भगरीचा  केशरी साखर भात (bhagricha kesar sakhar amba recipe in marathi)

Sandhya Deshmukh
Sandhya Deshmukh @4567vijayd

#cpm6
# उपवास रेसीपी

भगरीचा  केशरी साखर भात (bhagricha kesar sakhar amba recipe in marathi)

#cpm6
# उपवास रेसीपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
4 जण
  1. 1 वाटीभरून भगर कींवा वरी तांदूळ
  2. 1/2 वाटीसाजूक तुप
  3. 1 वाटीसाखर
  4. 1 वाटीदूध
  5. 2 वाट्यापाणी
  6. आवडीप्रमाणे केशर कींवा खाण्याचा केशरी कलर
  7. 1 टीस्पूनविलायची पुड
  8. आवडी प्रमाणे ड्रायफ्रूटस्
  9. चिमुटभरमीठ
  10. 2 टेबलस्पूनखोबरा कीस
  11. 4लवंगा

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    प्रथम भगर स्वच्छ धूवून चाळणीमध्ये निथळत ठेवा.दुध गरम करून घ्यावे.अर्धी वाटी दुधामध्ये केशर घालून ठेवावे..पाणी गरम करून घ्यावे.

  2. 2

    कढईत तूप गरम करावे.हा भात भरपुर तुपात करावा,छान लागतो.तूप गरम झाल्यावर लवंगा घालून,भगर घालून मंद गॅसवर खमंग भाजून घ्यावे.नंतर गरम दुध व पाणी मिक्स करून घालावे..गरज असेल तर जास्त पाणी वापरावे.चिमुटभर मीठ घालावे.व भगर मऊ शिजवून घ्यावी.

  3. 3

    भगर शिजल्यानंतर त्यात साखर टाकायची..आवडीप्रमाणे साखर कमीजास्त करू शकता.साखर छान मिक्स करून घ्यायची.केशर मिश्रित दूध व कींचित फुड कलर घालावा.ड्रायफ्रूटस् व खोबरा कीस घालायचे.विलायची पुड घालायची.छान मिक्स करून मंद गॅसवर वाफ आणून घ्यायची..

  4. 4

    आपला सुंदर, चविष्ट भगरीचा केशरी साखरभात तयार आहे...ड्रायफ्रूटस् आणि केशर काड्यांनी सजवून सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sandhya Deshmukh
Sandhya Deshmukh @4567vijayd
रोजी

Similar Recipes