मटार करंजी (mutter karanji recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#मटार
हिवाळ्यात खाण्याची जबरदस्त रेलचैल असते, छान हिरव्या कंच भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात, मटार तर छान कोवळे गुळ्चट मिळतात.. आत्ता माझ्या सारखे तुम्ही पण मटार आणले असेल तुम्ही पण काही तरी नवीन करु इछिणार.. कधी कधी आकाराचा फरक पडतो.. मी करंजी केली तुम्ही दोन्ही.. करंजी किंवा गोल वळवून कचोरी पण करु शकता...

मटार करंजी (mutter karanji recipe in marathi)

#मटार
हिवाळ्यात खाण्याची जबरदस्त रेलचैल असते, छान हिरव्या कंच भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात, मटार तर छान कोवळे गुळ्चट मिळतात.. आत्ता माझ्या सारखे तुम्ही पण मटार आणले असेल तुम्ही पण काही तरी नवीन करु इछिणार.. कधी कधी आकाराचा फरक पडतो.. मी करंजी केली तुम्ही दोन्ही.. करंजी किंवा गोल वळवून कचोरी पण करु शकता...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30-40 मिनिट
9 नग
  1. 80 ग्रॅमकणिक
  2. 20 ग्रॅमबेसन
  3. 185 ग्रॅममटार दाणे
  4. 1 छोटाकांदा
  5. 3हिर्वी मिरची
  6. 1 टेबलस्पूनकोथींबीर
  7. 1/2 टीस्पूनतिखट
  8. 1/4 टीस्पूनहळद
  9. 1/4 टीस्पूनहिंग
  10. 1/4 टीस्पूनचाट मसाला
  11. 1/4 टीस्पूनपिठी साखर
  12. 1/4 टीस्पूनबडीशोप पावडर
  13. 1 टीस्पूनमीठ
  14. तेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

30-40 मिनिट
  1. 1

    मी इथे अर्धा किलो मटार शेंगा घेत्या होत्या सोलून त्याचे 185 ग्रॅम च्या जवळपास दाणे निघाले. ते मी किंचीत तेलात परतून घेतले व मिक्सर मधून दरदरीत करुन घेतलेय.

  2. 2

    आत्ता एका कढईत एक छोटा चमचा तेल घ्या त्या मधे आधी हिरव्या मिरच्या बारिक बारिक चिरून घाला व बारिक चिरलेला कन्दा घालुन परता. कांदा नरम झल्यावर त्यात तिखट हळद मीठ जीरे पुड धणे पूड व बडीशोप पावडर घाला छान मिक्स करा, व दरदरीत केलेले मटार घाला मग त्यात मीठ पिठी साखर चाट मसाला घालुन छान मिक्स करुन एक वाफ आणुन घ्या.

  3. 3

    कणिक आणी बेसन एकत्र करुन त्यात एक छोटा चमचा तेल व एक चीमुट मीठ घालुन घट्ट मळुन गोळा करून घ्यावे. त्या चे छोटे छोटे गोळे करुन घ्या व छोटी पोळी पण किंचीत जाड अशी लाटून घ्या. फोटो मधे दाखविल्या प्रमाणे एका भागात लम्बोळ्कया आकारात सारण ठेवा व कडान्ना पाणी लावुन घ्या व दुसरी बाजू त्या सारणा वर कवर करुन हलक्या हातानी दाबुन चिक्टावुन घ्या व फिर्किनी करंजी चा आकार देत जास्तीच्या कडा काढुन घ्या(हे तुम्ही करंजी च्या साच्यात पण करु शकता) असे सगळे करुन घ्या व एक एक करुन तळून काढावेत

  4. 4

    व चटनी किंवा सॉस बरोबर सर्व्ह करावे गरमागरम मटार करंजी... (अणि हिच कणकेची पारि करुन त्यात सारण भरून पुरण पोळी करतो तसे पारि बन्द करुन हलकेच दाबवे व तळावे म्हणजे ह्या झाल्या कचोरी तैय्यार)..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

Similar Recipes