पनीर बिर्याणी (Paneer biryani recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#MLR

पनीर बिर्याणी चवीला खूप टेस्टी आणि चमचमीत लागते. लंच टाईम म्हणून ही पनीर बिर्याणी one pot meal option म्हणून एकदम छान आहे.
सोबतीला पापड ,रायता असेल तर क्या बात!

माझ्या मुलांना खूप आवडते. पाहूयात रेसिपी.

पनीर बिर्याणी (Paneer biryani recipe in marathi)

#MLR

पनीर बिर्याणी चवीला खूप टेस्टी आणि चमचमीत लागते. लंच टाईम म्हणून ही पनीर बिर्याणी one pot meal option म्हणून एकदम छान आहे.
सोबतीला पापड ,रायता असेल तर क्या बात!

माझ्या मुलांना खूप आवडते. पाहूयात रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
4 जणांसाठी
  1. 2 कपबासमती तांदूळ
  2. 4वेलची
  3. 1 लहानदालचिनीची काडी
  4. 3-4तमालपत्र
  5. चवीपुरते मीठ
  6. २५० ग्राम पनीर
  7. 1/2 कपदही
  8. 1 टिस्पून आलेलसूण पेस्ट
  9. 1 कपकांदा, उभा पातळ चिरून
  10. 5टोमॅटो
  11. 2 टिस्पून आलेलसूण पेस्ट
  12. 2 टिस्पून तूप
  13. खडा गरम मसाला - २ वेलची, ३-४ लवंगा, ३-४ मिरीदाणे, २-३ तमालपत्र
  14. 1 टिस्पून धणेपूड
  15. 1 टिस्पून जिरेपूड
  16. 1 टिस्पून गरम मसाला
  17. 1/2 टिस्पून लाल तिखट
  18. 1 कपमिल्क पावडर (किंवा १/२ कप क्रिम)
  19. साधारण पाऊण ते एक कप भाज्यांचे तुकडे :- मटार + गाजर लहान तुकडे
  20. तुकडेफरसबी
  21. 8 ते १० काजूबी
  22. 8 ते १० बेदाणे
  23. १/४ कप पुदीना बारीक चिरून
  24. 1/4 कपकोथिंबीर बारीक चिरून
  25. 2 टिस्पून दूध
  26. केसर काड्या

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    पनीर
    दही फेटून घ्यावे. त्यात आलेलसूण पेस्ट आणि मीठ घालून मिक्स करावे. पनीरचे तुकडे या मिश्रणात १/२ तास घोळवून ठेवावे.

  2. 2

    तांदूळ स्वच्छ धुवून १/२ तास निथळत ठेवावेत. पातेल्यात ६ कप पाणी गरम करण्यास ठेवावे. त्यात वेलची, लवंगा, दालचिनी, तमालपत्र आणि मीठ घालून पाण्याला उकळी येऊ द्यावी. पाणी उकळले कि त्यात धुतलेले तांदूळ घालावे. भात साधारण ६० ते ७० % शिजला कि चाळणीमध्ये ओतावा आणि अधिकचे पाणी काढून टाकावे. तयार भात परातीत मोकळा करून गार होण्यास ठेवावा.

  3. 3

    ग्रेव्ही
    १) पाणी उकळवावे. त्यात टोमॅटो घालून २ मिनीटांनी गार पाण्यात सोडावे. सालं सुटली कि काढून टाकावी. आतील गराच्या मध्यम फोडी कराव्यात.

  4. 4

    कढईत २ टिस्पून तूप गरम करून त्यात खडा गरम मसाला काही सेकंद परतावा. आलेलसूण पेस्ट परतावी. कांदा घालून तो गुलाबी रंग येईस्तोवर परतावा. नंतर चिरलेल्या टोमॅटोच्या फोडी घालून त्या नरम होईस्तोवर परतावे. लाल तिखट घालावे.

  5. 5

    हे मिश्रण थोडे गार होवू द्यावे. मिक्सरमध्ये पाणी न घालता प्युरी करावी.

  6. 6

    कढईत साधारण २ टेस्पून तूप गरम करावे. यामध्ये काजूबी आणि बेदाणे परतून बाजूला काढून ठेवावे. याच तुपात हि प्युरी परत कढईत घ्यावी. मध्यम आचेवर गरम करण्यास ठेवावी. त्यात धणेजिरेपूड, गरम मसाला घालावा. मिल्क पावडर घालावी. भाज्या घालाव्यात. निट ढवळून हे मिश्रण घट्टसर करावे.

  7. 7

    चवीपुरते मीठ घालावे. हि ग्रेव्ही एकदम पातळ किंवा एकदम घट्टही नसावी (टीप १). ग्रेव्ही दाटसर होत आली कि पनीरचे मॅरीनेट केलेले तुकडे घालून थोडा वेळ उकळी काढावी.

  8. 8

    तळलेला कांदा
    तुपात किंवा तेलात कांद्याचे पातळ काप (१ कप) खरपूस तळून काढावेत. हा तळलेला कांदा सजावटीसाठी वापरावा.

  9. 9

    बिर्याणी (टीप २, ३, ४)
    एकदा भात आणि ग्रेव्ही तयार झाली कि भाताचे ४ आणि ग्रेव्हीचे ३ असे समसमान भाग करून घ्यावे. एका खोलगट नॉनस्टिक पॅनमध्ये पहिले तूप सोडावे आणि पसरवून घ्यावे. प्रथम भाताचा एक भाग घेऊन समान पसरावा. त्यावर ग्रेव्हीचा १ भाग समान पसरवून घ्यावा. थोडा चिरलेला पुदीना आणि कोथिंबीर घालावी. ३-४ काजू, बेदाणे घालावे. अशाप्रकारे सर्व थर पूर्ण करावे. भाताचा शेवटचा थर दिला कि त्यावर तळलेला कांदा, उरलेले काजू बेदाणे आणि दूधात कालवलेले केशर असे पसरावे. वरती घट्ट झाकण ठेवावे, वाफ बाहेर जाता कामा

  10. 10

    टीप:
    १) ग्रेव्ही पातळ नसावी. पातळ ग्रेव्हीमुळे बिर्याणी बनवताना भाताची शिते मोडतात आणि भात मोकळा न होता ओलसट आणि गच्च होतो. बिर्याणीचे थर करताना पसरता येईल इतपत दाट ठेवावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

Similar Recipes