करवंदाचे सरबत (karwandache sarbat recipe in marathi)

Minal Kudu
Minal Kudu @cook_19544430
Virar

#करवंदाचे_सरबत
आज खूप करवंदे मिळाली... स्त्रोत अर्थातच आई😊😊
चांगली वाडगाभर करवंदे थोडी वाटून आणि मनसोक्त खाऊन उरली. मग त्याच सरबत करायचं ठरवलं. स्मॅश केलेली करवंदे( winery सारखी नाही ह 😆😜 हाताने) साखर घालून अर्धा तास झाकून ठेवली आणि मग गाळून घेतली. त्यात आवडीप्रमाणे चाट मसाला, सैंधव, जिरेपूड टाकून गार करून सर्व्ह केले. करवंदामध्ये ‘क’ जीवनसत्त्व आणि फायबर भरपूर प्रमाणात असल्याने त्वचाविकारामध्ये करवंद सेवनाचा फायदा दिसून येतो. दिवसेंदिवस वाढणाऱ्या उकाड्यात ही फळे खूप लाभदायक ठरतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
४ ग्लास
  1. 2 वाट्याकरवंदे
  2. 1 वाटीसाखर
  3. 1/4 टीस्पूनमीठ

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    करवंदे स्वच्छ धुवून कोरडी करून घ्या, हाताने स्मॅश करा.

  2. 2

    त्यात एक वाटी साखर घालून १० मिनिटे झाकून ठेवा. या मिश्रणला साखरेमुळे पाणी सुटेल.

  3. 3

    हे मिश्रण गाळून घ्या. तयार सरबत बाटलीत भरून फ्रीज मध्ये ठेवा.

  4. 4

    सर्व्ह करताना पाणी घालून आवडीनुसार मीठ, सैधव, जिरेपूड घालून गार करून घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Minal Kudu
Minal Kudu @cook_19544430
रोजी
Virar
Love cooking ❤️
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes