बनाना कॉफी वॉलनट स्मूदी (banana coffee walnut smoothies recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#9_रात्रींचा_जल्लोष #nrr #कोणतेही फळ
#दिवस_आठवा #बनाना_कॉफी_वॉलनट_स्मूदी

#नवरात्रौत्सवातील_नवदुर्गा🙏🌹🙏 शारदीय नवरात्रौत्सवाच्या तुम्हां सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा💐🌹🙏शारदीय नवरात्रातील अत्यंत महत्वाची तिथी अष्टमी.. आठवा दिवस अष्टमीचा..अष्टमीला दुर्गा मातेचे सर्वात शांत स्वरूप महागौरीची पूजा करण्याची परंपरा आहे. देवीचे हे रूप प्रत्येक भक्ताच्या इच्छा पूर्ण करते आणि त्यांना सर्व त्रासांपासून मुक्ती देते. तिचा जन्म झाला तेव्हा ती आठ वर्षांची होती. म्हणूनच नवरात्रीच्या आठव्या दिवशी त्यांची पूजा केली जातेअष्टमी तिथीला कन्या पूजन करणे विशेषतः फलदायी मानले जाते. असे मानले जाते की घरात फक्त देवी मुलीच्या रूपात येते. म्हणून, भक्तिभावाने त्यांची सेवा केली पाहिजे आणि शीरा,हरभरा चणे भाजी, पुरी किंवा पुरणपोळी खीर अर्पण केली पाहिजे. असे म्हटले जाते की कन्या पूजेशिवाय दुर्गा पूजा अपूर्ण मानली जाते. या परंपरेला कुमारी पूजा असेही म्हणतात. असे मानले जाते की मुलीची पूजा केल्याने आई तिच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते आणि ऐश्वर्य प्राप्त करते...तसेच अष्टमीला उपवास करुन महालक्ष्मीची पूजा करुन घागरी फुंकतात,सप्तशतीचा पाठ केला जातो,सवाष्णींना घरी बोलावून त्यांची पूजा करतात..असा हा नवरात्रीतील अत्यंत महत्वाचा दिवस..🙏
8...महागौरी- आस्था, श्रद्धा व विश्वासाने सुसंपन्न होण्याचा संदेश देणारे हे रूप. देवीची ही अवस्था आठ वर्षांची मानली जाते. तिचा वर्ण शंख, चंद्र व कुंदाच्या फुलाप्रमाणे उज्ज्वल आहे. ही चतुर्भुजा, वृषभ वाहिनी शांतीस्वरूप आहे.महागौरी म्हणजे पार्वतीने भगवान शंकरांची तपश्चर्या करून त्यांची पत्नी झाली. . ती दु:ख दूर करते अशी उपासकांची श्रद्धा आहे.🙏🌹🙏

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनीटे
2 जणांना
  1. 2केळी
  2. 10-12अक्रोड तुकडे
  3. 4 टेबलस्पूनमध
  4. 1/2 टीस्पूनकॉफी
  5. 1 कपदूध
  6. 3-4खजूर
  7. साखर ऐच्छिक चवीनुसार

कुकिंग सूचना

10 मिनीटे
  1. 1

    सर्व साहित्य एके ठिकाणी जमा करून घ्या.

  2. 2

    केळी,खजूर,अक्रोड यांचे तुकडे करून घ्या. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये दीड केळीचे तुकडे,खजूर,अक्रोड, कॉफी मध,साखर ऐच्छिक, दूध घालून व्यवस्थित ब्लेंड करून घ्या.

  3. 3

    आता या मिश्रणात केळ्यांच्या गोल चकत्या घाला आणि मिश्रण हळुवार एकजीव करा. थोडा वेळ फ्रीजमध्ये गार करून घ्या.

  4. 4

    आता एका ग्लासमध्ये बनाना कॉफी वॉल नट स्मूदी ओतून केळ्यांच्या गोल चकत्या आणि अक्रोडचे तुकडे यांनी गार्निश करून सर्व्ह करा.

  5. 5
  6. 6
  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

Similar Recipes