मॅट समोसे आणि रिंग समोसे (Matt samosas and ring samosas recipe in marathi)

Mangala Bhamburkar
Mangala Bhamburkar @cook_26659112
Amravati

#GA4
#week21
#samose
समोसे कचोरी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना खूप आवडतात आपण ते नेहमी विकत आणून खातो पण जर अशा प्रकारचे वेगवेगळे समस्यांचे प्रकार केले तर सगळ्यांना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खूप आवडतील चला तर माज बनवूया मॅट समोसे आणि रिंग समोसे

मॅट समोसे आणि रिंग समोसे (Matt samosas and ring samosas recipe in marathi)

#GA4
#week21
#samose
समोसे कचोरी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना खूप आवडतात आपण ते नेहमी विकत आणून खातो पण जर अशा प्रकारचे वेगवेगळे समस्यांचे प्रकार केले तर सगळ्यांना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खूप आवडतील चला तर माज बनवूया मॅट समोसे आणि रिंग समोसे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
2व्यक्ती
  1. २०० ग्रॅममैदा
  2. 50 ग्रामरवा
  3. 1सिमला मिरची
  4. 3उकडलेले बटाटे
  5. 1/2 वाटीमटर
  6. 4हिरवी मिरची
  7. 1 टेबलस्पूनकसुरी मेथी
  8. 1 टेबलस्पूनआल - लसून पेस्ट
  9. 1 टीस्पूनओवा
  10. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  11. 1 टीस्पूनगरम मसाला
  12. 1 टीस्पूनचाट मसाला
  13. 1/2 टीस्पूनहिंग
  14. 3-4 टेबलस्पूनतेल+तळण्याकरता तेल
  15. 1 टीस्पूनजिर
  16. 1मोठा बारीक चिरलेला कांदा
  17. 1 टीस्पूनहळद
  18. 1 टीस्पूनलाल तिखट
  19. 1 टेबलस्पूनधने जीरे पुड
  20. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    प्रथम सर्व साहित्य जमा करून घ्या. बटाटे स्मॅश करून घ्या, कोथिंबीर बारीक चिरून घ्या, मटर सोलून घ्या, आलं-लसूण पेस्ट करा व हिरवी मिरची, कांदा बारीक चिरून घ्या

  2. 2

    दोनशे ग्रॅम मैदा घ्या व त्यात 50 ग्रॅम रवा घाला हाफ टीस्पून मीठ घाला व तीन ते चार चमचे तेल घाला व हाताने चुरगळून ओवा घाला हे सर्व व्यवस्थित मिसळा व थोडं थोडं पाणी घालून थोडं घट्ट सर भिजवून ठेवा व १५मिन.झाकून ठेवा

  3. 3

    स्टफिंग_ एका कढईमध्ये दोन चमचे तेल घ्या त्यात जिरं हिंग हिरवी मिरची कढीपत्ता अद्रक लसूण पेस्ट घाला एक मिनिट भाजल्यानंतर त्यात धने जीरे पूड कसुरी मेथी व बारीक चिरलेली शिमला मिरची घाला मटारचे दाणे घाला व एक वाफ येऊ द्या त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घाला व झाकण ठेवून शिजू द्या

  4. 4

    भाज्या आपण आपल्या आवडीप्रमाणे घालू शकता त्यानंतर त्यात हळद, तिखट, गरम मसाला व हाताने बारीक केलेले उकडलेले बटाटे घाला स्टफिंग मध्ये छान मिसळून घ्या, त्यात चाट मसाला घाला, अर्धा टी स्पून आमचूर पावडर घाला, कोथिंबीर व चवीनुसार मीठ घाला व तीन मिन.पर्यंत शिजू द्या व त्यानंतर ह्या मिश्रणाला थंड होऊ द्या.

  5. 5

    मळवून बाजूला ठेवलेले मैद्याचा गोळा, परत हाताला तेल लावून छान मळून घ्या पोळी पेक्षा थोडा मोठा उंडा घेऊन पोळपाटावर एक मोठी पोळी लाटा

  6. 6

    व आयताकार आकारात कापा आजूबाजूचं सर्व काढून टाका

  7. 7

    आयताकार तुकडे एकमेकावर परपेंडीकुलर ठेवा मध्ये मैद्याचा घोळ लावा म्हणजे त्या पट्ट्या एकमेकांना चिकटतील थोड दाबा व त्यावर टोमॅटो केचप लावा व नंतर दोन पट्ट्यांवर छोट्या छोट्या ६पट्ट्या कापा

  8. 8

    सर्व पट्ट्यांना मैद्याचा घोळ लावा. दोन पट्ट्या तशाच राहू द्या त्याच्यावर छोट्या पट्ट्या कापू नये, माधोमध बटाट्याच्या भाजीचे सारण टाका व न कापलेल्या पट्ट्या त्यावर व्यवस्थित चिटकवा जेणेकरून सारण बाहेर यायला नको मैद्याच्या घोळामुळे ते व्यवस्थित चीपकेल

  9. 9

    नंतर एक साईडची एक पट्टी उचला व प्लेन साईड वर हलक्या हाताने दाबा नंतर दुसऱ्या साईड ची एक पट्टी उचला व प्लेन साइडवर चिकटवा अशाप्रकारे पट्ट्या चीपकवत चीपकवत प्लेन साइडवर चटई बनवा. सर्व समोसे अशाप्रकारे बनवून तयार करा

  10. 10

    एका कढईत तळण्याकरता तेल ठेवा, तेल मंद आचेवर गरम झाल्यानंतर त्यात समोसे टाका थोडे ब्राऊनिष झाल्यावर पलटवा, अशाप्रकारे पलटून पलटून सोनेरी रंग येईपर्यंत तळा व एक्स्ट्रा तेल काढून टिशू पेपर वर पसरवा

  11. 11

    रिंग समोसे करण्याकरता सारण व तोच मैद्याचा गोळा घेऊन, गोल पोळी लाटा व पोळीच्या थोडं साईडला बटाट्याच्या भाजीचे सारण टाका व एक गुंडाळी घाला बाकी उरलेल्या पोळीवर छोटे छोटे काप देऊन गुंडाळी करा, काप देताना शेवटपर्यंत पोळीला काप देऊ नये

  12. 12

    अशाप्रकारे गुंडाळी झाल्यावर रिंग समोसा फोल्ड करा व त्याचे टोक मैद्याच्या घोळा ने चिकटवा व तळून काढा. समोसे ग्रीन चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत गरमागरम सर्व्ह करा.हे समोसे आपण डब्यात सुद्धा भरून ठेवून नंतर ही खाऊ शकतो ते तेवढेच कुरकूरीत राहतील

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mangala Bhamburkar
Mangala Bhamburkar @cook_26659112
रोजी
Amravati

टिप्पण्या (2)

Similar Recipes