Similar Recipes
-
-
पुरणाचे दिंडे (purnache dind recipe in marathi)
#shravanqueen#cook snap ही रेसिपी आमच्या नागपूरकडे त्याला पूर्णा चे फळ असे म्हणतात. हे नागपंचमीला बनविले जाते कारण बरेच बरेच जणांकडे तवा वापरला जात नाही. त्याला पर्याय म्हणून हा एक प्रकार प्रचलित आहे. वाफवलेला असला तरीही अतिशय स्वादिष्ट आहे. थँक्यू मोहिते मॅडम त्यांनी खूप छान समजून सांगितली रेसिपी. सर्वांना ती आवडली घरी देखील . Rohini Deshkar -
तीळगुळ पोळी (teelgul poli recipe in marathi)
#EB9#W9संक्रांतीच्या सणासाठी खास केली जाणारी पौष्टीक अशी तीळगुळाची पोळी....शुभ मकरसंक्रांत..... Supriya Thengadi -
पुरणाचे दिंड (purnache dinde recipe in marathi)
#shravanqueen #post2 #cooksnap supriya vartak mohite यांची रेसिपी मी बनवली आहे.श्रावणात नागपंचमीच्या दिवशी बर्याच घरी पुरणाचे दिंड बनवले जातात. त्यादिवशी काही कापत किंवा चिरत नाहीत म्हणून उकडलेले पुरणाचे दिंड बनवतात. आमच्या कडे पातोळ्या बनवतात त्यामुळे मी ही रेसिपी पहिल्यांदाच बनवली. आणि घरी पण सगळ्यांना खूप आवडली. कुकपॅडमुळे मला ही रेसिपी बनवायला मिळाली याबद्दल मी खूप आभारी आहे Ujwala Rangnekar -
थंडाई पुरणपोळी.. (thandai puran poli recipe in marathi)
#hr #थंडाई_पुरणपोळीथंडाई पुरणपोळी...😋 होळी हा संपूर्ण भारतात उत्साहात साजरा होणारा हा सण...कुठे होळी तर कुठे शिमगा,शिमोगा, होलिका ,लठमार होळी..वाईट गोष्टींवर विचारांवर चांगल्या गोष्टींनी विचारांनी या दिवशी विजय मिळवलेला आहे म्हणून या चांगल्या गोष्टीचे स्वागत करण्यासाठी आणि नकारात्मक विचार जाळून टाकण्यासाठी आपण होळी साजरी करतो त्याच प्रमाणे निसर्गामध्ये जो बदल होतो त्याचे स्वागत करण्यासाठी देखील होळी साजरी केली जाते थंडीचा मोसम आता मागे पडलेला असतो आणि वसंत ऋतूचे आगमन झालेले असते आणि उन्हाळ्याची चाहूल लागलेली असते त्यामुळे या उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळावा अशा काही पदार्थांची योजना आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेली आहे त्यामुळे आपल्या शरीराला आता उन्हाळ्यात अशा मधुर पदार्थांनी थंडावा तर मिळतोच पण पौष्टिकताही लाभते... होळी म्हटली की पुरणपोळी आली..😋. अमिताभ चे रंग बरसे भीगे चुनरवाली हे गाणं ..😍आणि थंडाई..😋 देखील आली ..या तीन गोष्टींशिवाय होळी पूर्ण झाल्याचा फील येतच नाही चला तर मग आपण या तापलेल्या उन्हात शरीराला थंडावा आणि पौष्टिकता प्रदान करणारी थंडाई पुरणपोळीची रेसिपी बघूया.. Bhagyashree Lele -
पुरणाचे दिंड (purnache dind recipe in marathi)
#tri #tri_ इनग्रेडिएंट_ रेसिपी #पुरणाचे_दिंडश्रावण मासी हर्ष मानसी 😍हिरवळ दाटे चोहीकडे 🌿🌱☘️क्षणात येते सरसर शिरवे🌧️🌧️क्षणात फिरुनी ऊन पडे🌦️🌦️🌈हसरा लाजरा श्रावण मासाचे गीत गाता गाता निसर्गाबरोबरच आपणही खरचं किती टवटवीत, प्रफुल्लित होतो नं..😍*नेमेचि येतो मग पावसाळा* या उक्तीप्रमाणे पावसाळा जीवन घेऊनच पृथ्वीतलावर अवतरतो...आणि क्षणार्धात सगळे रुपडे पालटतो वसुंधरेचे.🌦️🌧️🌿..सगळीकडे कशी नवचैतन्याची गोड शिरशिरी पसरते..🌱.आणि आपोआपच तन मन आनंदलहरींवर तरंगू लागते..याच मोहमयी श्रावणातला पहिला सण #नागपंचमी🐍..लेकीबाळींचा सण...