पुरणाचे मोदक (purnache modak recipe in marathi)

rucha dachewar
rucha dachewar @cook_26177680

आमच्या घरी गणपती पूजनाच्या पहिल्या दिवशी पुरणाचे मोदक करायची प्रथा आहे.आम्ही पुरणाच्या मोदकाचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवत असतो.गणपती पूजनाच्या निमित्ताने पुरणाचे मोदक तयार करत आहे.

पुरणाचे मोदक (purnache modak recipe in marathi)

आमच्या घरी गणपती पूजनाच्या पहिल्या दिवशी पुरणाचे मोदक करायची प्रथा आहे.आम्ही पुरणाच्या मोदकाचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवत असतो.गणपती पूजनाच्या निमित्ताने पुरणाचे मोदक तयार करत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीचण्याची डाळ
  2. 3/4 वाटीसाखर
  3. किंचितमीठ
  4. थोडे जायफळ आणि विलायची पुड
  5. 2 चमचेतेलाचे मोहन
  6. 1 वाटीमैदा
  7. 2 वाटीतळण्याकरता तूप

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम चण्याची डाळ स्वच्छ धुऊन घ्यावी. कुकर मध्ये दोन तीन शिट्ट्या लावून शिजवून घ्यावी. मैद्यामध्ये तुपाचे मोहन टाकावे आणि गोळा भिजवावा. मोदकाची पारी बनविण्या साठी छोट्या पुऱ्या लाटाव्यात.

  2. 2

    कुकर थंड झाल्यावर साखर आणि किंचित मीठ घालून दहा ते पांढर मिनिटे मंद आचेवर पुरण शिजवावे. त्यामध्ये विलयाची पुड आणि जायफळ टाकावे. पुरण यंत्र किंवा मिक्‍सरमधून एकजीव करावे. आता लाटलेल्या परीमध्ये पुरण टाकून मोदकाचा आकार द्यावा.

  3. 3

    अश्या प्रकारे सर्व पारी मध्ये पुरणाचे सारण भरावे. आणि मोदकाचा आकार द्यावा कढईमध्ये तूप टाकावे आणि तूप गरम झाल्यावर मोदक तळून घ्यावे. मोदक गुलाबी रंग येई पर्यंत तळून घ्यावे.

  4. 4

    अश्या प्रकारे सर्व मोदक तळून घेवून टिश्यू पेपर वर काढून घ्यावी.मग बाप्पा च्या नैवेद्यासाठी काढून घ्यावी.

  5. 5

    मोदक झाल्यानंतर बाप्पा साठी नैवेद्याचे ताट लावले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
rucha dachewar
rucha dachewar @cook_26177680
रोजी

Similar Recipes