पौष्टिक मूग डाळ सूप : (paushtik moong dal soup recipe in marathi)

Swati Pote
Swati Pote @cook_24317961

#सूप
#GA4 #week10
#पौष्टिकमूगडाळसूप
#मूगडाळसूप
#मूग
काहीतरी हेल्दीआणि टेस्टी खाण्याचे मन होत असेल तर सगळ्यात पाहिले मूग डाळ सुपाची आठवण येते. आज मी मूग डाळ सूपाची रेसिपी सांगणार आहे जे की शरीरासाठी आरोग्यवर्धक आहे.

मूग पचायला हलके असल्याने अनेक समस्या कमी होण्यास मदत होते. त्यामधील फायबर घटका मुळे पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत होते. पोटात गॅस जमा होण्याचं प्रमाण नियंत्रणात राहते. मुग डाळ आरोग्यदायी असल्याने आजारपणात मूगडाळीचे सूप, मूग डाळीचे वरण आणि भात फायदेशीर ठरतो.

साहित्य :

१ वाटी मूग डाळ
७ कप पाणी
1 टीस्पून हींग
1 टीस्पून जीरे
1 टीस्पून मिरे पूड
1 टेबल तूप किंवा बटर
5 लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या
१ कांदा अगदी बारीक केलेला
मीठ चवीनुसार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

35 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. साहित्य :
  2. 1 वाटीमूग डाळ
  3. 7 कपपाणी
  4. 1 टीस्पूनहींग
  5. 1 टीस्पून जीरे
  6. 1 टीस्पून मिरे पूड
  7. 1 टेबलस्पून तूप किंवा बटर
  8. 5 लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या
  9. 1कांदा अगदी बारीक केलेला
  10. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

35 मिनिटे
  1. 1

    स्टेप १: सर्व प्रथम मुग डाळीला पाण्याने धुवून घ्या.

  2. 2

    स्टेप २: त्या नंतर मुग डाळीला कुकरच्या भांड्यात डाळ शिजेल इतपत पाणी आणि त्यात हिंग टाकून कुकरचे झाकण बंद करून गॅसवर वर ठेऊन ४ ते ५ शिट्ट्या होऊ द्या.कुकर थंड झाल्यावर मुंग डाळीला रवीने घोटून घ्या.

  3. 3

    स्टेप ३: एकीकडे गॅसवर जाड बुडाचे भांडे ठेवा, त्यात तूप टाकून थोडे गरम करा आणि त्यात जीरे घालून तडतडू द्या व बारीक लसूण टाकून परतून घ्या जास्त वेळ परतु नका. नंतर त्यात घोटलेली मुग वरणपेस्ट घालून मिक्स करा.

  4. 4

    त्यात तुम्हाला घट्ट पातळ जसे सूप पाहिजे तसे पाणी व मीठ भांड्यात घालून एक उकळी येऊ देणे.

  5. 5
  6. 6

    स्टेप 4: नंतर गॅस बंद करून बारीक केलेला कांदा, मिरे, आणि जीरे पूड आणि बटर टाकून गरमागरम सूप सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Swati Pote
Swati Pote @cook_24317961
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes