बुंदीचे लाडू

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#बेसन #प्रसाद #प्रसादाची रेसिपी

बुंदीचे लाडू

#बेसन #प्रसाद #प्रसादाची रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १२० ग्रॉम बेसन (१ कप)
  2. २२५ ग्रॉम साखर
  3. 5-6वेलदोडे
  4. 1 टेबल स्पूनकाजू चे तुकडे
  5. 1 टेबलस्पूनकलींगडाचे मगज
  6. 1 टेबलस्पूनतेल
  7. १०० मीली (१/२ कप)
  8. 1/2कीलो साजूक तुप तळण्यासाठी

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम बेसन चाळून घेतले.त्यात थोडं मीठ घालून थोडे पाणी घालून गाठी मोडेपर्यंत फेटून घेतले. मग थोडं पाणी व तेल घालून ५-७ मी नीट चांगले फेटून घेतले. १/२ कपापेक्षा १-२ टेबलस्पून पाणी जास्त लागते.

  2. 2

    आता पाक तयार करण्यासाठी एका भांड्यात साखर टाकून १ कप पाणी घालून साखर पाण्यात विरघळून मग ३-४ मीनीटांपर्यंत उकळून घेतले.१ तारीपेक्षा किंचित जास्त उकळलेला पाक पाहिजे. म्हणजे लाडू जरा टीकतो.

  3. 3

    आता गॅसवर कढईत साजूक तूप गरम करून घेतले.व बेसन फेटून घेतले. मग बुंदीचा झारा कढाईच्या वर ७-८ इंच धरून त्यावर चमच्याने बॅटर घालून झाऱ्यावर हाताने किंवा एखाद्या लाटण्या वगैरेने आपटून बूंदी पाडली.उंचावरून बुंदी पाठवल्याने ती गोल पडते.बुंदी तळल्यावर काढून घेऊन परत झाऱ्यावर बेसन घालण्यापूर्वी झारा धुवून घ्यावा.

  4. 4

    आता पाकाच्या भांड्यात रोस्ट केलेले मगज, काजू, पीस्ता काप, बुंदी, व थोडी क्रश केलेली वेलची घालून. सर्व मीक्स करून १/२ ते १ तास ठेवून दीले.पाकात सर्व साहित्य टाकण्यापुर्वी त्यातील १ वाटी पाक बाजूला काढून ठेवला. कारण कमी झाला तर घालता येतो पण जास्त झाला तर लाडू बिघडतो.थोड्या थोड्या वेळाने हलवत रहावे.

  5. 5

    मग साधारण १ तासाने सर्व मीश्रण मीक्स करून हाताला थोडंसं पाणी लावून लाडू वळावेत.वसर्व लाडू तयार झाल्यावर ६-७ तास हवेशीर पसरवून ठेवले.म्हणजे लाडू टीकतो.

  6. 6

    हे लाडू घरीसुद्धा अगदी बाहेरच्या सारखे होतात.. तो मुरला की एकदम मस्त लागतो. बुंदी पाडताना बुंदी जर लांबट पडत असेल तर पीठ थोडे सैल झाले.मग त्यात थोडे पीठ घालून फेटून घ्यावे.व नीट सलग पडत नसेल तर थोडसं पाणी मीक्स करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes