पनीर मटार सब्जी (paneer matar sabji recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#पनीर मटार सब्जी सगळ्यांची आवडती भाजी पनीरमधुन शरीराला त्वरीत उर्जा मिळते. पनीर मधील कॉल्शियम फॉस्फरस मुळे वेदना कमी होतात. दात, हाडांसाठी फायदेशीर, ओमेगा३ मधुमेहासाठी फायदेशीर पाचनतंत्र सहज होते. कर्करोग कमी करण्यासाठी फायदा तसेच मटार वजन , रक्तदाब, कोलेस्टॉर नियंत्रित करतात. बध्द कोष्टता दुर करते. रोगप्रतिकार शक्ति वाढते. हाडे मजबुत होतात. केस गळती कमी होते. त्वचा टवटवीत होते. पोटांच्या समस्या कमी होतात. विसराळुपणा कमी होतो
चलातर अशा पौष्टीक पनीर मटारची सब्जी कशी बनवायची ते बघुया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
२-४ जणांसाठी
  1. 1 टेबलस्पुनदही
  2. 1 टीस्पूनसाखर
  3. 1 टीस्पूनजीरे
  4. 1 पिंचहिंग
  5. चविनुसारमीठ
  6. 1-2 टेबलस्पुनतेल
  7. ५० ग्रॅम मटार
  8. 2टोमॅटो
  9. 2वेलची
  10. 4बदाम
  11. 4काजु
  12. 4लसुण पाकळ्या
  13. 1आल्याचा तुकडा
  14. 1 टेबलस्पुनघरगुती मसाला
  15. १०० ग्रॅम पनीर
  16. 2कांदे
  17. 1/4 टीस्पूनहळद

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    मटार व टोमॅटो गरम पाण्यात थोडे उकडून घ्या

  2. 2

    कढईत थोडे तेल गरम करून त्यात पनीरचे बारीक पिस व नंतर उकडलेले मटार थोडे फ्राय करून घ्या

  3. 3

    मिक्सर जारमध्ये कांदे उकडलेले टोमॅटो साल काढुन तुकडे करून टाका बदाम वेलचीकाजुआलं लसुण हळद तिखट सर्व मिक्स करून पाणी टाकुन पेस्ट करून घ्या

  4. 4

    दुसऱ्या कढईत तेल गरम झाल्यावर त्यात जीरे व हिंग टाकुन तडतडल्यावर त्यात तयार केलेली पेस्ट टाकुन सतत परतत रहा तेल सुटेपर्यंत

  5. 5

    ग्रेव्हीतील तेल सुटल्यावर त्यात आवश्यकते नुसार गरमपाणी मिक्स करा नंतर त्यात दही मीठ थोडी साखर मिक्स करून शिजवा

  6. 6

    नंतर ग्रेव्हीत फ्राय केलेले पनीर व मटार मिक्स करा व ऐक उकळी काढा आपली पनीर मटार ग्रेव्ही खाण्यासाठी रेडी

  7. 7

    तयार पनीरमटार सब्जी डिशमध्ये सर्व्ह करा वरून थोड़ी कोथिंबीर पेरून

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Similar Recipes