नारळाच्या दुधातलं वरण (naralachya dhudhatla varan recipe in marathi)

Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies

#dr
#पारंपरिक रेसीपी
हि माझ्या आज्जीची रेसीपी आहे. आंबट गोड अश्या चवीचे हे नारळाच्या दुधातलं वरण नक्की करून पहा..

नारळाच्या दुधातलं वरण (naralachya dhudhatla varan recipe in marathi)

#dr
#पारंपरिक रेसीपी
हि माझ्या आज्जीची रेसीपी आहे. आंबट गोड अश्या चवीचे हे नारळाच्या दुधातलं वरण नक्की करून पहा..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनीट
4 सर्व्हिंग्ज
  1. 1/4 कपतूरडाळ
  2. 1 कपखोवलेला नारळ
  3. 1हिरवी मिरची
  4. 6,7कोकम
  5. 1 टेबलस्पूनगूळ
  6. कोथिंबीर
  7. मीठ चवीनुसार
  8. फोडणीसाठी-
  9. 2 टीस्पूनतेल
  10. 1 टीस्पूनजीरे
  11. 1 टीस्पूनमोहरी
  12. 1 टीस्पूनहिंग
  13. 1 टीस्पूनहळद
  14. कढीपत्ता

कुकिंग सूचना

30 मिनीट
  1. 1

    प्रथम तूरडाळी मध्ये दुप्पट पाणी घालून कुकर मध्ये शिजवून घ्यावे. चिंच गरम पाण्यात भिजवून ठेवावी.

  2. 2

    खोवलेल ओल खोबरे व थोडे पाणी घालून मिक्सरच्या भांड्यात फिरवून घ्यावे.

  3. 3

    पातेल्यात फोडणीसाठी तेल गरम करुन त्यात जीरे, मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता घालावा. यामध्ये आता घोटलेली तुरीची डाळ व मिक्सरमध्ये वाटून घेतलेले नारळाचे दूध घालून चांगले ढवळून घ्यावे.

  4. 4

    यामध्ये चिंचेचा कोळ, गूळ आणि मीठ घालावे.

  5. 5

    एक उकळी आणावी. गरमागरम भातासोबत नारळाच्या दुधातलं वरण सर्व्ह करावे.

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स (6)

Cook Today
Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies
रोजी
Follow to learn Awesome Delicacies to bring sweetness to your life n your loved ones|Homebaker|Author|foodblogger|Creative||vegetarian| |Food Photography | |Love for Cooking baking|
पुढे वाचा

Similar Recipes