कैरीची जेली (Kairichi Jelly Recipe In Marathi)

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
Thane

कैरीची जेली (Kairichi Jelly Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
४जणांसाठी
  1. 2कै-या
  2. 2 कपपाणी
  3. 1 कपसाखर
  4. 1ते 2 थेंब खाण्याचा हिरवा रंग
  5. 4 टे.स्पून काॅर्नफ्लोअर
  6. 4 टे.स्पून डेझीकेटेड कोकनट

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    प्रथम कै-या स्वच्छ धुवून साल काढून तुकडे करून घेतल्या.

  2. 2

    नंतर मिक्सरमधे कैरीचे तुकडे व पाणी घालून छान पल्प तयार करून घेतला. नंतर त्यांत साखर घालून गॅसवर आठवत ठेवले.

  3. 3

    रस आटत आल्यावर त्यांत काॅर्नफ्लोअर पाण्यात विरघळवून घातले व चांगले आटू दिले. नंतर एका ताटली वर ते मिश्रण थोडे घातले, ते ओघळले नाही म्हणजेच जेली सेट करण्यासाठी तयार झाले.

  4. 4

    नंतर पेल्याला तुपाचा हात लावून वरील मिश्रण त्या पेल्यात घातले व १५ मिनिटांसाठी फ्रीजमधे सेट करण्यास ठेवले.

  5. 5

    १५ मिनीटांनी तयार जेली पेल्यातून काढून घेतली व तिचे गोल काप करून डेझीकेटेड कोकनट मधून घोळवून घेतले व पुदिन्याची पाने व चेरीजने सजावट करून सर्व्ह केले.

  6. 6

    छान आंबट गोड कैरीची जेली तयार झाली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
रोजी
Thane

टिप्पण्या

Similar Recipes