दालफ्राय तडका

Prajakta Patil
Prajakta Patil @cook_19647252

#डाळ आपण दाल फ्राय ब-याच ठिकाणी खातो. शिजवलेल्या वरणावर जरा सढळ हाताने तेल-तूप किंवा बटर वापरून केलेली चमचमीत फोडणी घातल्याशिवाय दाल फ्राय होऊच शकत नाही.तूप कडकडीत गरम करून त्यात मुक्त हस्तानं घातलेलं जिरं, अगदी बारीक चिरलेला, लाल केलेला लसूण, कुरकुरीत कढीपत्ता आणि लालभडक मिरच्या. आहाहा!

दालफ्राय तडका

#डाळ आपण दाल फ्राय ब-याच ठिकाणी खातो. शिजवलेल्या वरणावर जरा सढळ हाताने तेल-तूप किंवा बटर वापरून केलेली चमचमीत फोडणी घातल्याशिवाय दाल फ्राय होऊच शकत नाही.तूप कडकडीत गरम करून त्यात मुक्त हस्तानं घातलेलं जिरं, अगदी बारीक चिरलेला, लाल केलेला लसूण, कुरकुरीत कढीपत्ता आणि लालभडक मिरच्या. आहाहा!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 125 ग्रॅमतूरडाळ
  2. 125 ग्रॅममुगडाळ
  3. 125 ग्रॅम मसुरडाळ
  4. 1 टेबलस्पूनहळद
  5. 1 टीस्पूनतिखट
  6. 1 टीस्पूनगरम मसाला
  7. 2मध्यम कांदे (बारीक चिरलेले)
  8. 2टोमॅटो(बारीक चिरलेले)
  9. 3 टेबलस्पूनसाजूक तूप
  10. 1 टीस्पूनहिंग
  11. 1 टीस्पूनमोहरी
  12. 1 टीस्पूनजिरे
  13. लसूण बारीक चिरलेला
  14. कडीपत्ता पाने
  15. बारीक चिरलेली कोथिंबीर
  16. 2लाल मिरच्या
  17. 2हिरव्या मिरच्या
  18. 1 टीस्पूनधणे पूड
  19. 1 टीस्पूनजिरेपूड

कुकिंग सूचना

  1. 1

    तिन्ही डाळी स्वच्छ धुवून घ्या.

  2. 2

    कुरकरमध्ये डाळी, पाणी, मीठ, हिंग, हिरव्या मिरच्या, अर्धा बारीक चिरलेला कांदा, अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो, हळद अगदी मऊ शिजवून घ्या.मध्यम आकाराच्या कुकरमध्ये 1 शिटी घेऊन 10 मिनिटे डाळ बारीक गॅसवर ठेवा.

  3. 3

    डाळी शिजल्या की गरम आणि नरम असतानाच अगदी मऊ घोटून घोटून घ्या.

  4. 4

    एका खोलगट पॅन मध्ये गॅसवर 2 चमचे तूप गरम करत ठेवा.

  5. 5

    तूप गरम झाल्यावर बारीक चिरलेला कांदा घाला. कांदा छान मऊ शिजवून घ्या.

  6. 6

    यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घाला. टोमॅटो चांगला परतवून घ्या.

  7. 7

    टोमॅटो छान शिजल्यावर जिरेपूड, धणेपूड, तिखट, मीठ,गरम मसाला मिक्स करा.

  8. 8

    2 मिनिटे मसाला परतवून त्यावर शिजलेली डाळ घाला.डाळ चांगली हलवून एकजीव करून घ्या. आपल्याला हवी तेवढी पातळ करा. पण ही डाळ घट्टच असते. गॅस वर झाकण ठेवून 3 मिनिट ठेवा. आता डाळ गॅस वरून बाजूला करा.

  9. 9

    एक छोट्या कढईत 1 चमचा तूप गरम करा.

  10. 10

    तूप गरम झाल्यावर त्यात मोहरी घाला.

  11. 11

    मोहरी तडतडली की जिर घाला व गॅस बंद करा. त्यामध्ये लाल मिरच्या, चिरलेला लसूण, कडीपत्ता घाला.

  12. 12

    हा दणदणीत तडका दालफ्राय वर घाला व त्यावर झाकण ठेवा.

  13. 13

    कोथिंबीर पेरून चपाती, पराठे, भाकरी सोबत गरमगरम सर्व्ह करा.जिरा राईस सोबत तर अफलातून लागतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Prajakta Patil
Prajakta Patil @cook_19647252
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes