बेसन गुळाचे लाडू (Besan Gulache Ladoo Recipe In Marathi)

Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
Thane

बेसन गुळाचे लाडू (Besan Gulache Ladoo Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
  1. 1 वाटीबेसन लाडू पीठ
  2. 1/2 वाटीगुळाची पावडर
  3. 1/2 वाटीसाजूक तूप
  4. 1 टीस्पूनवेलची पावडर
  5. 4 टेबलस्पूनदूध

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम सगळ्या साहित्याची तयारी करावी. बेसन लाडू पीठ घ्यावे. साजूक तूप काढून ठेवावे. इथे मी गुळाची पावडर वापरली आहे.

  2. 2

    सर्वप्रथम बेसन 4-5 मिनिटे भाजून घ्यावे. त्यानंतर त्यामध्ये 3-4 टेबलस्पून साजूक तूप घालावे आणि सारखे परतत राहावे 4-5 मिनिटे. त्यानंतर परत एकदा साजूक तूप घालावे आणि चांगले परतावे. 2-3 टेबलस्पून साजूक तूप बाजूला ठेवावे. आणि बाकी सर्व तूप बेसन मध्ये घालावे. साधारण 15 मिनिटे लागतात बेसन चांगल्या परतून घेण्यासाठी. गॅस मंद ठेवावा.

  3. 3

    बेसन चांगले परतून झाल्यावर त्यामध्ये दूध सर्व बाजूने घालावे आणि परतावे. त्यानंतर लगेचच वेलची पावडर आणि गूळ घालून चांगले मिक्स करून घ्यावे आणि गॅस बंद करावा. आता ताटा मध्ये सर्व काढावे. त्यामध्ये उरलेले तूप घालून लाडू करून घ्यावे. आता आपले बेसन गुळाचे लाडू तयार झाले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
रोजी
Thane

टिप्पण्या

Similar Recipes