👭 माहेरवाशिणींचा सण.खरंतर समस्त स्त्री जातीचा सण....नटण्या मुरडण्याचा सण...स्वतःला pampaer करण्याचा सण😊.. हिरव्यागार श्रावणातला हिरव्या मेंदीचा गर्द केशरी सण...🌿खरंतर संपूर्ण भारतवर्षात साजर्या केल्या जाणार्या बहुतेक सणांनी स्त्री भोवतीच फेर धरलेला आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही..सणांच्या निमित्ताने सतत तनामनाला टवटवी देण्याचं,प्रसन्नता, सकारात्मकता यांचे powepacked package जणू बहाल केलंय आपल्याला आपल्या संस्कृतीने..प्रगतीच्या वाटेवर असूनही आपल्या भारतीय संस्कृतीची पाळेमुळे घट्ट रोवलेली आहेत...उपकार कर्त्याची जाणीव ठेवून त्याला देवत्व बहाल करुन त्यांना पूजणे हे आपले संस्कार...उगाच आपले *जुने जाऊ द्या मरणांलागुनि*हे आपल्या तत्वात बसत नाही...तर आजचा हा #नागपंचमी चा सण शेतकर्यांचा... कृषीप्रधान देश असल्यामुळे पंचमहाभूतांवर अवलंबून...त्याबरोबरच शेतीला साहाय्यभूत ठरणार्या प्राण्यांवर देखील अवलंबून...आणि यातूनच उपकाराची परतफेड करणारा आजचा #सण..🐍🐍 नागोबाची दूध,ज्वारीच्या लाह्या,कणीकसाखरेची सोजी,पुरणाचे दिंड यांचा नैवेद्य दाखवून पूजा करायची... Bhagyashree Lele -
कॉर्न पुरणपोळी (Corn puranpoli recipe in marathi)
#MLR#मार्च लंच रेसिपीजआता कॉर्नचा एक नविन इनोव्हेटिव्ह प्रकार. पुरणपोळी तर सगळ्यांचं आवडते. आणि सणवार, कुळधर्म यामुळे ती वरचेवर केली पण जाते. म्हणून म्हणून नेहमी एकाच प्रकारची पुरणपोळी करण्यापेक्षा काहीतरी जरा हटके म्हणून ही कॉर्न पुरणपोळी विथ कॉर्न रबडी. दोन्हीही पदार्थ अतिशय टेस्टी,हेल्दी, व इनोव्हेटिव्ह. Sumedha Joshi -
-
-
पुरण पोळी (puran poli recipe in marathi)
#shrश्रावणात केल्या जाणार्या अनेक गोड पदार्थांमधला एक छान गोड पदार्थ....पुरण पोळी सर्वांची आवडती..... Supriya Thengadi -
-
-
पुरणाचे मोदक (purnache modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकआमच्याइथे गणपतीच्या पहिल्या दिवशी गणपतीला पुरणाच्या मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो. तर चला पाहूया हे कसे बनवले. Pallavi Maudekar Parate -
पुरणाचे मोदक (purnache modak recipe in marathi)
#मोदकगणेश चतुर्थीला गणपती ला आमच्या कडे पुरणाचा मोदकाचा नैवेद्य असतो. Sandhya Chimurkar -
पुरणाचे दिंड (purnache dinde recipe in marathi)
#shravanqueenरेसिपी 2 छान रेसिपी आहे,खूप दिवसांनी केली..लहानपणी खात होते पण आता केली.. Mansi Patwari -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#cpm4पारंपरिक व पौष्टिक अशी ही खीर खूप चविष्ट होते अगदी गव्हाचा कोंडा काढण्यापासून ते गूळ घालून एकजीव करेपर्यंत खूप वेळ लागतो पण चव भन्नाट आहे व गव्हाची व गुळाची दोन्ही कॉम्बिनेशन त्यात मध्ये लागणारे खोबऱ्याचे तुकडे खूप छान खीर होते ही दुसऱ्या दिवशी अजून चविष्ट लागते Charusheela Prabhu -
चाचणी बेसनाचे लाडू (besan ladoo recipe in marathi)
नैवेद्य#रेसिपीबुक #week3नैवेद्याची मानकरीण चणाडाळ आहे .कितीही पक्वान्ने केली तरी पूरण जातेच.स्वामींना बेसनाचा लाडू अतिप्रिय म्हणून आणि माझ्या ऐहिक गुरून आवडतात म्हणूनही मी चाचणी बेसनाचे लाडू करते.करू.चाचणी म्हणजे परीक्षा हे तुम्हाला माहीत आहेच. ज्या सुगरणीने साखरेच्या पाकाला चाचणी हे नाव दिलं असेल ती खरंच हुशार असली पाहिजर किंवा पाकाच्या हटवादीपणाने हटली असावी.मला तो प्रश्न नव्हता.या चाचणीत मी केव्हाच पास झालेय.याशिवस्य या बेसनासाठी डाळ भिजवून,वाटून घायवी लागते,त्यानंतर तुपावर परतून घाययची असल्याने तूप आणि वेळ भरपूर लागतो बेसन भाजायला. पण मी मुळातच शॉर्टकट्स शोधण्यात तत्पर असल्याने यातही शिधला आहे,वाटलेली डाळ वाफवून नन्तर भाजायची,म्हणजे तूप, वेळ, आणि श्रम कमी लागतात.आणि मोतीचुराच्या चवीचे लाडू तयार होतात.घ्या तर साहित्य जमवायला. नूतन सावंत -
पुरणाचे दिंडे (purnache dind recipe in marathi)
#shravanqueen#कुकस्नॅप#रेसिपीबुक#week7 माझ्या मते शुद्ध आणि निर्मळ मनाने केलेला कुठलाही पदार्थ हा सात्विक असतो .तेव्हा कांदा आणि लसूण वर्ज्य म्हणजेच सात्विक अन्न असे कसे म्हणता येईल ? (माॉ के हात के खाने में जो जादू है वो दूनिया के किसी भी खाने मे नही) असं म्हणतात ते उगीच नव्हे. कारण, तुम्ही कुठल्याही पंचतारांकित हॉटेलमध्ये कितीही चमचमीत, चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ जरी खात असाल तरी त्या पदार्थाला आईने केलेल्या पदार्थाची चव अजिबात येणार नाही .कारण पंचतारांकित हॉटेलमध्ये केलेले जेवण म्हणजे, केवळ एक व्यवहार असतो. ते केवळ घेणं जाणतात .देनं नव्हे. आणि आई केवळ देन जाणत असते .म्हणूनच ममतेने वात्सल्याने आणि निर्मळ मनाने केलेला कुठलाही पदार्थ हा सात्विक पदार्थ ठरतो. थोडक्यात सांगायचे झाल्यास जे अन्नग्रहण केल्याने आपला बौद्धिक, शारीरिक आणि मानसिक विकास होत असेल ते अन्न म्हणजे सात्विक अन्न. Seema Mate -
गुळ पोळी (gul poli recipe in marathi)
#EB9 #week9#विंटर स्पेशल रेसिपीज Ebookहर्षोउल्हास आणि आनंदमय समृद्धीचे प्रतीक असलेला मकरसंक्रांतीचा हा उत्सव, आपल्या सर्वांच्या आयुष्यात नवचैतन्य व माधुर्य घेऊन येवो, ही सदिच्छा. मकर संक्रांतीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.ह्या थंडीच्या दिवसांत हवेत गारवा असतो आणि तीळगुळ हे शरीरात ऊर्जा उत्पन्न करतात त्यामुळे असे पदार्थ आवर्जून सेवन केले पाहिजे. Sumedha Joshi -
पुरणपोळी (Puranpoli recipe in marathi)
#MWK सुट्टी म्हणून माझा नातू इथे आहे.त्याला गोड, पुरणपोळी खुप आवडते.त्याची फर्माईश आणि आठवडा अखेर काही तरी वेगळे म्हणून पुरणपोळी केली. Pragati Hakim -
उपवासाचे उकडीचे मोदक
#रेसिपीबुक #मोदक#week10 #पोस्ट2उपवासाठी नैवेद्य म्हणून स्वादिष्ट असा हा पदार्थ मी तुमच्या बरोबर शेअर करत आहे. Arya Paradkar -
पुरणाचे दींड (Purnache Dind Recipe In Marathi)
#SSR श्रावण सुरु झाला व सण सुरु झाले त्या मुळे रोज कांही तरी गोड पदार्थ होतोच व तसेच काही पारंपारीक पदार्थ पण आहेत ते त्या त्या सणाला केले जातात जसे की पुरणाचे दिंड ,नागपंचमीला करतात, कोणा कोणा कडे भाजणे चिरणे, किंवा तळणे करत नाहीत तेंव्हा हे उकडीचे दिंड केले जातात. Shobha Deshmukh -
सांजा ची पोळी (sanja chi poli recipe in marathi)
#श्रावणश्रावणाच्या आनंदवारीत आज आला शनिवारदीनदुखितांची करा सेवा सांगे संपत शनिवार.उपासना करु मारूतीची शक्तिचा जागरआवडत्या श्रावणात आला नागपंचमी सणनागांचे करण्या रक्षण पूजा करू प्रतिकांची.राखा सुंदर पर्यावरण शिकवण संस्कृतीची.घरोघरी असे फुलोरा दुधलाहीचा प्रसाद भलानागपंचमी करू साजरी उधाण आले आनंदाला.ऊंच ऊंच झोके घेऊ खेळ खेळू आनंदातझिम्मा फुगडी खेळू मनातल्या मनात.आज आमच्या कडे नैवेद्यला सांजा ची पोळी करतात. तिच मी तुम्च्या साठी घेउन आली आहे Devyani Pande -
-
पुरणपोळी (puran poli recipe in marathi)
#gurपुरणपोळी हा अनेकांचा आवडता पदार्थ. सण आले की पुरणपोळी करण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू होते. गरमागरम तव्यावरून डायरेक्ट ताटात आलेली, स्वादिष्ट पुरणाने टम्म फुगलेली आणि साजूक तुपात थबथबलेली पुरणपोळी खाण्याची मजा काही औरच असते.आज गौरीच्या माहेरपणाला खास पुरणपोळीचा थाट ...😊 Deepti Padiyar -
उकडीचे पुरणाचे दींड (ukadiche purnache dhind recipe in marathi)
# नागपंचमीच्या दिवशी कापणे , भाजणे. चीरणे किंवा जमिनीतुन कांही तोडणे करत नांहीत त्यामुळे तळणे व भाजणे बंद व त्या साठी उकडीचे दींड करतात व तळणे नाही म्हणुन ढोकळा करतात पण ते ढोकळा नेहमी च्या ढोकळ्यावर प्रमाणे नसतात. Shobha Deshmukh -
मॅंगो फिरणी (Mango Phirni Recipe In Marathi)
#MDR आई म्हणजे अंगणातील तुळसआई म्हणजे दुधावरची साय.आई म्हणजे अथांग सागर या दोन अक्षरांत आपले पुर्ण विश्व सामावले आहे 💞 Rajashree Yele -
पुरणाचे दिंड (purnache dinde recipe in marathi)
#Shravanqueenसुप्रिया भारतात मोहिते यांनी दाखवलेली पुरणाचे भेंडी रेसिपी खूपच सुंदर होती मी कधीच दिंड्या प्रकार केला नाही पण आज पहिल्यांदा आई व सासुबाई ज्या पद्धतीने करतात अशा दोन्ही पद्धतीने मी केलेले आहेत Deepali dake Kulkarni -
गुजराती स्पेशल पुरणपोळी (puran poli recipe in marathi)
#hr# पुरणपोळी#holi specialHappy holi...... सर्वांनाआली रे आली होळी आली.. होळी रे होळी पुरणाची पोळी.... म्हणत म्हणत आज पुरणाची पोळी बनवली..😇 होळीच्या दिवशी पुरणपोळी ही सर्वत्र बनवली जात असते ...पुरणपोळी ही महाराष्ट्रात विविध प्रकारांनी बनवली जाते. त्यातूनच मिक्स मॅच करून मी गुजराती लोक बनवत असतात ती रेसीपी आज मी बनवली आज पुरण पोळी बनवताना पप्पांची खूप आठवण आली..miss u pappa.😥तसेच मीही माझ्या मम्मी कडून शिकलेली पुरणपोळी आज बनवली आणि ती अप्रतिम अशी बनली....😋... मस्त मऊ लुसलुशीत तुपाने पूर्ण लजपत, गोळ... नुसती पुरणपोळी खाऊन खुश...... माझे मुलं...😊चला तर मग कशी मी बनवली ते पाहूया... Gital Haria -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#पुरणपोळीगणपती बाप्पांच्या आगमनानंतर काही घरांमधे गौराई मातेचे आगमन होते. काही ठिकाणी एक उभी गौरी असते, तर काही ठिकाणी दोन उभ्या असलेल्या गौरी असतात. काही ठिकाणी फक्त मुखवट्याच्या गौरी असतात. कोणी गौरी मातेला पंचकक्वान्नाचा नैवेद्य दाखवतात. काही ठिकाणी गौरीला नाॅनव्हेजचा नैवेद्य पण दाखवला जातो. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते. पण गौरी मातेच्या प्रसादामधे प्रामुख्याने पुरणपोळीचा नैवैद्य दाखवतात. आमच्या कडे गणपती बाप्पांच्या बरोबरच गौरी येतात आणि गणपती बाप्पांच्या बरोबर जेऊन माघारी जातात. मी पुरणपोळी बनवली त्याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16206273
टिप्पण्या