बनी चाव (bunny chow recipe in marathi)

Archana Joshi
Archana Joshi @cook_24269405
Johannesburg

#रेसिपीबुक #week13

इंटरनॅशनल डेस्टिनेशन - साऊथ आफ्रिका
सध्या मी साऊथ आफ्रिका येथे वास्तव्यास असल्याने इथली प्रसिद्ध डिश प्रस्तुत करत आहे
"Bunny chow"!
१८ व्या शतकात जेव्हा भारतीय गुलामांना इंग्रजांनी आफ्रिकेत आणले तेव्हा त्यांना हीन वागणूक मिळत असे व खाण्यास थाळी मिळत नसे. मग भारतीय गुलामांनी ब्रेडला छिद्र पाडून त्यात ग्रेव्ही घालून खाण्यास सुरुवात केली. हे बनिया लोकांनी सुरू केल्याने याला "बनी चाव" हे नाव पडले. बनिया वरून "बनी" व घास म्हणजे "चाव" अशाप्रकारे ही डिश अस्तित्वात आली.
इंग्रजांना ही डिश खूप आवडली व त्यांनी त्यांचे nonveg version यात आणले.
अशाप्रकारे डर्बन येथील प्रसिद्ध असा "बनी चाव" कसा करायचा पाहूया.
(टिपः मी व्हेज बनी चाव केला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या वापरु शकता. उदा. राजमा,वाटणे ई.)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
२-३ सर्विंग
  1. 1 कपउकडलेले काबूले चने
  2. 3उकडलेले बटाटे
  3. 2 टेबलेस्पून तेल
  4. 1बारीक चिरलेला कांदा
  5. 3-4मिरचीचे तुकडे
  6. 1टोमॅटो प्युरे
  7. 1 टीस्पूनहळद
  8. 1 टेबलेस्पून तिखट
  9. 1 टेबलेस्पून आलं - लसूण पेस्ट
  10. 1 टेबलेस्पून गरम मसाला
  11. 1 टीस्पूनहिंग
  12. 1 टीस्पूनधनेपूड
  13. 1 टीस्पूनजिरेपूड
  14. चवीनुसार मीठ
  15. 6बर्गर ब्रेड
  16. आवडीप्रमाणे चीज
  17. 2 टेबलेस्पून कोथिंबीर

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    पॅनमध्ये तेल गरम करून घ्या व त्यात आलं लसूण पेस्ट व मिरच्या घालून परतून घ्या. मग कांदा घालून परतून घ्या व कांदा मऊ झाल्यावर गरम मसाला सोडून इतर मसाले घालून परतून घ्या.

  2. 2

    आता त्यात टोमॅटो प्यूरी घालून परतून घ्या. आता त्यात काबूले चने व बटाटा घालून मिक्स करून घ्या.

  3. 3

    वरून मीठ व गरम मसाला घालून मिक्स करून घ्या व ५ मिनिटे झाकून उकळी काढून घ्या. वरून कोथिंबीर घालून पुन्हा मिक्स करून घ्या. भाजी तयार आहे.

  4. 4

    आता बर्गर ब्रेडला गोलाकार छिद्र पाडून घ्या व त्यात तयार भाजी भरून घ्या. वरून चीज घालून गरमागरम सर्व्ह करा.

  5. 5

    ब्रेडचा कापलेला भाग मी टोपी स्वरूपात वापरला आहे सजावट म्हणून. आपला अप्रतिम बनि चाव तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Archana Joshi
Archana Joshi @cook_24269405
रोजी
Johannesburg

Similar Recipes