आगळीवेगळी खस्ता कचोरी (kachori recipe in marathi)

Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698

#रेसिपीबुक, #week12,,
खूप वर्षांनी कचोरी बनवण्याचा योग आला..
हेच तर कूक पॅड मुळे काहीतरी वेगळं नवीन प्रकार शिकायला मी करायला मिळतात..
ही कचोरी माझ्या डोक्यात पण नव्हती असल्या तरेची कचोरी करायची...
आणि कुणी विचार पण नसेल केला आणि मी पण नाही की असल्या साहित्यापासून कचोरी बनवू शकते..
पण नेहमी प्रमाणे मी हा पण प्रयोगच केलेला आहे...
घरी थोडीशी बुंदी उरलेली होती आणि चना जोर गरम पण थोडासा उरलेला होता मग विचार केला की चला करून बघूया याची कचोरी
नेहमीच्या प्रकारापेक्षा थोडी वेगळी कचोरी ही आहे पण एकदम टेस्टी होते आणि ही कचोरी पंधरा दिवस प्रवासामध्ये टिकेल...
चला तर करुया झटपट होणारी, सोप्या पद्धतीची कचोरी 🤩

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

35 मि
3 सर्व्हिंग्ज
  1. कचोरीच्या बाहेरील आवरणासाठी
  2. 1 कपमैदा
  3. चवीप्रमाणे मीठ
  4. 4 टेबलस्पूनतेल
  5. कचोरीच्या आतल्या मसाल्यासाठी साहित्य,
  6. 1/4 कपखारी बुंदी
  7. 1/2 कपचना जोर गरम
  8. 1 टीस्पूनतिखट
  9. 1/2 टीस्पूनहळद
  10. 1/2 टीस्पूनजिरे पावडर
  11. 1 टीस्पूनधने पावडर
  12. 1 टीस्पूनआमचूर पावडर
  13. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  14. 1 टेबलस्पूनसाखर
  15. 1 टेबलस्पूनतेल
  16. चवीप्रमाणे मीठ

कुकिंग सूचना

35 मि
  1. 1

    सर्व साहित्य काढून ठेवावे, मैदा मध्ये तेल, मीठ पाणी घालून चांगले मळून घ्यावे आणि पंधरा मिनिटांसाठी झाकून ठेवावे रेस्ट साठी.

  2. 2

    मिक्सरच्या पॉट मध्ये चना जोर गरम, बुंदी, सर्व मसाले, मीठ आणि साखर घालून त्याला बारीक करून घ्यावे,, आता या बारीक केलेल्या मसाल्यामध्ये 1 टीस्पून पाणी, आणि 1 टेबलस्पून तेल घालून त्याचे छोटे छोटे 7 गोळे करून घ्यावे कचोरी मध्ये स्टफ करण्यासाठी,,, या मसाल्या मध्ये पाणी हे कमीत कमी घालावे गोळा बनेल इतकं पाणी आणि तेल घालावे, खुप नाही..

  3. 3

    मैदाचे पण सात पेढे करून घ्यावेत, मैद्याची हातावर पाती थापून घ्यायची आणि त्यामध्ये मसाल्याचा गोळा नीट घालून कचोरी नीट व्यवस्थित बंद करून घ्यावी आणि गोळे तयार करून घ्यावे.

  4. 4

    आणि आता ही गोल कचोरी चे गोळे मंद आचेवर खरपूस तळून घ्यावेत,,

  5. 5

    आता आपली छान खस्ता कचोरी तयार आहे, छान गरम गरम सॉस किंवा चिंचेच्या चटणीसोबत सर्व्ह करावी, खूप सुंदर टेस्ट होते या गोल कचोरीची... ही कचोरी आठ ते पंधरा दिवस राहू शकते, अगदी सोपी आणि सहज झटपट होणारी कचोरी...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes