मालपुआ (Malpua recipe in marathi)

anita kindlekar
anita kindlekar @anita_9

सगळ्यांना आवडणारा आणि झटपट होणारा गोडाचा पदार्थ

मालपुआ (Malpua recipe in marathi)

सगळ्यांना आवडणारा आणि झटपट होणारा गोडाचा पदार्थ

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

एक तास
४ ते ६ जणांसाठी
  1. 1 वाटीखवा
  2. 1 वाटीमैदा
  3. 1 वाटीदुध
  4. 1/4 वाटीपाणी
  5. 3 ते ४ वेलची
  6. तळण्यासाठी तूप
  7. सजावटीसाठी सुकामेवा
  8. पाकासाठी
  9. 1 वाटीसाखर
  10. 1/2 वाटीपाणी

कुकिंग सूचना

एक तास
  1. 1

    मैदा आणि खवा एका पातेल्यात घेवून हाताने छान मिक्स करून घ्या.असे केल्यामुळे मैदा आणि खवा छान एकजीव होतात.

  2. 2

    आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरच्या मदतीने एकजीव करायचे आहे. मिश्रण फार पातळ आणि जाड होणार नाही याची काळजी घ्या.दूध थोडं थोडं करून त्यात घाला. आपण केलेले मिश्रण असे असावे की तुपात घातल्यावर ते छान पसरवता आले पाहिजे. मिश्रण एका भांड्यात काढून झाकून ठेवा

  3. 3

    आता एका गॅसवर पातेले ठेवून त्यात पाणी आणि साखर घाला. हे मिश्रण सतत ढवळत राहा. त्यातही थोडी वेलची पुड घाला चव छान लागते. एक तारी पाकी तयार करून घ्या.दुसऱ्या गॅसवर पॅनमध्ये तूप घाला आणि मंद आचेवर तूप गरम करा.

  4. 4

    आता पळीभर मिश्रण घेवून ते पॅनमध्ये सोडा. छान गोल आकार तयार करा. मंद आचेववर आपले मालपुआ खरपूस तळले जातात. एक बाजू तळून झाली की परतून दुसऱ्या बाजूने मालपुवा तळून घ्या. तुपात तळल्यामुळे त्याचा स्वाद द्विगुणीत होतो. तुम्ही तुपाऐवजी तेल वापरु शकता

  5. 5

    आता तळलेल्या मालपुआमधील अतिरीक्त तूप निघाले की त्याला साखरेच्या पाकात घाला. सगळ्या बाजूंनी त्याला पाक लागायला हवा. म्हणजे खाताना तोंडात साखर, खवा आणि तो खरपूसपणा वा वा तोंडाला पाणी सुटलं !! आता सजावटीसाठी सुकामेवा किसून घ्या.

  6. 6

    आता पाकातील मालपुआ काढून एका ताटलीत ठेवा त्यात आपल्या आवडीप्रमाणे सुकामेवा घालून सजावट करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
anita kindlekar
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes