फळांचा केक

Swayampak by Tanaya
Swayampak by Tanaya @cook_20739819
Mumbai

बटर क्रीम, व्हिप क्रीम, इत्यादी काही न वापरता फक्त फळे वापरून बनवलेला व सजवलेला केक. #फ्रुट ... मुलांसाठी जर फ्रेश व पोष्टिक असे नैसर्गिक पदार्थ वापरून बनवलेला केक सर्वांना आवडेल. #फ्रुट

फळांचा केक

बटर क्रीम, व्हिप क्रीम, इत्यादी काही न वापरता फक्त फळे वापरून बनवलेला व सजवलेला केक. #फ्रुट ... मुलांसाठी जर फ्रेश व पोष्टिक असे नैसर्गिक पदार्थ वापरून बनवलेला केक सर्वांना आवडेल. #फ्रुट

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५० मिनिटे
  1. १ वाटी गव्हाचे पिठ
  2. १/२ वाटी दुध
  3. ४-५ चमचे तेल
  4. १/२ वाटी पिठी साखर
  5. ४ चमचे दही किंवा ताक
  6. १/२ वाटी बदाम, पिस्ता, काजू चे काप
  7. २ चमचे मनुका किंवा खीसमिस
  8. १ -२ आंबे
  9. ड्रॅगन फळ
  10. संत्री
  11. सफरचंद
  12. १ चमचा बेकिंग पावडर
  13. १/२ चमचा बेकिंग सोडा
  14. १ चमचा दालचिनी पूड

कुकिंग सूचना

५० मिनिटे
  1. 1

    एका परातीमध्ये गव्हाचे पिठ, बेकिंग पावडर व बेकिंग सोडा एकत्र करून चाळणी तून चाळून घ्या.

  2. 2

    एका मोठ्या भांड्यात, दुध मध्ये अर्धी वाटी साखर विरघळेपर्यंत मिक्स करा. त्यामध्ये तेल, ताक किंवा दही घालून मिक्स करा

  3. 3

    दुधाच्या मिश्रणात, सफरचंदाचे बारीक तुकडे करून घालावे. सर्व सुका मेवा (बदाम, मनुका, पिस्ता इत्यादी) घालावे. दालचिनी पूड घालावी. सर्व मिश्रण चांगले घोटुन घ्यावे.

  4. 4

    ह्या मिश्रणात पिठ घालून चांगले ढवळावे. ५ मिनिटे झाकून ठेवावे. केक क्या साच्यामध्ये तेल अथवा तुपाचा हात फिरवून वरून मिश्रण ओतावे. कूकर किंवा ओव्हन मध्ये केक ३०-४० मिनिटे बेक करावा.

  5. 5

    एका पॅनमध्ये ३-४ चमचे दुध कोमट गरम करून त्यामध्ये आंब्याचा गर काढून मिक्स करावा. चांगले घोटुन त्याचे क्रीम तयार करावं. पातळ वाटत असल्यास थोडे काजू बदाम पूड घालावी. व दुध आटवून घ्यावे.

  6. 6

    केक थंड झाल्यावर मधुन गोलाकार कापून दोन भाग करावे. वरच्या व खालच्या भागामध्ये आंब्याची क्रीम लावावी. वरून दुसरा केक च भाग बसवावा.

  7. 7

    केक च्या वरून पुन्हा आंब्याची क्रीम लावावी. व आपल्या आवडी प्रमाणे संत्री च गर, ड्रॅगन फळाचे तुकडे, आंब्याचे काप लावून केक सजवावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Swayampak by Tanaya
Swayampak by Tanaya @cook_20739819
रोजी
Mumbai
By profession Software Engineer, but quit job to follow my passion of cooking. Through my Swayampak classes, I try to cultivate cooking in every individual's mind irrespective of age and gender. My mother always been my inspiration , grown up seen her trying hands with every ingredient in different ways.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes