गोड डोसा (God Dosa Recipe In Marathi)

Anushri Pai
Anushri Pai @Anu_29184519

#गोड डोसा
लहान मुलांसाठी रोज सकाळी नवीन काय नाश्ता बनवावा असा विचार प्रत्येक गृहिणी करत असते. हा एक प्रकार असा आहे की घरातल्याच वस्तूंपासून क्रिस्पी शिवाय गोड त्यामुळे लहान मुलांना नक्कीच आवडेल असा हा गोड डोसा नक्की करून बघा.

गोड डोसा (God Dosa Recipe In Marathi)

#गोड डोसा
लहान मुलांसाठी रोज सकाळी नवीन काय नाश्ता बनवावा असा विचार प्रत्येक गृहिणी करत असते. हा एक प्रकार असा आहे की घरातल्याच वस्तूंपासून क्रिस्पी शिवाय गोड त्यामुळे लहान मुलांना नक्कीच आवडेल असा हा गोड डोसा नक्की करून बघा.

Edit recipe
See report
Share
Share

Ingredients

१/२ तास
  1. १ वाटी जाड तांदूळ
  2. १/२ चमचा मेथी दाणे
  3. १/२ वाटी किसलेला गूळ
  4. १ चमचा तीळ आणि खसखस भाजून
  5. १/२ चमचा खायचा सोडा
  6. १/२ चमचा वेलची पावडर

Cooking Instructions

१/२ तास
  1. 1

    प्रथम पॅनमध्ये जाड तांदूळ आणि मेथी दाणा खरपूस भाजून घ्यावे. मेथीचा आणि तांदळाचा एक छान वास येतो. मेथी आणि तांदूळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे त्याचप्रमाणे गुळ पाण्यात नीट विरघळून घ्यावे व मिक्सरमध्ये तांदळाची वाटलेले मिश्रण गुळाच्या पाण्यात घालावे आणि छान मिक्स करून घ्यावे.

  2. 2

    त्यात थोडेसे चवीपुरतं मीठ व वेलची पावडर आणि थोडं साजूक तूप घालून वीस मिनिटं पीठ झाकून ठेवावे.

  3. 3

    पीठ सरसरीत हवे जाड नको जेणेकरून आपण त्याचे जाळीदार पातळ आणि कुरकुरीत असे छान डोसे तव्यावर काढू शकतो. तवा गरम झाल्यानंतर त्यावर पातळ असा डोसा पसरून घ्यावा व वरून जाळी पडल्यावर साजूक तूप सोडून एक मिनिट झाकून ठेवावे आणि नंतर उलटा न करता तसाच गरमागरम मुलांना खायला द्यावा.

Edit recipe
See report
Share

Cooksnaps

Did you make this recipe? Share a picture of your creation!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anushri Pai
Anushri Pai @Anu_29184519
on

Comments

Similar Recipes