शेजवान मसाला डोसा (schezwan masala dosa recipe in marathi)

Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
Kalyan

शेजवान मसाला डोसा (schezwan masala dosa recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४० मिनिटे
६व्यक्तींसाठी
  1. ३ कप तांदूळ
  2. १ कप उडीद डाळ
  3. 1 टीस्पूनमेथी दाणे
  4. 1 टीस्पूनशेजवान चटणी
  5. भाजीसाठी
  6. बटाटे
  7. 4-5हिरव्या मिरच्या
  8. 2कांदे
  9. 4 टेबलस्पूनतेल
  10. ८-१० कढीपत्त्याची पाने
  11. ८-१० लसूणाची पेस्ट
  12. 1 टेबलस्पूनआल्याची पेस्ट
  13. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  14. चवीनुसार मीठ
  15. 2 टेबलस्पून शेजवान चटणी
  16. सांबार साठी
  17. 2 कपतुरडाळ
  18. 1कांदा
  19. 2शेवग्याच्या शेंगा
  20. 2टॉमेटो
  21. 1 टीस्पूनहिंग पावडर
  22. 2 टेबलस्पूनलाल तिखट
  23. 2 टेबलस्पूनसांबार मसाला
  24. 1 टीस्पूनहळद
  25. चवीनुसार मीठ
  26. 4-5कढीपत्त्याची पाने
  27. चटणीसाठी
  28. 1/2 कपखवणलेल खोबरं
  29. 1/4 कपकोथिंबीर
  30. 4 टेबलस्पूनडाळ
  31. 5-6हिरव्या मिरच्या
  32. 1 टेबलस्पूनजीरे (फोडणी साठी)
  33. ८-१० लसणाच्या पाकळ्या
  34. चवीनुसार मीठ
  35. 2 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

४० मिनिटे
  1. 1

    डोस्याचे बॅटर तयार करण्यासाठी सर्वप्रथम तांदूळ,उडदाची डाळ,मेथ्या चार ते पाच तास पाण्यात भिजवून ठेवणे. पाच तासांनी डाळ व तांदूळ मिक्सरच्या भांड्यात बारीक वाटून डोस्याचे बॅटर तयार करून घ्यावे

  2. 2

    बटाट्याची भाजी तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी व हिंग फोडणीला घाला.मोहरी तडतडली की त्यात हळद, हिरव्या मिरच्या, लसून,आलं व कोथिंबीर चे वाटण घालून परतून घ्या.आता त्यात उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घाला, मीठ चवीनुसार घाला व मिक्स करावे.

  3. 3

    सांबार तयार करण्यासाठी सर्वप्रथम तुरडाळ शिजवून घ्या.आता एका भांड्यात थोडे तेल घेऊन त्यात मोहरी कढीपत्ता व कांदा टाकून कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या. आता त्यात आले लसून पेस्ट, हळद, टॉमेटो, सांबार मसाला व शिजवून धेतलेली डाळ घाला.गरजे प्रमाणे पाणी घालून चांगले उकळू द्यावे.

  4. 4

    आता तव्याला थोडेसे तेल लावून वर थोडे पाणी शिंपडावे म्हणजे डोसा चिकटणार नाही.

  5. 5

    धोडे मिश्रण घालून त्याचा डोसा तयार करा.तयार डोस्यावर शेजवान चटणी घालावी व त्यात भाजी भरावी.चटणी व सांबार बारोबर सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Similar Recipes