ओली कुरकुरे भेळ (oli kurkure bhel recipe in marathi)

Mangala Bhamburkar
Mangala Bhamburkar @cook_26659112
Amravati

#GA4
#week26
#bhel
भेळ ही आंबट गोड चटपटीत सर्वांना आवडणारी डिश आहे साधारणतः भेळ स्ट्रीट फूड म्हणून प्रसिद्ध आहे तिच्या चटपटीत स्वाद , पचायला हलकी अशी डिश आहे तशी ती झटपट होते नेहमी भेळ ही मुरमुरे, शेंगदाणे, फरसाण, मिरची, कांदा, दही, चिंच चटणी ह्या साहित्याने बनवली जाते. आज आपण थोडी वेगळ्या प्रकारची भेळ बघणार आहोत

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५मिन.
३ व्यक्ती
  1. 100 ग्रामकुरकुरे
  2. मोठा उकडलेला बटाटा
  3. 1टोमॅटो
  4. 1मोठा कांदा
  5. 1मध्यम आकाराची काकडी
  6. 1 (1/2 टेबलस्पून)भाजलेले शेंगदाण
  7. 1 टेबल स्पूनचाट मसाला
  8. ५० ग्राम पापडी
  9. ५० ग्राम आलू भुजिया
  10. 2हिरवी मिरची
  11. 2 टेबलस्पूनमेयॉनीज

कुकिंग सूचना

१५मिन.
  1. 1

    प्रथम सर्व साहित्य गोळा करावे

  2. 2

    कांदा बारीक चिरून घ्यावा उकडलेल्या बटाट्याचे साल काढावे, टोमॅटो बारीक चिरून घ्यावा, कोथिंबीर बारीक चिरावी, काकडी बारीक चिरून घ्यावी, भाजलेल्या शेंगदाण्याचे साल काढून घ्यावे

  3. 3

    नंतर एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये प्रथम कुरकुरे घालावे त्यानंतर त्यात,शेंगदाणे,बटाट्याचे तुकडे हिरवी मिरचीचे तुकडे काकडी चे तुकडे बारीक चिरलेले टोमॅटो व कोथिंबीर हे सर्व घालून छान मिक्स करावे.

  4. 4

    नंतर त्यात चाट मसाला घालून परत मिक्स करावे व मेहुणी घालून छान फेटावे

  5. 5

    ही भेळ थोडी ओलसर व आंबट गोड एकदम चविष्ट लागते

  6. 6

    सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर भेळ सर्व्हिंग प्लेटमध्ये काढावे व पापडी आलू भुजिया नी गार्निश करावी थोडी वरून कोथिंबीर पेरावी. लज्जतदार भेळ तयार होईल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mangala Bhamburkar
Mangala Bhamburkar @cook_26659112
रोजी
Amravati

टिप्पण्या

Similar Recipes