पनीर_मखनी_बिर्यानी

Smita Mayekar Singh
Smita Mayekar Singh @cook_20355451

#myfirstrecipe

आता इतकी छान थंडी पडली आहे तर एखादया रविवारी गरमागरम वाफाळलेल्या बिर्याणीचा बेत तर हवाच , हो कि नाही! तर माझ्या खवय्ये मित्र मैत्रिणींसाठी चविष्ट पनीर मखनी बिर्याणी !

पनीर_मखनी_बिर्यानी

#myfirstrecipe

आता इतकी छान थंडी पडली आहे तर एखादया रविवारी गरमागरम वाफाळलेल्या बिर्याणीचा बेत तर हवाच , हो कि नाही! तर माझ्या खवय्ये मित्र मैत्रिणींसाठी चविष्ट पनीर मखनी बिर्याणी !

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

4-5 सर्व्हिंग्ज
  1. 400 ग्रॅमपनीर
  2. 1तमालपत्र
  3. चुटकीभर हळद (1/8th टीस्पून)
  4. 3-टीस्पून काश्मिरी लाल मिरची पूड
  5. 1/2-टीस्पून गरम मसाला पावडर
  6. 1-टीस्पून धणे पावडर
  7. 1-टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पावडर
  8. मीठ
  9. 1/2-टीस्पून साखर
  10. 1-टीस्पून कसूरी मेथी
  11. 2-टीस्पून तूप
  12. 2-टेबलस्पून फ्रेश क्रीम
  13. बटर /लोणी
  14. तेल
  15. भात शिजवण्यासाठी :
  16. 1 1/2 कप=300 ग्रॅम्स लांबसडक बासमती तांदूळ -पाण्याने स्वच्छ धुऊन ३० मिनिटे पाण्यात भिजवून ठेवावा
  17. 4हिरव्या वेलच्या
  18. 3-4लवंग
  19. 1तमालपत्र
  20. 1/2-इंच दालचिनीचा तुकडा
  21. 1मोठा कांदा चिरलेला = १०० ग्रॅम
  22. कांद्याच्या मसाल्याच्या वाटणासाठी :
  23. 5-6लसणीच्या पाकळ्या
  24. 1 1/2-इंच आले
  25. 3हिरव्या मिरच्या
  26. काजूच्या मसाल्याचे वाटण:
  27. टोमॅटोच्या मसाल्याचे वाटण :
  28. 2-टेबलस्पून ताजी कोथिंबीर
  29. 3मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून २०० ग्रॅम्स
  30. 1/4th-टीस्पून लवंग
  31. 1/4th कप =18-20 काजू -गरम पाण्यात ३० मिनिटे भिजवून ठेवावेत
  32. 1/4th-टीस्पून काळी मिरे
  33. 1 इंचदालचिनीचा तुकडा
  34. 1-चक्रीफूल
  35. 3हिरव्या वेलच्या
  36. 1/4th-टीस्पून जावित्री
  37. बिर्याणीच्या थरांसाठी :
  38. 1/4th कप ताजी कोथिंबीर बारीक चिरून
  39. 1-टीस्पून जिरे
  40. 1/2 कपतळलेला कांदा
  41. थोडे केशराचे धागे २ टेबलस्पून हलक्या गरम दुधात भिजवून
  42. कोळशाच्या धुनगार साठी:
  43. 1मोठा कोळशाचा तुकडा

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम आपण बिर्याणीसाठी भात शिजवून घेऊ. मोकळा भात शिजवण्यासाठी आपण दीड कप तांदळासाठी सुमारे ५ पट पाणी म्हणजे ७ ते ८ कप पाणी उकळण्यासाठी ठेवू. पाण्याला उकळी आली कि त्यात लवंग, हिरवी वेलची, दालचिनी, तमालपत्र, २ टीस्पून मीठ, आणि १ टीस्पून तेल घालावे. तेलाच्या ऐवजी तूप हि घालू शकतो. तेल किंवा तूप घातल्याने भाताचा एकेक दाणा मोकळा राहतो आणि चिकटत नाही.

  2. 2

    आता आपण पाण्यात भिजवलेले तांदूळ घालून घेऊ. मध्यम ते मोठ्या आचेवर तांदूळ ९० टक्के शिजेपर्यंत शिजू देऊ. भात शिजत आला कि चाळणीत काढून मग एका मोठ्या थाळीत किंवा परातीत पसरवून घेऊ. असे केल्याने भात मोकळा राहतो.

  3. 3

    आता मसाल्यांच्या वाटण्याच्या तयारीला लागूया. टोमॅटो पेस्ट साठी एका कढईत टोमॅटोच्या फोडी घालून घेऊ. त्यातच हिरवी वेलची, जावित्री, जिरे, लवंग, चक्रीफूल, दालचिनी, काळे मिरी घालून घेऊ. अर्धा कप पाणी आणि साखर हि मिसळून घेऊ. या मिश्रणाला मोठ्या आचेवर एक उकळी फुटू देऊ. उकळी आल्यावर याच मंद करून, झाकण घालून शिजू देऊ.टोमॅटोंना १५ मिनिटे शिजवल्यावर ते अगदी नरम होतात.

  4. 4

    गॅसवरून उतरवून त्यांचे पाणी गाळून हा मसाला थंड होऊ देऊ. थंड झाल्यावर याची अतिशय थोडे पाणी घालून घट्ट आणि अगदी बारीक पेस्ट वाटून घेऊ. ज्या पाण्यात टोमॅटो शिजवले होते त्याच पाण्यात पेस्ट वाटून घेऊ.

  5. 5

    आता आपण कांद्याचा मसाला आणि काजूची पेस्ट करून घेऊ. कांद्याच्या मसाल्यासाठी मिक्सरच्या भांड्यात कांडा, कोथिंबीर, आले, लसूण, आणि हिरव्या मिरच्या घालून बारीक वाटून घेऊ. यासाठी आपण फक्त १ टेबलस्पून पाणी वापरले आहे. हा झाला कांद्याचा मसाला. काजूंना गरम पाण्यातून काढून त्यांचीही एक बारीक पेस्ट वाटून घेऊ.हि पेस्ट वाटतानाही आपण १ टेबलस्पून पाण्याचा वापर केला आहे.

  6. 6

    तिन्ही पेस्ट्स तयार झाल्या आहेत. आता आपण कढईत ४ टेबलस्पून तेल घालून पनीर चे तुकडे तळून घेऊ. मंद ते मध्यम आचेवर १० मिनिटे तळल्यानंतर पनीरचा रंग सोनेरी होतो. पनीरला एका ताटलीत काढून घेऊ. त्याच कढईत आणखी २ टेबलस्पून तेल घालून घेऊ. १ टेबलस्पून बटर घालू. हि मखनी ग्रेव्ही असल्यामुळे यात बटर वापरले जाते. तेल आणि बटर गरम झाले कि त्यात तमालपत्र, कांद्याचा मसाला, आणि हळद घालून परतून घेऊ.

  7. 7

    हा मसाला आपण मध्यम ते मोठ्या आचेवर ५ मिनिटे परतून घेतला आहे. मसाल्याला तेल सुटू लागले कि त्यात लाल मिरची पूड,गरम मसाला, जिरे पावडर, आणि धणे पावडर घालून घेऊ. मसाला चांगला परतून घेऊ. परतताना मसाले करपू नये म्हणून थोडे पाणी घालून परतावेत.

  8. 8

    ३-४ मिनिटे परततल्यानंतर टोमॅटो पेस्ट घालू. काजूची पेस्ट देखील घालून घेऊ. काजूची पेस्ट घालण्यापूर्वी त्यात २ टेबलस्पून पाणी घालून पातळ केल्यानंतरच घालावी नाहीतर मसाल्याच्या गुठळ्या पडतात. चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ. हे सारे मसाले झाकून चांगले शिजवून घेऊ.

  9. 9

    आपण तब्बल ६ मिनिटे मसाला परतून घेतला आहे. आता १/४ टीस्पून साखर घालून घेऊ. पनीर चे तुकडे घालून मसाल्यात मिसळून घेऊ. १/२ कप पाणी घालून मंद आचेवर २ मिनिटे शिजू देऊ.२ मिनिटांनंतर झाकण काढावे. ह्यापेक्षा जास्त आपण हा मसाला शिजवणार नाही कारण बिर्याणी च्या थरांसाठी आपल्याला एवढ्या मसाल्याची गरज आहे. सगळ्यात शेवटी आपण घालू भाजलेली कसूरी मेथी पावडर आणि २ टेबलस्पून क्रीम. एकत्र मिसळून गॅस बंद करू.आता बिर्याणीचे थर लावून घेऊ.

  10. 10

    एका मोठ्या बिर्याणी हंडीला तळाला आणि कडांना तूप लावून घेऊ. पनीर ची अर्धी ग्रेव्ही हंडीत घालू. त्यावर थोडा तळलेला कांदा घालू. भाताचा अर्धा भाग त्यावर पसरून घेऊ. भात शिजवताना घातलेले अक्खे गरम मसाले काढून बाजूला ठेवावेत जेणेकरून ते खाताना दाताखाली येणार नाहीत. थोडे केशराचे दूध घालून घेऊ. या भातावर तळलेला कांदा आणि चिरलेली कोथिम्बिर पसरवून घेऊ. हा झाला बिर्याणीचा पहिला थर तयार. अशाच प्रकारे दुसरा थर हि लावून घेऊ.

  11. 11

    बिर्याणीचे थर लावून झाले कि आपण कोळश्याच्या धुन्गार ची तयारी करू. गॅसवर मोठ्या आचेवर कोळसा पूर्णपणे पेटवून घेऊ. कोळसा लाल झाल्यावर तो एका वाटीत ठेवून त्यावर १ टेबलस्पून तूप घालुन बिर्याणीच्या हंडीत वाटी ठेवून हंडी फक्त ३० सेकंद ते १ मिनिट झाकून ठेवू. त्यानंतर कोळशाची वाटी बाजूला काढून हंडीवर अलुमिनियम फॉईल पसरवून हंडी सीलबंद करून घेऊ. हवे असल्यास कणकेच्या गोळ्याने सुद्धा आपण हंडी बंद करू शकतो. झाकण ठेवून मोठ्या आचेवर ३ मिनिटे बिर्याणी शिजू द्यावी.

  12. 12

    एका बाजूला दुसऱ्या बर्नरवर आपण लोखंडाचा तवा मोठ्या आचेवर गरम करून घेतला आहे. ३ मिनिटे मोठया आचेवर बिर्याणी शिजवल्यावर आपण हंडी तव्यावर ठेवून बिर्याणीला दम द्यायचा आहे. मंद आचेवर बिर्याणी ७ मिनिटे दम वर शिजवावी. गॅसवरून उतरवून गरम गरम बिर्याणी कोणत्याही रायत्या सोबत वाढावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Smita Mayekar Singh
Smita Mayekar Singh @cook_20355451
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes