स्टफ पनीर पराठा (stuff paneer paratha recipe in marathi)

Priyanka Sudesh
Priyanka Sudesh @cook_22358434
Thane

#रेसिपीबुक #week4
पंजाब म्हटलं की समोर येते तेथील विशिष्ट अशी खाद्य संस्कृती. तेथील पदार्थ जगभरात प्रसिद्ध आहेत ते तेथील विशिष्ट पद्धतीमुळे आणि चवीमुळे!
भरपूर....मख्खन!! लावलेले पराठे... ह्याशिवाय पंजाबी माणसाचा दिवसच जात नाही!!!

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

३० मिनिटे
  1. स्टफिंगसाठी:-
  2. १०० ग्राम किसलेले पनीर
  3. 1मध्यम कांदा (बारीक चिरलेला)
  4. 3हिरव्या मिरच्या(बारीक चिरलेल्या)
  5. 1/4 कपकोथिंबीर(बारीक चिरलेली)
  6. 1 टिस्पून धणे जिरे पूड
  7. 1/2 टिस्पून आमचूर पावडर
  8. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  9. 1 टिस्पून किसलेले आले
  10. चवीनुसारमिठ
  11. आवरणासाठी:-
  12. १५० ग्राम गव्हाचे पिठ
  13. गरजेनुसार पाणी
  14. 2 टीस्पूनतेल
  15. 1/2 टीस्पूनमिठ
  16. (पराठे भाजण्यासाठी)बटर किंवा तूप

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    आवरण बनविण्यासाठी गव्हाचे पीठ, मीठ आणि तेल घालून मिक्स करावे.‌ थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यावे.

  2. 2

    स्टफिंगसाठी किसलेल्या पनीरमध्ये बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, किसलेले आले आणि कोथिंबीर घालावी.

  3. 3

    धणे जिरे पूड, आमचूर पावडर, गरम मसाला आणि चवीनूसार मीठ घालून मिक्स करावे.

  4. 4

    पीठाची छोटी पारी लाटून त्यात स्टफिंग भरावे.

  5. 5

    गोळा करून लाटून घ्यावे.

  6. 6

    दोन्ही बाजूंनी तूप किंवा बटर लावून भाजून घ्यावे.

  7. 7

    वरून एक्स्ट्रा बटर घालून गरमागरम सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Priyanka Sudesh
Priyanka Sudesh @cook_22358434
रोजी
Thane
I am software engineer by profession. Like to cook different foods by passion.
पुढे वाचा

Similar Recipes