फोडणीच वरण (phodnich varan recipe in marathi)

Suchita Ingole Lavhale
Suchita Ingole Lavhale @cook_26220149

# Pcr प्रेशर कुकर मुळे बर्याचश्या गोष्टी सोप्या झाल्या. एखाद वेळी घाई आसली की पटकन वरण आणी भात दोन पदार्थ एकाच वेळी शिजतात. त्यामुळे झटपट स्वयंपाक होतो.

फोडणीच वरण (phodnich varan recipe in marathi)

# Pcr प्रेशर कुकर मुळे बर्याचश्या गोष्टी सोप्या झाल्या. एखाद वेळी घाई आसली की पटकन वरण आणी भात दोन पदार्थ एकाच वेळी शिजतात. त्यामुळे झटपट स्वयंपाक होतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० ते २५ मिनीट
२वव्यक्ती
  1. 1 कपतुरीची डाळ
  2. टोमॕटो
  3. कांदा
  4. 1/3 कप तेल
  5. 1 टीस्पून तिखट
  6. 1/2 टीस्पून हळद
  7. चवीला मीठ
  8. 1/2 टीस्पून जिर मोहरी
  9. 1/2 टीस्पून धनेपुड
  10. 5-6लसुन पाकळ्या
  11. 1/2 इंच अद्रक

कुकिंग सूचना

२० ते २५ मिनीट
  1. 1

    प्रथम तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतली. एक टोमॕटो कट केल. भांड्या मध्ये दाळी मध्ये टोमॕटो टाकुन घेतल. कारण कुकर मध्ये शिजवतानां टोमॕटो एकजीव शिजुन फोडणीच्या वरणाला चव चांगली येते.

  2. 2

    आता वरण शिजल. फोडणी द्यायला कांदा कापुन घेतला. अद्रक लसुन कुटून घेतल. कढी पत्ता घेतला. तिखट,मीठ,हळद,धनेपुड काढुन घेतल.

  3. 3

    आता फोडणीची तयारी. गॕसवर भांड ठेवुन तेल गरम करुन जिर मोहरी घातली. कांदा,लसुन पेस्ट, कढीपत्ता घातला. तिखट,मीठ काढलेले जिन्नस घालुन वरणाला घोटुन टाकुन घेतल.

  4. 4

    वरणाला उकळी आणली.आता फोडणीच वरण सर्व्ह करायला तयार झाल. सर्व्हींग वाटी मध्ये काढुन कोथींबीर घातली.

  5. 5

    जेवणाच्या थाळी मध्ये सर्व्ह केल सोबत पोळी,लोणच,चटणी,भात सर्व्ह करुन परीपुर्ण थाळी तयार झाली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Suchita Ingole Lavhale
Suchita Ingole Lavhale @cook_26220149
रोजी

Similar Recipes