बटाटा पुरी (Batata Puri Recipe In Marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#नास्ता....#बटाटा पुरी.... बटाटा पुरी हे नाश्त्यासाठी किंवा प्रवासामध्ये नेण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे सॉफ्ट आणि टेस्टी अशी ही पुरी सर्वांनाच फार आवडते.... लोणचे चटणी सॉस सोबत सुद्धा हे पुरी छान लागते....

बटाटा पुरी (Batata Puri Recipe In Marathi)

#नास्ता....#बटाटा पुरी.... बटाटा पुरी हे नाश्त्यासाठी किंवा प्रवासामध्ये नेण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे सॉफ्ट आणि टेस्टी अशी ही पुरी सर्वांनाच फार आवडते.... लोणचे चटणी सॉस सोबत सुद्धा हे पुरी छान लागते....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30- मीनीटे
4- जणांसाठी
  1. 4उकडलेले बटाटे
  2. 1 कपबारीक रवा भीजवून
  3. 2 कपगव्हाचे पीठ
  4. 1 1/2 टेबलस्पूनलाल मिरची, लसूण, जीरे , मीठ ठेचा
  5. 1 टीस्पूनओवा
  6. 1 टीस्पूनधणेपूड
  7. 1 टीस्पूनमीठ
  8. 1 टीस्पूनहळद
  9. 250 ग्रामतेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

30- मीनीटे
  1. 1

    उकडलेले बटाटे सोलून एका मोठ्या बाऊलमध्ये मॅशरने मॅश करून घेणे.... एका बाऊलमध्ये रवा घेणे...

  2. 2

    रव्यामध्ये अर्धा वाटी पाणी टाकून रवा भिजवून घेणे पाच मिनिट साठी.... मॅश केलेला बटाटा मध्ये भिजवलेला फुललेला रवा टाकणे....

  3. 3

    रवा आणि बटाट्याच्या मिश्रणामध्ये लाल मिरची लसूण जीरे चा ठेचा टाकणे... ओवा धणे पूड आणि मीठ टाकणे....

  4. 4

    सगळे साहित्य टाकलेले मिश्रण चांगले मिक्स करून घेणे आणि त्याच्यामध्ये मावेल तितकी कणिक टाकणे पाणी नं टाकता तेलाचा हात लावून घट्ट गोळा भिजवून घेणे....

  5. 5

    भिजवलेले पीठ पाच मिनिटे झाकून ठेवणे नंतर त्याची एक साधारण जाडीचे घट्ट पोळी लाटणे आणि एखाद्या वाटेने त्याच्या गोल गोल पुऱ्या कट करून घेणे....

  6. 6

    गॅस वर तेल गरम करून घेणे नंतर त्यात पुरी टाकून साधारण लाल सर पुर्‍या तळून घेणे.... चटणीसोबत गरम गरम बटाट्याची पुरी सर्व करणे....

  7. 7
  8. 8
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes