कोलंबीचे आंबट कालवण

Tina Vartak
Tina Vartak @cook_22564968

#आई आई म्हणजे माझ्या सासुबाई त्यानी मला हे शिकवले होते कसे करायचे ते तसेच मी करते छान लागते आणि आवडते पण सगळयांना झटपट बनवता ही येते वेळ लागत नाही.

कोलंबीचे आंबट कालवण

#आई आई म्हणजे माझ्या सासुबाई त्यानी मला हे शिकवले होते कसे करायचे ते तसेच मी करते छान लागते आणि आवडते पण सगळयांना झटपट बनवता ही येते वेळ लागत नाही.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 वाटीकोलंबी साफ केलेली
  2. 2टाॅमेटो उभे कापलेले
  3. 1 वाटीतेल
  4. कोंथिंबीर बारीक कापलेली
  5. कडीपत्ता
  6. 1 चमचाआल लसुण पेस्ट
  7. 1 टीस्पूनलाल तिखट
  8. 1 चमचामालवणी मसाला
  9. 1 टीस्पूनहळद
  10. चवीनुसारमीठ
  11. चिंच पाण्यामध्ये भिजवुन ठेवलेली

कुकिंग सूचना

  1. 1

    एक भांडे घेऊन त्या मध्ये थोडे तेल घालुन त्या मध्ये आल लसुण पेस्ट घालणे व कडिपत्ता घालुन घेऊन एकत्र करुन घेणे.

  2. 2

    नंतर त्या मध्ये उभे कापलेले टाॅमेटो घालुन घेणे व लाल तिखट,मालवणी मसाला,हळद,मीठ घालुन ते एकत्र करुन घेणे.

  3. 3

    नंतर त्या मध्ये कोलंबी घालुन घेणे व एकत्र करुन घेणे व वरुन कोंथिंबीर घालुन एकत्र करुन घेणे.

  4. 4

    चिंच पाण्यामध्ये भिजवुन ठेवली आहे ती हाताने कुचकरुन त्याचा जो कोळ निघतो तो घालुन घेणे व उकळी काढुन घेणे. अशा प्रकारे तयार होईल कोलंबीचे आंबट कालवण

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Tina Vartak
Tina Vartak @cook_22564968
रोजी

टिप्पण्या (2)

Similar Recipes