खुसखुशीत मुगडाळ मिनी कचोरी (moong dal mini kachori recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

#EB2
#week2

"खुसखुशीत मुगडाळ मिनी कचोरी"

मी प्रत्येक आठवड्यातील सगळ्याच रेसिपीज बनवण्याची हौस होती पण तब्येतीची कुरबुर चालू असल्याने बाकीच्या रेसिपीज जमेल तशा करण्याचा प्रयत्न करत आहे..

खुसखुशीत मुगडाळ मिनी कचोरी (moong dal mini kachori recipe in marathi)

#EB2
#week2

"खुसखुशीत मुगडाळ मिनी कचोरी"

मी प्रत्येक आठवड्यातील सगळ्याच रेसिपीज बनवण्याची हौस होती पण तब्येतीची कुरबुर चालू असल्याने बाकीच्या रेसिपीज जमेल तशा करण्याचा प्रयत्न करत आहे..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

एक तास तीस मिनि
घरातील सगळ्यांस
  1. 1/2 कपमुग डाळ
  2. 2.5 कप मैदा
  3. 5 टेबलस्पूनतूप
  4. 2 टेबलस्पूनबेसन पीठ
  5. 2 टेबलस्पूनधने
  6. 1 टेबलस्पूनबडीशेप
  7. 1 टेबलस्पूनजीरे
  8. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  9. 1 टेबलस्पूनआले मिरची लसूण पेस्ट
  10. 1 टीस्पूनगरम मसाला
  11. 1 टीस्पूनकसुरी मेथी
  12. 1/4 टीस्पूनहळद
  13. 1/4 टीस्पूनहिंग
  14. 1 टीस्पूनआमचूर पावडर
  15. 1 टीस्पूनचाट मसाला
  16. 2 टीस्पूनसाखर
  17. चवीनुसारमीठ
  18. आवडीनुसार कोथिंबीर

कुकिंग सूचना

एक तास तीस मिनि
  1. 1

    मुगडाळ चार तास भिजत ठेवा.. कढईत एक कप पाण्यात डाळ घालून पाच मिनिटे वाफवून घ्या. चाळणीवर ओतून घ्या व पाणी निथळून घ्यावे

  2. 2

    तोपर्यंत पीठ मळून घ्या..परातमध्ये मैदा चाळून घ्या, मीठ घाला व तूप थोडे मेल्ट करून घाला. सगळ्या मैद्याला चोळून घ्या.. मुठीत मैद्याचे मुटके झाले पाहिजे.. थोडे थोडे पाणी घालून पीठ जास्त घट्ट ही नाही आणि खुप सैल ही नाही अशा पद्धतीने पीठ मळून घ्या

  3. 3

    स्टफिंग चे सर्व साहित्य एकत्र जमवून घ्या.. धने, जीरे, बडीशेप मिक्सरमध्ये जाडसर भरडा करून घ्या..

  4. 4

    वाफवलेली डाळ मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या.. पॅनमध्ये बेसन पीठ भाजून घ्या.. प्लेटमध्ये काढून घ्या.. पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जीरे,धने, बडीशेप ची भरड परतून घ्या. सुके मसाले घालून छान परतून घ्या.. आता डाळीची भरड घालून घ्या

  5. 5

    व छान मंद आचेवर खरपूस परतून घ्या.. जेणेकरून सगळे मसाले व डाळीची भरड एकजीव होतील.. बेसन पीठ, मीठ घालून दोन तीन मिनिटे परतून घ्या..तयार आहे कचोरी च्या आतील स्टपिंग..

  6. 6

    स्टपिंग प्लेटमध्ये काढून थंड झाल्यावर त्याचे छोट्या आकाराचे गोळे बनवून घ्या म्हणजे कचोरी बनवताना सोपे जाईल..आता पीठ परत चांगले मळून घ्या व छोटे छोटे गोळे तोडून घ्या. पीठाचा गोळा हातावर घेऊन एकसारखा करून त्याची पारी करून घ्या व त्यात स्टपिंग भरून गोल गरगरीत मिनी कचोरी बनवून घ्या..

  7. 7

    गॅसवर कढईत तेल मिडीयम गॅसवर गरम करून गॅस लो टू मिडीयम करून एक एक कचोरी टाकून मस्त सोनेरी रंगावर तळून घ्या..

  8. 8

    मस्त खस्ता मिनी कचोरी हिरवी चटणी,चिंचगुळाची चटणी, तळलेल्या मिरची सोबत सर्व्ह करा..

  9. 9
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
लता धानापुने
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes