ हाताने घालावं लागतं. नाहीतर ब्रेड सुका होतो. Sudha Kunkalienkar -
फरसबी+मोडची मटकी भाजी (farasbi ani mataki mix bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7#सात्विकरेसिपीजकमीत कमी साहित्यात,आपल्या विशिष्ट चवीने अतिशय चवदार बनणारी भाजी, म्हणजे फरसबी आणि मोडची मटकीची युती.जेव्हा कांदा लसूण खायचं नसतो तेव्हा फक्त मिरची किंवा मिरची+आलं ठेचा वापरून करता येणारी, आणि ताटात इतर कितीही टक्कर देणारे पदार्थ असले तरीही आपले वैशिष्ट्य जपून बाजी मारणारी.एकदा जिभेला चव लागली की,पुन्हापुन्हा खावीशी वाटणारी.कधी अचानक पाहुणे आलर तरी साहित्य असलं की दहा मिनिटात होणारी भाजी आहे ही. शिवाय तुमचं हमखास कौतुक करणारीमटकी वातुळ असल्याने मी आलं वापरते,पण नसलंच हाताशी तरी नुसत्या मिरच्या वाटून घातल्या तरी चालतात,चव अबाधित राहते. नुसतीच बशीत घालून खायलाही झकास लागते.या भाजीसोबत भाजणीचे वडे तर भन्नाटच लागत,पण वरण भात,पोळी, पुरी,फुलकेही चविष्ट जेवल्याचं समाधान देतात.थोडी मिरची कमी वापरून केली तर परदेशी पाहुणेही ही मटकी,मिटक्या मारत संपवतात.चला तर,घ्या साहित्य जमवायला नूतन सावंत -
काळा चणा करी (Kerala Kaala chana Curry recipe in marathi)
#दक्षिण #केरळया करी नारळ बडिशेप आणि धने पावडर याची मस्त चव येते. Rajashri Deodhar -
फिश करी (fish curry recipe in marathi)
मासा तसा बरेच लोक फ्राय खायला पसंत करतात पण मला मात्र रस्सा आवडतो.कोकमाची काही शी आबंट चव खोबर्याचे वाटण किंवा नारळाच्या दुधाने त्याला एक उत्तम चव येते. चला तर मग बनवूयात फिश करी. Supriya Devkar -
पोटॅटो टॉफिज विथ पोटली (potato toffee recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पावसाळ्याची गंमत Girija Ashith MP -
रोस्टेड पोट्याटोज विथ अक्रोड मसाला मिक्स😋😋 (roasted potato with akrod masala mix recipe in marathi)
#walnutsआज मी हटके अशी walnut ची रेसिपी घेऊन आली आहे..ही रेसिपी स्टार्टर म्हणून सर्व्ह करू शकता किंवा भाजी म्हणून चपाती सोबत ही खावू शकता किंवा डाळ भातासोबत ही खाऊ शकता...अक्रोड ची अशी भन्नाट चव आणि अक्रोड चे गुणधर्म ते ही अगदी फटाफट होणारी तेवढीच चविष्ट अशी रेसिपी पाहुयात... Megha Jamadade -
दूधसार (दूध आमटी) (dudhsaar amti recipe in marathi)
#KS2 "दूधसार" ही माझ्या आजीची रेसिपी!पण, सासर पक्कं मांसाहारी मिळाल्याने माझ्या आईने सुध्दा ही रेसिपी फारशी केल्याचं आठवत नाही. कोल्हापूर पासून साधारण पन्नास एक किलोमीटरवर "राधानगरी" तालुक्यातील हा एक फेमस पदार्थ! दूधापासून गोड पदार्थ तर सगळ्यांनी खाल्ले असतील. पण, दूधापासूनची झणझणीत, अस्सल कोल्हापूरी आणि मुख्य म्हणजे "शाकाहारी"डेलिकसी एकच "दूधसार". दूधसारलाच "दूध आमटी" म्हणून पण ओळखतात. ह्या साराची खासियत म्हणजे निरसं दूध वापरुनही ते प्रत्यक्ष पदार्थामध्ये फाटत नाही. त्याचं सिक्रेट म्हणजे एकतर हे सार पूर्णपणे अळणी बनवतात आणि दुसरं असं की वाटण आणि मसाल्यात कुठेही टोमॅटो चा वापर करत नाहीत. ह्या पदार्थाचा इतिहास ही आहे. बर्याच वर्षांपूर्वी, गुजराती व्यापारी कामानिमित्त राधानगरीला येत जात होते. उत्कृष्ट मांसाहारी जेवणासाठी फेमस कोल्हापूर मध्ये त्या "शाकाहारी" व्यापाऱ्यांची मात्र फारच गैरसोय होऊ लागली. "गरज ही शोधाची जननी" अशा उक्तीप्रमाणे दूधापासून च सार किंवा आमटी बनवून पाहिली गेली आणि आता तर राधानगरी मध्ये प्रत्येक ४ पावलांवर "दूधसार" मिळणारे ढाबे बघायला मिळतात. आत्ता ही च रेसिपी लिहीण्याचे कारण असे की सध्या सुरू असलेल्या pandemic / lockdown मध्ये ज्यावेळी भाजीला ऑप्शन नसेल तेव्हा नक्कीच ही रेसिपी तुम्हाला तुमच्या घरच्यांची दाद मिळवून देईल.. फक्त आठवणीने ताटाला मीठ लावा... 🤗 शर्वरी पवार - भोसले -
सोलकढी (solkadhi recipe in marathi)
#फोटोग्राफी #कढीसोलकढी किंवा कोकम कढी ही आमसुलं किंवा कोकम पासून बनविण्यात येणारी कोकणातील प्रसिद्ध अशी आहे. पारंपारिक असल्यामुळे अर्थातच आई कडून शिकली. अत्यंत पौष्टिक आणि पित्तनाशक अशी ही आहे.घरात मासे, चिकन किंवा मटणाचा बेत असेल तर हमखास सोल कढी करण्यात येते. सोलकढी म्हणजे, ताकासाठी असलेला पर्याय असं म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही. यासाठी कोकम आणि खोबऱ्याच दूध या पदार्थांची गरज असते. खरं तर सोलकढी तुम्ही नुसतीच पिऊ शकता किंवा भातावरही खाऊ शकता.उन्हाळ्यातही सोलकढी अत्यंत फायदेशीर ठरते. यामध्ये वापरण्यात येणारं कोकम आणि नारळाच्या दूधामध्ये निसर्गतः थंड गुणधर्म असतात. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी सोलकढी उत्तम ठरते.ही झटपट व्हावी म्हणून तूम्ही नारळाच्या दुधात कोकम सिरप घालून छान सोलकढी बनवतातच. पण अशी पारंपारिक आणि पित्तनाशक अशी ही सोलकढी नक्की ट्राय करा! Priyanka Sudesh
टिप्पण्या (11)