साधं वरण (Sadh Varan Recipe In Marathi)

Anushri Pai
Anushri Pai @Anu_29184519

सिंपली स्वादिष्ट रेसिपी मध्ये आपण याचा समावेश करू शकतो.हे साधं वरण म्हणजे फोडणी न घालता केलेलं असतं आणि नैवेद्याच्या ताटावर जेव्हा आपण भाताची मूद वाढतो तेव्हा हे वाढले जातं. त्याच्याही खूप पद्धती आहेत. ही पद्धत जी आहे ती कोकणाकडची आहे नक्कीच ट्राय करून बघा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंधरा मिनिटे
  1. 1 कपमुगाची डाळ एक तास पाण्यात भिजवून
  2. 2 टेबलस्पूनओलं खोबरं
  3. 1 चमचाजीरे
  4. 1 चमचासाखर
  5. 1 चमचामीठ
  6. 1 चमचासाजूक तूप
  7. 1/4 चमचाहिंग
  8. 1/4 चमचाहळद

कुकिंग सूचना

पंधरा मिनिटे
  1. 1

    प्रथम ओलं खोबरं जिरं आणि हळद मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्यावं.

  2. 2

    भिजत ठेवलेली मूग डाळ गॅसवर मऊ शिजवून घ्यावी. कुकरमध्ये नाही शिजवायची. भिजवल्यामुळे ती अवघ्या दहा मिनिटात छान शिजते. कुकरमध्ये मुगाची डाळ शिजवल्यामुळे एक प्रकारचा बुळबुळीतपणा येतो.पण गॅसवर शिजवल्यावर,त्यावरती आलेला फेस आपण काढून टाकला तर ती छान सरसरीत मउ शिजते.

  3. 3

    शिजलेल्या मूग डाळीत मग वरील खोबऱ्याचं वाटण मीठ, साखर आणि हिंग घालून छान उकळ काढून घ्यावी की झालं तयार चविष्ट, स्वादिष्ट व सात्विक असं साधं वरण.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anushri Pai
Anushri Pai @Anu_29184519
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes